मुंबई : आजपासून नवा महिना चालू झाला आहे. या नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशबर मिळाली आहे. आता व्यवसायिक गॅस सिलिंडरचा भाव कमी करण्यात आला आहे. दुसरीकडे या महिन्यापासून बँकांनीही आपले अनेक नियम बदलले आहेत. तेल आणि गॅस क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत सिलिंडरच्या दरात 19-20 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. IOCL च्या संकेतस्थळावर हे नवे दर देण्यात आले असून त्याची अंमलबजावणी 1 मे रोजीपासून केली जाणार आहे


दिल्ली, मुंबईत 19 रुपयांनी स्वस्त


इंडियन ऑईल या कंपनीच्या संकेतस्थळानुसार राजधानी दिल्लीमधअये व्यावसायिक 9 किलो गॅस सिलिंडरचा भाव 1 मेपासून 19 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये व्यासायिक गॅस 1764.50 रुपयांवरून 1745.50 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. रुपये हो गया है. मुंबईमध्येही व्यावसायिक गॅस सिलिंडर (Commercial LPG Cylinder) 19 रुपयांनीच कमी झाला असून त्याचा भाव 1717.50 रुपयांवरून 1698.50 रुपये झाला आहे. चेन्नईमध्येही गॅस सिलिंडर 19 रुपयांनी कमी होऊन 1930 रुपयांवरून 1911 रुपये झाला आहे.


याआधी एप्रिल महिन्यात गॅस सिलिंडर स्वस्त


याआधी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 एप्रलि 2024 रोजी व्यावसायिक LPG Cylinder चा भाव कमी झाला होता. दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात  30.50 रुपयांनी तर कोलकात्यात 32 रुपये, मुंबईत 31.50 रुपये, चेन्नईत 30.50 रुपयांनी स्वस्त झाला होता.


घरगुती गॅसचा भाव जैसे थे


1 मे रोजीपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला असला तरी घरगुती गॅस सिलिंडरचा भाव मात्र जैसे थेच आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. व्यवसायिक गॅस सिलिंडर हा हॉटेल, रेस्टॉरंट येथे वापरला जातो. तर 14.2 कोलो वजनाचा गॅस सिलिंडर हा घरातील स्वयंपाकासाठी वापरला जातो. याच घरगुती गॅस सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 


बँकेच्या नियमांतही अनेक बदल


या महिन्यापासून बँकेच्याही अनेक नियमांत बदल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या बँकांनी बदलले हे नियम वेगवेगळे आहेत. आयडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने तुम्ही फोन बील, वीजबील, इंटरनेट बील, केबल सर्व्हिस, पाणीबील आदी बील देत असाल तर त्यासाठी अतिरिक्त शुल्क मोजावे लागेल. आयसीआयसीआय बँकेच्या चेक बुकचे पहिले 25 चेक हे निशुक्ल असतील. मात्र त्यानंतर प्रत्येक चेकसाठी चार रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. इतरही बँकांचे बदललेले नियम वाचण्यासाठी येथे क्लीक करा.


हेही वाचा :


तुमच्या पीएफ खात्यात अजूनही व्याज जमा झालं नाही? कसं तपासायचं? जाणून घ्या सोप्या स्टेप्स!


आरोग्य, जीवन ते दुर्घटना, आता एकाच पॉलीसीत मिळणार वेगवेगळे विमा लाभ; जाणून घ्या!


प्राप्तिकर आणि TDS यात नेमका फरक काय? 'हे' वाचा गोंधळ दूर होईल!