मुंबई : सध्या नोकरदार, उद्योजक हे आयटीआर (ITR) म्हणजेच प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याच्या लगबगीत आहेत. या निमित्ताने कराशी संबंधित अनेक गोष्टींची चर्चा होत आहे. या क्षेत्रातील अनेक संकल्पना सामान्य माणसाला माहिती नसतात. त्यामुळे त्या जाणून घेणे गरजेचे आहे. सध्या टीडीएस (उद्गम कर) आणि इन्कम टॅक्स (प्राप्तिकर) यांच्यात नेमका फरक काय आहे? हे जाणून घेऊ या..
प्राप्तिकर म्हणजे काय? (What Is Income Tax)
इन्मक टॅक्सला मराठीत प्राप्तिकर म्हणतात. एखाद्या व्यक्तीच्या, कंपनीच्या एका आर्थिक वर्षातील उत्पन्नावर लागणारा कर म्हणजेच प्राप्तिकर होय. प्रत्येकाच्या उत्पन्नाचे स्त्रोत वेगवेगळे असू शकतात. पगार, भाडे, व्यापार अशा वेगवेगळ्या मार्गांनी मिळवलेले हे उत्पन्न असू शकते. जुन्या करप्रणालीनुसार 2.5 लाख आणि नव्या करप्रणालीनुसार 3 लाख रुपये वार्षिक कमाई असणाऱ्या व्यक्तीला कर द्यावा लागतो.
ट्र्र्रॅक्स स्लॅबनुसार द्यावा लागतो कर
60 ते 80 वर्षे वय असणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 3 लाखांपेक्षा अधिक असेल तर तिला कर भरावा लागतो. तसेच 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तीसाठी ही अट 5 लाख रुपये आहे. केंद्र सरकार दरवर्षी ट्रॅक्स स्लॅब जारी करते. त्यानुसार एखाद्या व्यक्तीला किती कर द्यावा लागणार, हे ठरवले जाते. वर्षभरतील एकूण उत्पन्नावर प्राप्तिकर आकारला जातो.
टीडीएस म्हणजे काय? (What Is TDS)
करचोरी होऊ नये, यासाठी टीडीएसचा वापर केला जातो. एखादी व्यक्ती, संस्था यांना पगार, व्याज, भाडे, प्रोफेशनल फी यावर टीडीएस द्यावा लागतो. आधीच ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार हा कर तुमच्याडून घेतला जातो. कापलेला हा डीटीएस लगेच सरकारच्या खात्यात पाठवला जातो. टीडीएसमध्ये एखाद्या व्यक्तीने वर्षभरात मिळवलेल्या उत्पन्नातून कर वजा करून उर्वरित रक्कम संबंधित व्यक्तीला दिली जाते. पगार, भाडे, लॉटरी, गुंतवणूक, पुरस्कार यावर टीडीएस आकारला जातो. या करप्रणालीत तुम्हाला पैसे देणारी संस्थाच हा कर कापून सरकारकडे पाठवते.
(टीप- या बाबतची अधिक आणि सखोल माहिती हवी असल्यास या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
हेही वाचा :
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डसाठी नवा नियम, सिलिंडर महागणार का? येत्या 1 मे पासून काय काय बदलणार?
आता शेतकरीही होऊ शकतात करोडपती, फक्त करावी लागेल 'ही' शेती; जाणून घ्या सविस्तर
SIP करताय पण चौपट, पाचपट परतावा हवाय? मग 'या' सूत्राचा अवलंब करा अन् खोऱ्याने पैसे ओढा!