एक्स्प्लोर

कृषी उत्पादनांची निर्यात 50 अब्ज डॉलरवर, पियूष गोयलांनी मानले शेतकऱ्यांचे आभार

भारत अन्नधान्य, डाळी, मसूर, भाज्या, फळे यांचा मोठा उत्पादक देश बनला आहे, याबद्दल केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal) यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले.

Piyush Goyal : भारत अन्नधान्य, डाळी, मसूर, भाज्या, फळे यांचा मोठा उत्पादक देश बनला आहे, याबद्दल केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal) यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. भारताला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी कृषी उत्पादनांची महत्वाची भूमिका आहे. कृषी उत्पादनात आणि दर्जामध्ये झालेल्या वाढीबद्दल मंत्री पियुष गोयल यांनी आनंद व्यक्त केला. कृषी संबंधित उत्पादनांची निर्यात 50 अब्ज डॉलरच्या वर पोहोचल्याचे गोयल म्हणाले. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ(नाफेड) च्या सहकार्याने जागतिक डाळी महासंघाने आयोजित केलेल्या नाफेड- डाळी 2024 परिसंवादात ते बोलत होते.

डाळींच्या उत्पादनात 60 टक्क्यांची वाढ 

विविध प्रकारच्या खाद्य उत्पादनांचा दर्जा आणि उत्पादनात वाढ होऊन भारत कृषी संबंधित उत्पादनांचा 50 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्याच्या कृषी उत्पादनांचा निर्यातदार बनला आहे. गेल्या एका दशकात शेतकऱ्यांची बांधिलकी आणि क्षमता यामुळं डाळींच्या उत्पादनात 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. हे उत्पादन 2014 मधील 171 लाख टनांवरुन 2024 मध्ये 270 लाख टनांवर पोहोचले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

 एमएसपीमधून चांगल्या दराची हमी 

नाफेड आणि जीपीसीमधील भागीदारी वृद्धिंगत होत राहील आणि डाळींना केवळ भारताचेच अद्भुत खाद्य नव्हे तर जगाचे अद्भुत खाद्य बनवेल असे पीयूष गोयल म्हणाले. भारत डाळ विषयी बोलताना मंत्री गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं देशातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी आणि भारतीय नागरिकांना किफायतशीर दरात डाळी उपलब्ध करून देण्यासाठी भारत डाळ उपक्रम सुरू केला. सरकारनं खरेदी केलेल्या चणा डाळीची  भारत ब्रँड अंतर्गत किरकोळ विक्री सुरु केल्यावर विक्रीला सुरूवात झाल्यापासून केवळ चार महिन्यांच्या आतच मसूर चणा बाजाराचा 25 टक्के भाग या डाळीने व्यापला आहे, असे त्यांनी सांगितले. किमान हमी भावासंदर्भात (MSP) गोयल म्हणाले की, आज आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष लागवडखर्चाच्या वर 50 टक्के दराची हमी  एमएसपीमधून मिळत आहे. तसेच गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळत असल्याचे गोयल म्हणाले. विविध प्रकारच्या खाद्य उत्पादनांचा दर्जा आणि उत्पादनात वाढ होऊन भारत कृषी संबंधित उत्पादनांचा 50 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्याच्या कृषी उत्पादनांचा निर्यातदार बनला आहे. तसेच गेल्या एका दशकात शेतकऱ्यांची बांधिलकी आणि क्षमता यामुळं डाळींच्या उत्पादनात 60 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे गोयल म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

गेल्या 10 वर्षांत डाळींच्या उत्पादनात 60 टक्क्यांची वाढ, जाणून घ्या किती वाढली MSP

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
Gold Rate : युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
Share Market Crash : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका,सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
SIP : शेअर बाजारात दोन दिवसात 11 लाख कोटी स्वाहा, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरुच, SIP बंद करावी की सुरु ठेवावी? 
शेअर बाजारात दोन दिवसात 11 लाख कोटी स्वाहा, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरुच, SIP बंद करावी की सुरु ठेवावी? 

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
Pune Crime News: पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
Putin on Gas to European Markets: इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या घातपाताचा संशय, देवगिरी बंगल्यावर रात्री 20 आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग
राष्ट्रवादीचे 20 आमदार रात्री देवगिरी बंगल्यावर, सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या त्या वस्तू सर्वांसमोर ठेवल्या
Embed widget