Rule Change from 1st January 2024 : नव्या वर्षात अनेक आर्थिक नियम बदलणार, सर्वसामान्यांचा खिशाला कात्री; यादी पाहा
Financial Rules Change from 1st January 2024 : 1 जानेवारी 2024 पासून नवीन वर्षात सुरु होताच काही आर्थिक नियम बदलणार आहेत, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो.
Rule Change from 1st January 2024 : आज 31 डिसेंबर असून उद्यापासून नव्या वर्षाला सुरुवात होत आहे. नव्या वर्षाचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, नव्या वर्षात तुमच्या खिशाला महागाईची झळ बसू शकते. 1 जानेवारी 2024 पासून नवीन वर्षात सुरु होताच काही आर्थिक नियम बदलणार आहेत, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो.
LPG सह इंधन दरात वाढ होण्याची शक्यता
1 जानेवारी पासून एलपीजी गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलसह इतर इंधन दरात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला LPG आणि CNG, PNG सह इंधनाचे नवे दर जाहीर केले जातात. 1 जानेवारी 2024 ला या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
'हे' UPI अकाऊंट बंद होणार
1 जानेवारीपासून यूपीआय अकाऊंट (UPI Account) संदर्भातील नियमातही बदल होणार आहे. मागील एक वर्षापासून बंद असलेले UPI खाती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून बंद करण्यात येणार आहे.
सिमकार्ड
नवीन दूरसंचार विधेयक लागू झाल्यानंतर मोबाईल सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नियमानुसार आता टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. याशिवाय सरकारने दूरसंचार कंपन्यांना डिजिटल केवायसी करणे अनिवार्य केलं आहे. 1 जानेवारी 2024 पासून, तुम्हाला नवीन सिम कार्ड खरेदी करताना बायोमेट्रिक्सद्वारे माहिती द्यावी लागणार आहे.
आयकर परतावा
2022-23 या आर्थिक वर्षाचा ITR भरण्यासाठी करदात्यांकडे आजचा शेवटचा दिवस आहे. 31 डिसेंबरपर्यंत आयटीआर फाईन न केलेल्या करदात्यांना 1 जानेवारीपासून आयकर परतावा भरताना दंड भरावा लागेल.
बँक लॉकर नियम
1 जानेवारीपासून बँक लॉकरच्या नियमांमध्येही बदलणार आहेत. बँक लॉकर नूतनीकरण प्रक्रियेत, लॉकर धारकाला (Bank Account Holder) नवीन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल. हा करार 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल.
डिमॅट अकाऊंट
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने डीमॅट खात्यात नामांकन (Nominee) जोडण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 दिली आहे. ज्या खातेदारांनी नॉमिनी जोडले नसतील, त्यांची खाती 1 जानेवारी 2024 पासून गोठवली जाऊ शकतात.
हवाई प्रवास महागणार
नवीन वर्षात हवाई प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. एअरलाइन तिकिटावरील कर 20 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विमा प्रीमियम महागण्याची शक्यता
2024 या नवीन वर्षामध्ये विमा प्रीमियम ( Insurance Premium ) महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच या संदर्भातील नियोजन करुन घ्या.
पासपोर्ट-व्हिसा नियम
वर्ष 2024 पासून, परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी त्यांचा अभ्यास संपण्यापूर्वी व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. म्हणजेच विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत कोणत्याही देशात वर्क व्हिसावर जाऊ शकणार नाहीत.