(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोनं कमी होणार की नाही? रोजच दराचे नवे विक्रम, आज सोन्याचा दर काय?
सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price) दररोज नवे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. काही केल्या सोन्याचे दर कमी होताना दिसत नाहीत. दिवसेंदिवस दरात मोठी वाढ होताना दिसतेय.
Gold Price News : सध्या सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price) दररोज नवे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. काही केल्या सोन्याचे दर कमी होताना दिसत नाहीत. दिवसेंदिवस दरात मोठी वाढ होताना दिसतेय. त्यामुळं सोन्याची खरेदी करावी की नाही, असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहे. वाढत्या दरामुळं खरेदीदारांना मोठा आर्थिक फटका (Financial hit) सहन करावा लागतोय. दरम्यान, आज सराफा बाजारात सोन्यानं 72 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जाणून घेऊयात सोन्याच्या दराची आजची नेमकी स्थिती काय?
एमसीएक्सवर सोन्याच्या दरानं प्रति 10 ग्रॅम 72,678 रुपयांची पातळी गाठली
दिवसेंदिवस सोनं महाग होत असताना दिसत आहे. त्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला कात्री लागत आहे. आज सोन्याच्या दरात प्रथमच 72 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरानं प्रति 10 ग्रॅम 72,678 रुपयांची पातळी गाठली आहे. इतिहासात प्रथमच सोन्याचे दर इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळं लोकांना सोनं खरेदी करण्यासाठी अधिकचे पैसे द्यावे लागत आहेत. दरम्यान, देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असतानाचा आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसतेय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 0.6 टक्क्यांची वाढ झालीय.
चांदीच्या दरालाही मोठी झळाळी
दरम्यान, एका बाजूला सोनं महाग होत असताना दुसऱ्या बाजूला चांदीच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. चांदीच्या दरातील वाढ ही देखील विक्रमी आहे. चांदीच्या दरानं आज एमसीएक्सवर 84 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आज चांदीचे दर हे 84,102 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळं चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला देखील मोठी झळ बसत आहे.
पुढच्या काही काळात सोनं 75 हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता
दरम्यान, दिवसेंदिवस सोनं खूपच महाग होत आहे. त्यामुळं सामान्य नागरिकांना सोनं खरेदी करणं परवडत नाही. मागील आठवड्यातच सोन्याचा दर हा 70 हजार रुपयांच्या आसपास होता. आता मात्र, सोन्याच्या दरानं 72 हजार रुपयांचा टप्पा देखील पार केलाय. पुढच्या काही काळात सोनं 75 हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता देखील काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जागतिक आर्थिक स्थितीमुळं सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे सोनं हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. वाढत्या दरामुळं अनेक लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहे. यामुळं देखील सोन्याच्या मागणीत वाढ झालीय. या वाढत्या मागणीमुळं दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
सोनं खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी, आजचा दर 71000 रुपयांवर