Share Market : शेअर बाजारात चढ-उतार सुरूच, Nifty 17, 200 च्या वर तर Sensex 701 अंकांनी घसरला
Stock Market : फार्मा, उर्जा आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये आज मोठी खरेदी झाल्याचं दिसून आलं तर आयटी, मेटल आणि रिअॅलिटीमध्ये विक्री झाली आहे.

मुंबई: या आठवड्यात शेअर बाजारात चढ उतार कायम असल्याचं दिसून आलं आहे. गुरूवारी शेअर बाजारात वाढ दिसल्यानंतर आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 701 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 206 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.23 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,521 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.21 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,245 वर पोहोचला आहे.
आज 1594 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1729 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 104 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, एफएमजीसी, कॅपिटल गुड्स या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही वाढ झाली आहे.
आज शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स 4710 अंकानी वधारत 57,296.31 अंकावर सुरू झाला. निफ्टी 151.10 अंकाची उसळण घेत 17,189.50 वर सुरू झाला. आशियाई शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसत असून त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसत आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- HUL- 4.51n टक्के
- HDFC Life- 4.34 टक्के
- SBI Life Insurance- 3.97 टक्के
- UPL- 3.24 टक्के
- Asian Paints- 3.16 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Bajaj Auto- 1.82 टक्के
- Hindalco- 0.75 टक्के
- Bharti Airtel- 0.68 टक्के
- M&M- 0.43 टक्के
- HCL Tech- 0.28 टक्के
महत्त्वाच्या बातम्या:























