एक्स्प्लोर
Yes Bank Share : येस बँकेच्या शेअरमध्ये उसळी, 3 जूनला स्टॉक मार्केटमध्ये काय घडणार? जाणून घ्या शेअर किती रुपयांवर पोहोचणार?
Yes Bank Share Price : येस बँकेच्या बोर्डाची बैठक 3 जून रोजी होणार आहे. या बैठकीपूर्वीच येस बँकेच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे.
येस बँक शेअर बातम्या
1/7

येस बँकेच्या शेअरमध्ये गेल्या महिनाभरापासून तेजीचं सत्र सुरु आहे. 2 जूनला येस बँकेच्या शेअरमध्ये 8 टक्के तेजी पाहायला मिळाली. येस बँकेच्या शेअरमध्ये महिनाभरात 30 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे.
2/7

गेल्या महिन्यात जपानच्या एका वित्तीय संस्थेकडून येस बँकेत भागीदारी खरेदी केली जाणार असल्याची अपडेट आली होती. तेव्हापासून शेअरमध्ये तेजी पाहायला मिळतेय. 3 जूनला येस बँकेच्या बोर्डाची बैठक होणार आहे त्यामध्ये भांडवल उभारणी संदर्भात चर्चा होऊ शकते.
3/7

स्टेट बँक ऑफ इंडियानं गेल्या महिन्यात येस बँकेतील त्यांची 13 टक्के भागीदारी जपानच्या सुमितोमो मित्सुइ बँकिंग कॉर्पोरेशनला विकणार असल्याची घोषणा केली होती. हा करार 12 महिन्याच्या काळात दोघांच्या सहमतीनं निश्चित केलेल्या तारखेच्या आत कधीही पूर्ण होऊ शकतो.
4/7

येस बँकेच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. आज येस बँकेचा शेअर 21.40 रुपयांवरुन 23.39 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर बाजार बंद झाला तेव्हा स्टॉक 23.28 रुपयांवर होता. आजच्या सत्रात येस बँकेच्या 50 कोटींहून अधिक शेअरचं ट्रेडिंग झालं.
5/7

मार्केट एक्सपर्टसनं येस बँकेच्या शेअरला 25 रुपयांच टार्गेट दिलं आहे. तर 20 ते 21 रुपयांचा सपोर्ट दिला आहे. येस बँकेच्या शेअरनं गेल्या 6 महिन्यात 15 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत.
6/7

जपानच्या सुमितोमो मित्सुइ बँकिंग कॉर्पोरेशन भारतीय स्टेट बँकेच्या कंसोर्टियम कडून येस बँकेतील 20 टक्के भागीदारी खरेदी करण्याचं नियोजन करत आहेत, या बातमीमुळं येस बँकेच्या शेअरमध्ये तेजी येताना पाहायला मिळतं. ही डील 13483 कोटी रुपयांची आहे.
7/7

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 02 Jun 2025 11:19 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा


















