आरोग्य, जीवन ते दुर्घटना, आता एकाच पॉलीसीत मिळणार वेगवेगळे विमा लाभ; जाणून घ्या!
आपल्याकडे आरोग्य विमा, जीवन वीमा, संपूर्ण कुटुंबाचा विमा, दुर्घटना विमा असे वेगेवगळ्या प्रकारचे विमे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA) एक प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाअंतर्गत वेवगेगळे विमे सामान्यांना एकाच पॉलिसीत मिळणार आहेत.
आयआरडीएच्या या नव्या योजनेचे नाव जन उत्पाद विमान विस्तार असे ठेवले जाऊ शकते. या योजनेअंतर्गत काढण्यात आलेल्या विम्यात जीवन, आरोग्य, दुर्घटना, संपत्ती यांच्यावरच्या विम्याचा समावेश आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार या योजनेअंर्गत लोकांनी पॉलिसी काढली तर त्याला साधारण 1500 रुपयांचा प्रिमियम येऊ शकतो.
हैदराबादमध्ये विमा कंपन्यांच्या सीईओंचे एक सम्मेलन झाले. या बैठकीत IRDA चे अध्यक्ष देबाशीष पांडा यांनी या सर्वसमावेश विम्याबद्दल माहिती दिली. अशा प्रकारच्या विम्याचा प्रिमियम हा 1500 रुपये येऊ शकतो.
अशा प्रकारच्या सर्वसमावेशक विम्यातून वेगवेगळ्या सुविधा दिल्या जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जीवन, स्वास्थ्य, दुर्घटना या बाबतीत दोन लाख रुपयांचा कव्हर मिळू शकतो.
या विम्यात जीवन कव्हरसाठी 800 रुपये तर आरोग्य विम्यासाठी 500 रुपये आणि दुर्घटनेसाठी 100 रुपयांचा प्रिमियम सामील असेल. (टीप- ही फक्त प्रातिनिधीक माहिती आहे. अधिक माहित हवी असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)