पेन्शनधारकांना EPFO च्या पोर्टलवर घरबसल्या मिळणार सर्व माहिती, कार्यालयाला भेट देण्याची गरज नाही
EPFO Pensioners Portal: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी EPFO ने पेन्शन पोर्टल उघडले आहे.
EPFO Pensioners Portal: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (Employees Provident Fund Organisation) देशभरात लाखो खातेदार आणि पेन्शनधारक (Pensioners) आहेत. प्रत्येक नोकरदाराच्या पगाराचा काही भाग कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या खात्यातून कापला जातो. निवृत्तीनंतर ही रक्कम एकत्रित कर्मचाऱ्यांना दिली जाते. तर काही लोक त्यांचे पैसे पेन्शन (Pension) म्हणून वापरतात. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी EPFO ने पेन्शन पोर्टल उघडले आहे. पेन्शनधारकांना या पोर्टलवर अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. चला तर मग EPFO पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व माहिती जाणून घेऊ.
जीवन प्रमाणपत्राशी संबंधित सर्व माहिती मिळवा
EPFO च्या पेन्शन पोर्टलद्वारे (Epfo Pension Portal) तुम्हाला जीवन प्रमाणपत्राची (Life Certificate) सर्व माहिती मिळते. तुम्ही वर्षभरात कधीही या पोर्टलला भेट देऊन तुमचे जीवन प्रमाणपत्र सबमिट करू शकता. यासाठी तुम्हाला ईपीएफओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
PPO क्रमांकाची माहिती मिळवा
निवृत्तीनंतर सर्व पेन्शनधारकांना पीपीओ क्रमांक मिळतो. हा 12 क्रमांकाचा रेफेरेंस नंबर असतो. याद्वारे तुम्ही तुमच्या पेन्शनशी संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकता. या क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या पेन्शन खात्याचे पासबुक तपासू शकता. यासोबतच या नंबरद्वारे तुम्ही तुमचे पेन्शन खाते एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करू शकता.
पेन्शन स्थितीबद्दल (Pension Status) मिळणार माहिती
या पेन्शन पोर्टलद्वारे तुम्हाला सर्व प्रकारच्या पेन्शन स्थितीची माहिती मिळते. पेन्शनशी संबंधित प्रत्येक छोटी-मोठी माहिती तुम्ही घरबसल्या मिळवू शकता. यासाठी तुम्हाला वारंवार EPFO कार्यालयात जाण्याची गरज नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
- Cardless Cash Withdrawal: कार्डलेस कॅश काढण्याची ऑफर द्या, आरबीआयच्या बँका-एटीएम ऑपरेटर्सना सूचना
- Share Market : शेअर बाजारात घसरण आणि गुंतवणूकदार आडवे.., एकाच दिवसात तब्बल 6.36 लाख कोटी रुपये पाण्यात
- Share Market : शेअर बाजारासाठी काळा दिवस; Sensex 1416 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
- LIC Share Price : एलआयसीच्या गुंतवणुकदारांना मोठा फटका; शेअर दरात मोठी घसरण