एक्स्प्लोर

काय सांगता, आता सोन्याचा संपूर्ण देशात एकच भाव? लवकरच होणार मोठा बदल!

देशात सध्या प्रत्येक भागात सोन्याचा दर वेगळा असतो. मात्र आता केंद्र सरकार संपूर्ण देशात सोन्याचा दर एकच राहावा यासाठी वन नेशन वन रेट हे धोरण लागू करण्याचा विचार करत आहे.

Gold Rate: आपल्या देशात वेगवेगळ्या शहरात सोन्याचा दर वेगवेगला असतो. सोने, चांदीचा दर प्रत्येक राज्यात वेगळा असतो. त्यासाठी वेगवेगळा कर आहे. मात्र आता लवकरच देशातील सर्व राज्यांत तसेच शहरांत सोने, चांदीचा दर एकच असण्याची शक्यता आहे. म्हणजेच सोने-चांदीच्या दराच्या बाबतीत वन नेशन वन रेट ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. हे धोरण लागू झाल्यानंतर देशात कोणत्याही भागात सोन्याचा दर एकच असेल. या धोरणामुळे सोन्याचे व्यापारी, ज्वेलर्स यांनादेखील फायदा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे धोरण लागू करण्यासाठी देशातील अनेक ज्वेलर्सनेही सहमती दर्शवली आहे.  

जेम अँड ज्वेलरी काऊन्सिलचा पाठिंब

सोन्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात 'वन नेशन, वन रेट' (One Nation One Rate) धोरण लागू करण्यास जेम अँड ज्वेलरी काऊन्सीलने (GJC) समर्थन दिले आहे. या धोरणाच्या मदतीने देशात प्रत्येक भागात सोन्याचा दर एकच अशेल. वेगवेगळ्या माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार सप्टेंबर 2024 मध्ये या धोरणाबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. या धोरणाचे काही फायदे असले तरीही ते लागू झाल्यानंतर वेगळी आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे. याच आव्हानांना तोंड देण्याची आता तयारी केली जात आहे.

वन नेशन, वन रेट पॉलिसीने नेमकं काय होणार? 

केंद्र सरकारतर्फे वन नेशन वन रेट हे धोरण राबवण्यावर विचार केला जात आहे. संपूर्ण देशात सोन्याचा दर एकच असावा, असे केंद्र सरकारचे मत आहे. हे धोरण लागू झाल्यानंतर तुम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकात असे मेट्रो शहर असूदेत किंवा एखादं छोटं शहर असूदेत सर्व ठिकाणी सोने खरेदी करण्यासाठी एकच किंमत द्यावी लागेल. या धोरणाअंतर्गत केंद्र सरकार नॅशनल बुलियन एक्स्चेंज (National Bullion Exchange)  तयार करणार आहे. या आस्थापनेच्या माध्यमातून सोन्याचा एकच दर निश्चित केला जाणार आहे. या आस्थापनेने सोन्याचा दर निश्चित केल्यावर ज्वेलर्सना सोने एकाच किमतीवर विकावे लागेल. 

वन नेशन, वन रेटचा सामान्यांना काय फायदा? 

देशात वन नेशन, वन रेट लागू झाल्यानंतर पारदर्शकता येईल, असा दावा केला जातोय. सध्या देशात सोन्याचा दर सगळीकडे वेगवेगळा असतो. त्यामुळे हा दर कुठे कमी असतो तर कुठे तो जास्त असतो. अनेक ठिकाणी ज्वेलर्स मनमानी पद्धतीने सोन्याचा दर लागू करतात. मात्र वन नेशन लागू झाल्यानंतर यावर लगाम बसू शकतो. दरम्यान, गेल्या काही वर्षांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतिग्रॅम 74000 रुपयांवर आहे.

हेही वाचा :

'हा' म्युच्यूअल अल फंड चांगलाच भारी, 8 दिवसांत 9 टक्क्यांनी रिटर्न्स!

टाटा-BSNL यांच्यात 15 हजार कोटींचा करार, जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढणार?

प्राप्तिकर विभागाचा नाद नको! 1 रुपयासाठी नोटीस आली, घालवावे लागले तब्बल 50000 रुपये!

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Embed widget