Share Market : सलग सहाव्या सत्रात शेअर बाजार वधारला, Nifty 16,700 वर तर Sensex 390 अंकांनी वधारला
Stock Market Update : बँक इंडेक्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली तर आयटी आणि उर्जा इंडेक्समध्ये एक टक्क्यांपर्यंतची घट झाली.
मुंबई: हा आठवडा गुंतवणूकदारांसाठी चांगलाच भरभराटीचा ठरला असून सलग सहाव्या सत्रामध्ये शेअर बाजार वधारला आहे. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 391 वाढ झाली. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 114 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.70
टक्क्यांची वाढ झाली असून तो 56,072 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.69 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,719 अंकांवर स्थिरावला.
आज शेअर बाजार बंद होताना 1732 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1511 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज 143 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज शेअर बाजारात UltraTech Cement, Grasim Industries, UPL, HDFC आणि HDFC Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Tata Consumer Products, Infosys, NTPC, Power Grid Corporation आणि JSW Steel या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. बँक इंडेक्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली तर आयटी आणि उर्जा इंडेक्समध्ये एक टक्क्यांपर्यंतची घट झाली.
रुपया वधारला
डॉलरच्या तुलनेत आज 10 पैशांनी वधारला आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 79.85 इतकी आहे.
आज सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स निर्देशांकाने 55800 अंकांची पातळी ओलांडली. बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 118.89 अंकांनी वधारला. त्यानंतर 250 हून अधिक अंकांनी वधारला. तर, निफ्टीत 56 अंकांची तेजी दिसून आली. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 202 अंकांच्या तेजीसह 55,884.43 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 59.90 अंकांच्या तेजीसह 16,665.15 अंकावर व्यवहार करत होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ
- UltraTechCement- 5.35 टक्के
- Grasim- 3.87 टक्के
- UPL- 2.84 टक्के
- HDFC- 2.39 टक्के
- HDFC Bank- 2.33 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट
- TATA Cons.- 1.74 टक्के
- Infosys- 1.74 टक्के
- NTPC- 1.26 टक्के
- Power Grid Corp- 1.08 टक्के
- JSW Steel- 0.87 टक्के