नवीन वर्षात गुंतवणुकीचा प्लॅन काय? दरमहा 5000 गुंतवा काही दिवसातच करोडपती व्हा; जाणून घ्या सविस्तर माहिती
नवीन वर्ष येते आणि जाते आपण केलेल्या योजना मात्र, व्यर्थ जातात. कारण वेळ कोणाचीही वाट पाहत नाही. म्हणून जर तुम्ही भविष्याबद्दल जागरूक राहणं गरजेचं आहे. यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे.
Financial Plan : 2023 हे वर्ष संपायला काही दिवसच उरले आहेत. नवीन वर्ष 2024 (New year 2024) च्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. अनेक लोक नवीन वर्षात वेगवेगळे संकल्प करतात. तर काही लोक आपल्या जीवनासंदर्भात काही नियोजन देखील करतात. पण नवीन वर्ष येते आणि जाते आणि योजना व्यर्थ जातात. कारण वेळ कोणाचीही वाट पाहत नाही. म्हणून जर तुम्ही भविष्याबद्दल जागरूक राहणं गरजेचं आहे. विशेषत: तुम्ही जर खासगी नोकरी करत असाल तर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या संदर्भात आयडीआ सांगणार आहोत.
आर्थिक समस्या टाळण्यासाठी योग्य वेळी नियोजन गरजेचं
या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे. प्रत्येकाचे ध्येय लक्षाधीश बनणे हेच आहे. मात्र, यासाठी गुंतवणुकीबाबत जागरुक राहण्याची गरज आहे. पण हे देखील काही प्रमाणात खरे आहे की आजच्या काळात करोडपती बनणे अवघड काम नाही. त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. उतारवयात येणाऱ्या आर्थिक समस्या टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य वेळी नियोजन केले पाहिजे. अशा परिस्थितीत, 2024 हे नवीन वर्ष येणार आहे. जर तुम्हाला नवीन वर्षात गुंतवणुकीचे पाऊस टाकायचे असेल तर तुम्ही विचार करु शकता. एकदा गुंतवणुकीचे पहिले पाऊल टाकले की आपोआपच उद्दिष्टे सोपे होते.
जर तुम्ही नवीन वर्षापासून म्हणजे 2024 पासून प्रत्येक महिन्याला 5000 रुपये वाचवले तर तुम्ही किती दिवसात करोडपती बनू शकता. मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तीसाठी दरमहा 5000 रुपयांची बचत करणे अवघड काम नाही. 2023 पर्यंत तुम्ही विचारात वेळ घालवला असेल तर नवीन वर्षापासून या कामात सहभागी व्हा, काही वर्षांतच तुम्हाला कळेल की आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी पैशाची गरज नाही तर मजबूत इच्छाशक्ती लागते.
5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा
नवीन वर्षापासून तुम्ही दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक करु शकता. या बतचीतून तुम्ही करोडपती होऊ शकता. तुम्ही हे लक्ष्य कसे गाठू शकता याबाबतचे संपूर्ण गणित समजावून घेऊ. यासाठी पैसे कुठे गुंतवायचे? आज म्युच्युअल फंडाबाबत सर्वांनाच माहिती आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात फक्त 500 रुपये दरमहा SIP करू शकता. SIP हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात दरमहा 5000 रुपयांची SIP करता आणि त्यावर तुम्हाला वार्षिक 15 टक्के परतावा मिळत असेल, तर 22 वर्षांनी तुम्ही करोडपती व्हाल. तुमच्याकडे एकूण 1.03 कोटी रुपये असतील. तर या 22 वर्षांत तुम्ही एकूण 13.20 लाख रुपये जमा कराल आणि तुम्हाला संपूर्ण परतावा हा 1.03 कोटी रुपये मिळेल.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा
दुसरीकडे, जर वार्षिक परतावा 17 टक्के असेल, तर मासिक 5000 रुपये गुंतवून तुम्ही 20 वर्षांत म्युच्युअल फंडातून 1.01 कोटी रुपये गोळा करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही दरमहा 5000 रुपये गुंतवायला सुरुवात केली आणि त्यात वार्षिक 10 टक्के वाढ केली, तर 12 टक्के वार्षिक परताव्यावरही 20 वर्षांनंतर तुमच्याकडे 1 कोटी रुपये होतील. याचा अर्थ, जर तुम्ही 2024 पासून दरमहा 5000 रुपये SIP करत असाल तर 2044 मध्ये तुम्ही 1 कोटी रुपयांचे मालक व्हाल. जर तुम्ही मासिक 5000 रुपये SIP करत असाल आणि गुंतवणूक वार्षिक 10 टक्क्यांनी वाढली. परंतु जर त्यावर वार्षिक परतावा 15 टक्के असेल, तर तुम्हाला एकूण 1,39,18,156 रुपये मिळतील, तर या कालावधीत तुम्ही एकूण 34,36,500 रुपये गुंतवाल.
(टीप: कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या)
महत्त्वाच्या बातम्या: