Gold Rate Hike : सोन्याला झळाळी! सोन्याच्या दर विक्रमी पातळीवर, आणखी वाढ होण्याचा अंदाज
Gold Rate Today : येत्या काळात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अमेरिकन बँकानी आपले व्याज दर घटविल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याकडे वळविली आहे.
Gold Silver Rate Today, 11 March 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला चांगलीच झळाळी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate Today) विक्रमी वाढ झाली आहे, तर येत्या काळात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जागतिक पातळीवर अमेरिकन बँकानी आपले व्याज दर घटविल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याकडे वळविली आहे. परिणामी सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली असून सोन्याचे दर 67700 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत.
सोन्याचा दर विक्रमी पातळीवर
या वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी आपल्याकडील सोने हे मोड देऊन फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. ग्राहकांकडून वाढत्या मोडीकडे कल पाहता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सोने व्यवसायिकांनी प्रति तोळा दोन हजार रुपयांची घट लावल्याचे पाहायला मिळत आहे.
लगीनसराईसाठी सोने खरेदीचा कल वाढताच
एकीकडे असे चित्र असले तरी, काही ग्राहक मात्र आपल्याकडील लगीनसराईचा विचार करता आपआपल्या गरजेप्रमाणे सोने खरेदी करत असले, तरी हे दर सामान्य माणसाच्या अवाक्या बाहेरचे असल्याने सरकारने दर सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहतील याकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. सोने खरेदी करताना बजेट बिघडल्याने कमी प्रमाणत सोने खरेदी करावी लागत असल्याने अनेक ग्राहकांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे.
सोन्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता
जळगाव सुवर्ण नगरीत सोमवारी सोन्याचे दर 65700 प्रति तोळा तर, जीएसटीसह सोन्याचा दर 67700 प्रति तोळा इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी काळात अजूनही सोन्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज सोने व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
सोन्याच्या किमती 'या' कारणांवर अवलंबून असतात
सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढतील. सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होईल. जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असल्यास, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतील. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होईल.
सोने विक्रमी उच्चांकावर
गेल्या 18 दिवसांत सोन्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2024 च्या चौथ्या आठवड्यात सोन्याचा भाव 62,000 रुपयांच्या आसपास होता. मात्र, त्यानंतर आता सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 5000 रुपयांनी वाढला असून आता किंमत 67,000 रुपयांच्या पुढे पोहोचल्या आहेत. चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 67,000 रुपयांच्या वर आहे तर, दिल्लीत 66410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर मुंबईत सोन्याचा दर 66,270 रुपये प्रति तोळा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :