एक्स्प्लोर

Gautam Adani : अदानींसाठी मंगळवार ठरला 'मंगलदिन'; सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पुन्हा झेप

Gautam Adani : मंगळवारी अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी वाढ झाली. तर, दुसरीकडे गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत पुन्हा झेप घेतली.

Gautam Adani : अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी आजचा मंगळवारचा दिवस शुभ ठरला आहे. गेल्या 10 दिवसांपासून हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समुहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. कंपनीचे मार्केट कॅप 100 अब्ज डॉलरपर्यंत घसरले होते. आज अदानी समूहाच्या शेअर दरात तेजी दिसून आली. त्याच्या परिणामी अदानी यांनी  सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत मोठी झेप घेतली. 

मंगळवारी, शेअर बाजारात अदानीच्या बहुतांश शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर 14.94% वाढून 1807.25 रुपये झाले. अदानी कंपनीच्या शेअर दरात वाढ झाल्यानंतर गौतम अदानी यांची संपत्ती (Net Worth) झपाट्याने वाढू लागली. त्यानंतर गौतम अदानी यांनी फोर्ब्सच्या रिअल-टाइम (Forbes' Real-Time Billionaires rankings) अब्जाधीशांच्या क्रमवारीत 22 व्या क्रमांकावरून 17 व्या क्रमांकावर झेप घेतली. 

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात झालेल्या वाढीमुळे, अदानीची एकूण संपत्ती 1.1 अब्ज डॉलरने वाढली आणि त्यांचा Net Worth हा 62.2 अब्ज डॉलर इतकी झाली.

हिंडेनबर्गचा अहवाल 24 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर अदानी यांना मोठा धक्का बसला. एकेकाळी 127 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील तिसरी श्रीमंत असलेले गौतम अदानी यांची घसरण होऊन २२ व्या क्रमांकावर पोहचले होते. हिंडेनबर्ग अहवालामुळे कंपनीचे बाजार भांडवल 50 टक्क्यांहून अधिक घसरले. अदानीच्या शेअर्स दरात सोमवारी किंचित वाढ आणि मंगळवारी मोठी वाढ झाल्याने अदानीच्या संपत्तीत मागील 24 तासांत 1.8 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. गौतम अदानी फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत त्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर 22 व्या क्रमांकावरून 17 व्या स्थानावर पोहचले. 

अदानी यांच्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास?

अदानी समूहाने सोमवारी, तारण ठेवलेले शेअर्स सोडवण्यासाठी 1.11 अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड मुदतीआधीच केली. अदानी समूहाने ही घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांनी अदानी समूहावर विश्वास टाकला असल्याचे चित्र आहे. बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 20 टक्क्यांनी वधारले. तर, अदानी पोर्ट्स कंपनीचेय शेअर दर 9.63 टक्क्यांनी वधारले. अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये 3.84 टक्के, अदानी विल्मरच्या शेअर दरात 4.99 टक्क्यांची तेजी दिसून आली. अदानी पॉवर वगळता इतर कंपन्यांच्या शेअर दरात चांगली वाढ झाली.  अदानी पोर्टस अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (Adani Ports & Special Economic Zone), अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) आणि अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) या कंपन्यांचे तारण ठेवलेले शेअर्स सोडवून घेतले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget