Share Market : शेअर मार्केट वधारला, Nifty 17,200 वर तर Sensex 776 अंकानी वाढला
Share Market : ऑटो, रिअॅलिटी, उर्जा या क्षेत्रांसह जवळपास सर्वच क्षेत्रांमधील शेअर्सच्या किंमती वाढल्याचं दिसून आलं.

मुंबई: गेल्या दोन सत्रांच्या घसरणीला आज लगाम लागला असून आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 776 अंकांनी वधारला आहे तर निफ्टीही 246 अंकानी वाढला आहे. सेन्सेक्समध्ये 1.37 टक्क्यांची वाढ होऊन तो 57,356 अंकावर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.46 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,200 वर पोहोचला आहे.
आज 1886 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1422 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 108 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना जवळपास सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली असून ऑटो, उर्जा, रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 0.7 ते 1.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात Bajaj Auto, Adani Ports, Hero MotoCorp, Power Grid Corp आणि M&M या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून ONGC, Tata Motors, SBI, Coal India आणि UPL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीने झाली. निफ्टी एक टक्क्यांनी वधारत 17,121 अंकावर सुरू झाला. सेन्सेक्समधील 30 शेअरचा निर्देशांक 485.35 अंकानी वधारत 57,066.24 अंकावर सुरू झाला.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Adani Ports- 5.81 टक्के
- Bajaj Auto- 5.68 टक्के
- Hero Motocorp- 5.18 टक्के
- M&M- 4.00 टक्के
- Power Grid Corp- 3.93 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- ONGC- 1.59 टक्के
- Apollo Hospital- 1.11 टक्के
- Axis Bank- 0.73 टक्के
- Hindalco- 0.41 टक्के
- Asian Paints- 0.16 टक्के























