एक्स्प्लोर

EPFO : आधार यूएएन लिंकिंगला ईपीएफओकडून मुदतवाढ, केंद्र सरकार 'त्या' पीएफ खातेदारांच्या खात्यात पैसे पाठवणार

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं यूएएन क्रमांक आणि आधार लिंक करण्यास पुन्हा मुदतवाढ दिली आहे.

नवी दिल्ली : ईपीएफएओनं यूएएन आणि आधार क्रमांक लिंक करण्यास मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 30 जूनपर्यंत आहे. केंद्र सरकारनं 2024 च्या अर्थसंकल्पात इम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेनटिव्ह योजना जाहीर केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही योजना जाहीर केली होती. त्या योजनेद्वारे पात्र कर्मचाऱ्यांना ठराविक रक्कम दिली जाणार असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, यासाठी यूएएन क्रमांक सक्रीय असणं आवश्यक आहे, याशिवाय  यूएएन आणि बँक खातं आधार सोबत लिंक असणं आवश्यक आहे.

ईपीएफओकडून यापूर्वी अनेकदा यूएएन क्रमांक आणि आधार क्रमांक लिंक करण्यास मुदतवाढ दिली होती. यावेळी देखील यूएएन क्रमांक सक्रीय करण्यास  आणि आधार सोबत लिंक करण्यास मुदतवाढ दिली आहे. बँक खातं  देखील आधार कार्डशी लिंक करण्यास मुदतवाढ दिली आहे.जर तुम्हाला  केंद्र सरकारच्या ईएलआय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर  आधार आणि यूएएन खातं लिंक करणं आवश्यक आहे. 


ईपीएफओच्या नव्या परिपत्रकानुसार यूएएन क्रमांक सक्रीय करण्यास आणि आधार लिंक्ड बँक खातं लिंक करण्यास 30 जून पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्यांना ईएलआयचा फायदा घ्यायचा असेल ते याचा लाभ घेऊ शकतात. ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांना यूएएन क्रमांक दिला जातो. त्याद्वारे अनेक पीएफ खात्याचं व्यवस्थापन केलं जातं. यूएएन क्रमांकाच्या माध्यमातून पीएफच्या पैशांचं व्यवस्थापन करता येतं. तुम्ही कितीही वेळा नोकरी बदलली तरी यूएएन क्रमांक एकच राहतो. 

यूएएन क्रमांक सक्रीय केल्यानंतर कर्मचारी ईपीएफओच्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय पीएफ खात्याची हाताळणी करु शकतात. पैसे काढण्यासाठी क्लेम देखील करु शकतात. यूएएन क्रमांक सक्रीय करण्यासाठी आधार बेस्ड वन टाइम पासवर्डची आवश्यकता असते. पीएफ खातेदारानं ईपीएफओ मेंबर पोर्टला भेट द्या, तिथं Activate UAN वर क्लिक करा. आवश्यक असलेली माहिती नोंदवून आधार ओटीपीद्वारे वेरिफाय करा. 


केंद्र सरकारनं 2024 च्या अर्थसंकल्पात  एम्पलॉयमेंट लिंक्ड इन्सेनटिव्ह योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात 15000 रुपयांची रक्कम पाठवली जाणार आहे. ईएलआय योजना  ए, बी, सी जाहीर करण्यात आली होती. ईएलआय योजनेचा मूळ हेतू हा रोजगार वाढवणे आणि यासाठी कर्मचारी आणि नियोक्ता यांना मदत करणं हा होता. या योजनेद्वारे रोजगार, कौशल्य आणि संधी वाढवण्याचा प्रयत्न सरकारचा होता. याद्वारे 5 वर्षांच्या काळात 2 लाख कोटी रुपये 4.1 कोटी तरुणांसाठी खर्च केले जाणार आहेत. 


जे कर्मचारी पहिल्यांदा नोकरीला लागले आहेत. त्यांना 15000 हजार रुपये दिले जाणार आहेत. आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक खात्यात ती रक्कम जाईल.नियोक्ता आणि कर्मचारी यांना प्रोत्साहन निधी ईपीएफओ काँट्रिब्यूशन चार वर्षांसाठी दिला जाणार आहे. प्रत्येक नव्या कर्मचाऱ्यासाठी कंपनीला 3000 रुपयांची रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्यामागं दिली जाणार आहे. ही मदत दोन वर्षांपर्यंत करण्यात येईल. कर्मचाऱ्यांना मिळणारी 15000 रुपयांची रक्कम तीन हप्त्यात दिली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget