(Source: Poll of Polls)
US-China Trade War: अमेरिकेकडून बोईंग विमान खरेदी थांबवा, चीनचं विमान कंपनीला फर्मान, ट्रम्प काय करणार? व्यापार युद्धाचा भडका वाढणार?
US-China Trade War : अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये व्यापार युद्धाचा भडका वाढत चालला आहे. आता चीननं या वादात आणखी पुढचं पाऊल टाकलं आहे.

बीजिंग :अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या व्यापार युद्धाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. अमेरिकेनं चीनवर 145 टक्के तर चीननं अमेरिकेवर 125 टक्के टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणापुढं झुकायचं नाही, असं धोरण चीननं घेतलं आहे. शी जिनपिंग यांच्या नेतृत्त्वात चीननं अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. आता चीननं आणखी एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार व्यापार युद्धाचं संकट आणखी गडद झालं आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार चीननं त्यांच्या विमान वाहतूक कंपनीला बोईंग विमानाची डिलीवरी घेण्यापासून रोखलं आहे.
चीननं बोईंग विमान खरेदी रोखण्यामागील कारण टॅरिफ वॉर हे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रकोल टॅक्स लागू करत टॅरिफ वॉर सुरु केलं होतं. चीनच्या विमान खरेदी रोखण्याच्या निर्णयामुळं जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील टॅरिफ वॉरचं संकंट अधिक गडद झाल्याचं मानलं जात आहे. आता ट्रम्प चीनवर या निर्णयानंतर आणखी निर्बंध लादू शकतात.
चीननं त्यांच्या एअरलाईन्सला बोईंग विमान खरेदी करु नये असं म्हटलं. अमेरिकेशी संबंधित कंपन्यांकडून विमानाशी संबंधित साहित्य आणि इतर वस्तू खरेदी बंद करण्याचे आदेश चीननं दिलेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेनं चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 145 टक्के आयात शुल्क लादलं होतं. तर, चीननं ट्रम्प यांच्याकडून लादण्यात आलेले रेसिप्रोकल टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं जाहीर करण्यात आलं. याशिवाय अमेरिकनं उत्पादनांच्या आयातीवर 125 टक्के टॅरिफ लादलं आहे.
अमेरिकेतून आयात करत असलेल्या वस्तूंवर 125 टक्के टॅरिफ लादल्यान अमेरिकेकडून विमान आणि त्याची इतर उपकरणं खरेदी करण्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागू शकते. चीन सरकारकडून बोईंग जेट्स भाडेतत्वावर घेणाऱ्या एअरलाईन्सची मदत केली जाणार आहे.
ट्रम्प यांची चीन विरुद्ध कठोर भूमिका
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केल्यानंतर पुन्हा अचानक टॅरिफला चीन वगळता स्थगिती देण्याची घोषण केली. 90 दिवसांसाठी चीनच्या टॅरिफला स्थगिती देण्यात आली. मात्र, शुक्रवारी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी चीनकडून आयात करण्यात येत असलेल्या स्मार्टफोन, सेमीकंडक्टर, कॉम्प्युटर यासारख्या उत्पादनांना टॅरिफमधून वगळलं होतं.
चीनच्या अमेरिकेनं दिलेली सूट पुरेशी नसल्याचं म्हटलं होतं. तर, ट्रम्प चीनला टॅरिफचा दुरुपयोग करणारा देश म्हणत आहेत. यामुळं दोन्ही देशांमधील टॅरिफ वॉर वाढू शकतं. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचं चीन विरोधातील आक्रमक धोरण कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.




















