Share Market : शेअर बाजारात घसरण सुरूच, Nifty 16,100 च्या आत तर Sensex 508 अंकांनी घसरला
Stock Market Updates : उर्जा क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली.

मुंबई: शेअर बाजारात घसरण सुरूच असून आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजार घसरला. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 508 अंकांची घसरण झाली असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 157 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 0.94 टक्क्यांची घसरण होऊन तो 53,886 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.97 अंकांची घसरण होऊन तो 16,058 वर पोहोचला. आज शेअर बाजारात 1436 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1784 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 157 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज शेअर बाजार बंद होताना Eicher Motors, Hindalco Industries, Infosys, BPCL आणि Nestle या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Shree Cements, NTPC, Coal India, Adani Ports आणि Bharti Airtel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली. उर्जा क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली.
रुपया घसरला
डॉलरच्या तुलनेत आज रुपया 17 पैशांनी घसरला असून आज एक डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 79.60 इतकी झाली आहे.
शेअर बाजाराची सुरुवात
आज बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 175.45 अंकांच्या घसरणीसह 54,219.78 अंकांवर खुला झाला आहे. तर, निफ्टी 50 चा निर्देशांक निफ्टी 89.80 अंकांच्या घसरणीसह 16,126.20 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 241 अंकांच्या घसरणीसह 54,153.90 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 79 अंकांच्या घसरणीसह 16,136.90 अंकावर व्यवहार करत होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- NTPC- 1.59 टक्के
- Shree Cements- 0.54 टक्के
- Bharti Airtel- 0.37 टक्के
- Adani Ports- 0.37 टक्के
- Coal India- 0.28 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- Eicher Motors- 3.05 टक्के
- Hindalco- 2.61 टक्के
- Infosys- 2.35 टक्के
- BPCL- 2.30 टक्के
- Nestle- 1.97 टक्के



















