FD चे व्याजदर वाढणार? RBI च्या निर्णयाचा गुंतवणुकदारांना होणार फायदा
FD Investment Plan : FD हा पर्याय गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला चांगला परतावा (good return) मिळतो.
FD Investment Plan : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. गुंतवणूक करताना लोकांना सुरक्षा आणि चांगला परतावा या दोन गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. दरम्यान, FD हा पर्याय गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला चांगला परतावा (good return) मिळतो. सध्या नवीन आर्थिक वर्ष सुरु झालं आहे. त्यामुळं तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.
FD हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये ठेवलेली ठेवं पूर्णत:सुरक्षीत असेल. चांगला पतावाही यावर मिळतोय. FD मध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती? असा जर प्रश्न तुमच्या मनात पडला असेल तर, गुंतवणुकीसाठी हीच योग्य वेळ आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) काल (5 एप्रिल) या वर्षातील पहिलं आर्थिक धोरणं जाहीर केलं. यामध्ये सलग सातव्यांदा रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा दर 6.50 टक्क्यांवर कायम आहे. त्यामुळं FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.
बँका व्याजदर कमी करणार नाहीत
RBI ने जाहीर केलेल्या पहिल्या आर्थिक धोरणात रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळं बँका व्याजदरात कोणताही बदल करणार नाहीत. पूर्वीप्रमाणेच बँकांचे व्याजदर राहतील. अशा परिस्थितीत बँका बाजारात समतोल ठेवण्यासाठी FD च्या व्याजदरात वाढही करतील अशी शक्यता आहे. त्यामुळं लोकांना FD वर चांगला परतावा मिळेल.
FD वर 9 टक्के परतावा मिळण्याची शक्यता
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून FD चे व्याजदर स्थीर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. मात्र, आता FD चे व्याजदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार बँका FD वर 9 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. सध्या जर देशातील खासगी आणि सरकारी बँकांची स्थिती पाहीली तर या बँका FD वर 8.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. तर काही स्मॉल फायनान्स बँका लोकांना FD वर 9 टक्क्यांपर्यंत देखील परतावा देत आहेत. तर काही बँका ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना चांगला परतावा देत आहेत. इतरांपेक्षा त्यांना 0.50 टक्क्यांपर्यंत अधिक परतावा मिळतो.
महत्वाच्या बातम्या: