एक्स्प्लोर

महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा! वर्षभरानंतर डाळींच्या दरात घरसण, सरकारचा नवीन प्लॅन काय?  

डाळींच्या दरात (Pulse Prices) सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र, सरकारच्या नवीन धोरणामुळं सध्या डाळीच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Pulse Prices News : डाळींच्या दरात (Pulse Prices) सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र, सरकारच्या नवीन धोरणामुळं सध्या डाळीच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका वर्षाहून अधिक काळ झालं महागाई दर हा 10 टक्क्यांच्या वर आहे. किमती नरमल्याने महागाईचा दरही कमी होईल, अशी सरकारला आशा आहे. 

6 महिन्यात महागाई किती कमी झाली? 

खाद्यपदार्थांच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जवळपास वर्षभराच्या त्रासानंतर आता डाळींचे भाव उतरु लागले आहेत. येत्या काही महिन्यांत किंमती आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या एक महिन्यापासून देशातील विविध बाजारपेठांमध्ये डाळींच्या किमती घसरत आहेत. अहवालानुसार हरभरा, तूर  आणि उडीद या डाळींच्या किंमती कमी झाल्या आहेत. ही बाब सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. कारण एका वर्षाहून अधिक काळ डाळींचे भाव वाढतच होते. डाळींचा किरकोळ महागाईचा दर जानेवारीमध्ये 19.54 टक्के होता, तो जूनमध्ये 16.07 टक्क्यांवर आला आहे.

डाळींच्या किंमतीत किती झाली घसरण? 

ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, तुरीच्या डाळीच्या किरकोळ किमती 160 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आल्या आहेत. महिनाभरापूर्वीच्या तुलनेत ही घट 5.8 टक्के आहे. त्याचप्रमाणे मसूर डाळ महिनाभरापूर्वीच्या तुलनेत 10 टक्के स्वस्त होऊन 90 रुपये किलोपर्यंत खाली आली आहे. प्रमुख बाजारात हरभरा, तूर आणि उडीद डाळीच्या किमती गेल्या एका महिन्यात 4 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

डाळींच्या दरात घसरण होण्याचं कारण काय?

येत्या काही महिन्यात डाळींच्या किंमती आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळं आयातीत झालेली वाढ हे किंमती कमी होण्याचं मुख्य कारण आहे. डाळींच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं तूर, उडीद आणि मसूर डाळ यांच्या शुल्कमुक्त आयातीला 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं डाळींची आयात वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने 4.73 दशलक्ष टन डाळींची आयात केली होती. जी 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 90 टक्के अधिक आहे.

तूर आणि हरभरा डाळीवर सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत साठा मर्यादा वाढवली

तूर आणि हरभरा डाळीवर सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत साठा मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळं उपलब्धता सुधारण्यासही मदत होत आहे. दुसरीकडे चांगला पाऊस झाल्याने डाळींच्या पेरण्या वाढत आहेत. 2 ऑगस्टपर्यंत 11.06 दशलक्ष हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली होती. जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे 11 टक्के अधिक आहे.

महत्वाच्या बातम्या:

Bharat Dal : सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारची भेट! फक्त 60 रुपये किलोनं 'भारत डाळ'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget