सोनं चांदी महागलं, लग्नसराईत खरेदीदारांच्या खिशाला झळ, कोणत्या शहरात किती दर?
सोने आणि चांदी खरेदी (Gold and silver) करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. कारण दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Gold Silver Price : सोने आणि चांदी खरेदी (Gold and silver) करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. कारण दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजही सोन्या चांदीच्या दरात वाढ झालीय. दिल्ली (Delhi) सराफा बाजारात सोन्याच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली असून सोने 66200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तर चांदीच्या दरातही 1700 रुपयांची वाढ झालीय. सध्या चांदीचा दर हा 77000 रुपये किलो आहे.
गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे. याचा फटका खरेदीदारांनी बसत आहे. कारण सध्या लग्न सराईचा हंगाम सुरु आहे. या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करत असतात. पण सध्या सोने चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका खरेदीदारांना बसत आहे. त्यामुळं अनेक लोक सोने चांदीची खरेदी करण्याकडे पाठ फिरवत आहेत.
कोणत्या शहरात सोन्याचा किती दर?
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर हा 60610 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 66120 आहे. तर चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा दर हा 61360 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 66940 रुपये आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर हा 60760 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 66270 रुपये आहे. कोलकाता 22 कॅरेट सोन्याचा दर हा 60160 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 66120 रुपये आहे. पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 60660 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 66170 रुपये आहे. लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 60760 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 66270 रुपये आहे. नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 60760 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 66270 रुपये आहे.
सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असलेल्या मोठा फटका ग्राहकांनी बसत आहे. त्यामुळं सोनं चांदी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कमी कल दिसून येत आहे. दरम्यान, सोन्याच्या किंमतीचं गणित कसं ठरतं. तर बाजारात सोन्या चांदीला असणारी मागणी आणि होणारा पुरवठा यावर दराच गणित अवलंबून असते. सोन्याची मागणी वाढल्यास दरातही मोठी वाढ होते. तर सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होईल. जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो.
महत्वाच्या बातम्या: