PM किसानचा 17 वा हप्ता मिळवायचाय? मग हे महत्वाचे काम आजच पूर्ण करा, अन्यथा....
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi: येत्या 18 जून रोजी PM किसानचा 17 वा हप्ता मिळणार आहे. मात्र, त्यापर्वी शेतकऱ्यांना काही महत्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत.
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) 17 वा हप्ता कधी मिळणार याची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर याची प्रतीक्षा संपली आहे. येत्या 18 जून रोजी PM किसानचा 17 वा हप्ता मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करणार आहेत. मात्र, त्यापर्वी शेतकऱ्यांना काही महत्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत.
17 वा हप्ता मिळवण्यासाठी 'हे' काम करा
येत्या 18 जून रोजी PM किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळणार आहे. मात्र, त्यापर्वी शेतकऱ्यांना काही महत्वाची कामे पूर्ण करावी लागतील. तरच शेतकऱ्यांनी PM किसानचा 17 वा हप्ता मिळू शकतो. अन्यथा हा हप्ता मिळणार नाही. हे काम न केल्यास लाभापासून वंचित राहाल. तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल तर ती त्वरित करुन घ्या, अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. प्रधानमंत्री किसान योजनेच्या वेबसाईटवर जा आणि e-KYC साठी नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका आणि OTP टाका. यानंतर, ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करुन घ्या. त्याचबरोबर तुमचे नाव बरोबर आहे का याची खात्री करुन घ्या.
योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ
देशातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते. त्यापैकी एक, जगातील सर्वात मोठी DBT योजना म्हणजे PM किसान सन्मान निधी योजना. ही योजना भारत सरकार संचालित करते. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता पुढील आठवड्यात जारी केला जाईल. आत्तापर्यंत शेतकऱ्यांमी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 16 हप्ते मिळाले आहेत.
9.3 कोटी शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचा लाभ मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पीएम किसान निधीशी संबंधित फाइलवर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांपासून योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. या योजनेची पुढील घोषणा पीएम मोदी 18 जून रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून करतील. हा हप्ता डीबीटीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. देशभरातील सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. 18 जून रोजी सुमारे 20 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे. योजनेचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांनी हस्तांतरित केला.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेला जमा होणार PM किसानचा 17वा हप्ता, वाचा सविस्तर माहिती