अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट, जागतिक क्रमवारीत घसरण; जाणून घ्या कोण कितव्या स्थानावर?
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) या दोन भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या दोन्ही उद्योगपतींच्या संपत्तीत घट झाली आहे.
Gautam Adani Mukesh Ambani Net worth : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) या दोन भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या दोन्ही उद्योगपतींच्या संपत्तीत घट झाली आहे. हे दोन्ही उद्योगपती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एका स्थानाने मागे पडले आहेत. एलन मस्क या यादीत 217 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अव्वल स्थानावर आहेत.
कोणाच्या संपत्तीत किती घट?
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत 3.38 अब्ज डॉलर म्हणजेच 28,111 कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 90.8 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. त्याचवेळी, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मंगळवारी 2.24 अब्ज डॉलर्स म्हणजेच 18,630 कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं मुकेश अंबानी यांची संपत्ती 99.1 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. या दोघांच्याही संपत्तीत घट झाल्यामुळं जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत या दोघांचीही एक एक स्थानाने घसरण झाली आहे.
कोण कितव्या स्थानावर?
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने याबाबतची माहिती दिली आहे. यानुसार, गौतम अदानी आणि मुकेश अंबानी दोघेही श्रीमंतांच्या यादीत 1-1 स्थानाने मागे पडले आहेत. निव्वळ संपत्तीत घट झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत यापूर्वी 11व्या क्रमांकावर असलेले मुकेश अंबानी आता 12व्या क्रमांकावर आले आहेत. तर 11व्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस स्लिम यांची एकूण संपत्ती त्याच्यापेक्षा केवळ 0.9 अब्ज डॉलर अधिक आहे. त्याचबरोबर गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 13व्या स्थानावरून 14व्या स्थानावर आले आहेत.
जगातील श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर कोण?
217 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह, टेस्ला आणि ट्वीटरचे मालक एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांच्यानंतर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बेझोस यांची एकूण संपत्ती 181 अब्ज डॉलर आहे. बर्नार्ड अरनॉल्ट या यादीत तिसर्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 162 अब्ज डॉलर आहे. चौथ्या स्थानावर बिल गेट्स आहेत, त्यांचीची एकूण संपत्ती 142 अब्ज डॉलर्स आहे. त्याचबरोबर फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 5 व्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या: