कॅरम मोबिलिटीची उबरशी भागीदारी, मुंबईतील नेटवर्कचा विस्तार करणार
Carrum Mobility Solutions : कारदेखो समूहाच्या धोरणात्मक गुंतवणूक आणि समर्थनासह कॅरम भारताच्या ताफा व्यवस्थापन क्षेत्रात मोठा बदल घडवण्याच्या मार्गावर आहे.
मुंबई : कॅरम ही एक फ्लीट मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी आहे. उबरशी भागीदारी करून ही कंपनी मुंबईत आपले नेटवर्क वाढवत आहे. मुंबईत असलेली मागणी आणि पुरवठा यातील मोठी दरी आणि मुंबईतील गतिशील मार्केटमधील प्रदीर्घ प्रतीक्षा कालावधी पाहून सदर विस्तार करण्यात येत आहे. या विस्तारामुळे कॅरमला आपल्या सेवा देशाच्या आर्थिक राजधानीत स्थापित करण्याची आणि मुंबईकरांसाठी उपलब्धता आणि सोय वाढवण्याची संधी मिळाली आहे. कारदेखो समूहाच्या धोरणात्मक गुंतवणूक आणि समर्थनासह कॅरम भारताच्या ताफा व्यवस्थापन क्षेत्रात मोठा बदल घडवण्याच्या मार्गावर आहे.
हा विस्तार कॅरमच्या दीर्घकालीन विकास धोरणातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि कंपनीला आशा आहे की आगामी वर्षांमध्ये हा प्रदेश त्यांच्या एकूण ताफ्यात आणि उत्पन्नात 20 टक्क्यांचे योगदान देईल. मुंबईत एंट्री घेऊन कॅरमने केवळ मार्केटमधली आपली स्थिती मजबूत केली नाही, तर मुख्य महानगर क्षेत्रांत एक सशक्त आणि शाश्वत नेटवर्क उभे करण्याच्या आपल्या ध्येयाला बळकटी देखील दिली आहे.
कॅरमचे संस्थापक करण जैन म्हणाले, “प्रस्तुत विस्तार हा फ्लीट मॅनेजमेंट क्षेत्रात क्रांती घडवण्याच्या आमच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आम्ही आत्मविश्वासाने संचालन वाढवत आहोत आणि सेवेतील उत्कृष्टता, चालकांचे हित आणि शाश्वत पद्धती यावर लक्ष ठेवून आहोत. केवळ मोठमोठे आकडे साध्य करणे हेच नाही, तर मोबिलिटी ईकोसिस्टममध्ये एक असा चिरकाल टिकणारा, सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याचे आमचे लक्ष्य आहे, ज्याच्यामुळे ग्राहक आणि चालक भागीदार या दोघांनाही फायदा होईल.”
ही कंपनी वर्तमान बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती ठळक करत आहे. डिसेंबर 2024 पर्यंत मुंबई, बंगळूर आणि हैदराबादमध्ये मिळून १२०० वाहनांचा ताफा संचालित करण्याची कॅरमची अपेक्षा आहे, जी त्यांच्या संचालनातील मोठी वाढ असेल. आर्थिक वर्ष 2025 च्या अखेरपर्यंत देशाच्या मोठ्या शहरांत 1500 पेक्षा जास्त वाहने संचालित करण्याच्या कॅरमच्या व्हिजनचा एक भाग म्हणजे त्यांचा हा प्रादेशिक विस्तार आहे.