Petrol Diesel Price Today: सीएनजी महागलं, पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price Today: दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ झाली असून दुसरीकडे आज इंधन कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) चढ-उतार सुरू आहेत. इंधन दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट आणखी बिघडण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरात होत असलेल्या घसरणीचा फायदा अजूनही ग्राहकांना मिळाला नाही. दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ (CNG Price Hike) झाली आहे. तर, दुसरीकडे इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात (Today Petrol Diesel Price) कोणताही बदल केला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 79.04 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. तर, WTI क्रूड ऑइलचा दर 74.29 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत आहे.
सीएनजीच्या दरात वाढ
दिल्लीत आजपासून सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत सीएनजीचा दर प्रति किलो 95 पैसे इतका वाढला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये 78.61 रुपये प्रतिकिलो इतका सीएनजीचा दर झाला आहे. दिल्ली-एनसीआरमधील सीएनजी दरात वाढ झाल्यानंतर मुंबई, महाराष्ट्रातही सीएनजी दरवाढ होईल का, याकडे वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.
देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
> दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
> मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर
> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
> परभणी: 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
पेट्रोल-डिझेलच्या किमती एका क्लिकवर जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर पाहता येऊ शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील.