एक्स्प्लोर

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची तांब्यावर 50 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा, भारतात 'या' कंपन्यांचे स्टॉक्स क्रॅश, विक्रीचा ट्रेंड सुरु 

Donald Trump : अमेरिका सध्या त्यांना लागणाऱ्या एकूण तांब्यापैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त तांबे आयात करते. अमेरिका चिली देशातून मोठ्या प्रमाणावर आयात करते. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये तांब्यावर टॅरिफ लावण्याचे संकेत दिले.   

Metal Stocks वॉशिंग्टन : भारतीय शेअर बाजार हिंदुस्तान कॉपर, सेल, टाटा स्टील, जिंदाल स्टेनलेस, वेदांता आणि एनएडीसीसह मेटल शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. मेटल स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाली, याशिवाय गुंतवणूकदारांनी या कंपन्यांचे स्टॉक्स मोठ्या विकले आहेत. या घसरणीला डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून तांब्यावर लादण्यात येत असलेलं टॅरिफ हे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच स्टील आणि अॅल्युमिनिअमवर यापूर्वी 50 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. आता तांब्यावर देखील 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प इतर वस्तूंवर देखील कर आकारु शकतात. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमधील देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि विदेशातून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तांब्यावर 50 टक्के टॅरिफ लावण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. अमेरिकेत सध्या त्यांना लागणाऱ्या तांब्यापैकी किमान 50 टक्क्यांहून अधिक तांबे आयात केलं जाते. अमेरिका प्रामुख्यानं सर्वाधिक तांबे चिली देशातून आयात करते. व्हाईट हाऊसमधेय कॅबिनेट बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, आज आप तांब्यावर चर्चा करत आहोत. माझ्या मते तांब्यावर टॅरिफ 50 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहोत, असं ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे टॅरिफ कधीपासून लागू होणार हे स्पष्ट केलं नाही.  
 
आज मेटल स्टॉक्समध्ये हिंदुस्तान कॉपरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. हा स्टॉक 3.5 टक्क्यांनी घसरुन 264 रुपयांवर आला आहे. सेल कंपनीचा स्टॉक 2.35 टक्क्यांनी घसरुन 131.82 रुपयांवर आला आहे. टाटा स्टील, जिंदाल स्टेनलेस , वेंदांता, एनएडीसी, हिंडाल्को इंडस्ट्रीज, हिंदुस्तान जिंक आणि जिंदाल स्टील अँड पॉवरसह इतर मेटल स्टॉक्समध्ये 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. 

फेब्रुवारीत डोनाल्ड ट्रम्प यांनी तांब्यावर टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. तेव्हापासून जागतिक व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर धातूंची निर्यात अमेरिकेला केली आहे. टॅरिफ लावण्यापूर्वीच अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली, टॅरिफ पासून वाचण्यासाठी या मार्गाचा वापर करण्यात आला होता.  

तांब्यावर लादण्यात येणारं 50 टक्के  टॅरिफ अपेक्षेपेक्षा जास्त आहे. हे टॅरिफ येत्या काही आठवड्यांमध्ये लागू होऊ शकतं.  मंगळवारी कॉमेक्सवर तांब्याच्या दरामध्ये 17 टक्के वाढ झाली आहे.यापूर्वी तांब्याच्या दरातील वाढ 10 टक्के इतकी होती. बुधवारी यामध्ये 4 टक्के घसरण झाली. एलएमईवर मेटल 2.4 टक्क्यांनी घसरले, सिंगापूरमध्ये मध्येही याचा परिणाम दिसून आला.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget