Buzz Works India च्या माध्यमातून तरुणांना मिळतोय रोजगार, कंपनी करतेय 500 कोटींची उलाढाल
कंपन्यांमध्ये डिलिव्हरी मॅन म्हणून काम करणाऱ्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध देण्याचं काम बझ वर्क्स इंडिया ( Buzz Works India) करते. काही वर्षातच या कंपनीने 500 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.
Buzzworks: सध्या देशात वेगानं ई-कॉमर्स व्यवसाय वाढत आहे. या कंपन्यांमध्ये डिलिव्हरी मॅन म्हणून काम करणाऱ्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध देण्याचं काम बझ वर्क्स इंडिया ( Buzz Works India) करते. काही वर्षातच या कंपनीने 500 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. VC कार्तिक हे Buzz Works India चे संस्थापक आहेत. एकदा कंपनीला कंत्राटी कर्मचाऱ्यांची गरज भासली की, ती कंपनी त्याच्याशी संपर्क साधते. त्यांतर ते त्यांच्या नेटवर्कनुसार लोकांना तयार करुन त्यांना कंपनीत संबंधित नोकऱ्यांवर नियुक्त करतात.
अकुशल तरुणांना कुशल करुन नोकरी देण्याचं काम
डिलिव्हरी, वर्कशॉप आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेअरहाऊसमध्ये. 18000 ते 40000 पर्यंत पगार उपलब्ध होत असल्याचे VC कार्तिक म्हणाले. जर एखाद्या कंपनीला कुशल कामगारांची गरज असेल, तर त्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या अनेक जॉब वेबसाइट्स उपलब्ध आहेत. परंतू, सर्वात मोठे आव्हान हे अकुशल तरुणांना नोकरी देण्याचे आहे. देशाच्या दुर्गम भागातील तरुणांना रोजगार देण्यासाठी त्यांच्याकडे 400 हून अधिक कर्मचारी आहेत, जे देशाच्या विविध भागात मॅन्युअली मनुष्यबळ शोधतात. त्यांना कंपनीनुसार प्रशिक्षण देऊन नोकरी देतात.
अकुशल कामगारांना हार्ड आणि सॉफ्ट स्किल्समध्ये प्रशिक्षण
आमच्याबद्दल चांगली गोष्ट म्हणजे अकुशल कामगारांना हार्ड आणि सॉफ्ट स्किल्समध्ये प्रशिक्षण देऊन, आम्ही त्यांना त्यांचे पगार वाढवण्यात आणि जीवनमानाचा दर्जा सुधारण्यात मदत करत असल्याचे बझ वर्क्स इंडियाचे व्हीसी कार्तिक म्हणाले. अनेकवेळा देशातील ग्रामीण भागातील तरुणांना सामान्य संगणक ऑपरेशन देखील माहित नसते, अशा गोष्टीपासून आम्ही कामगारांना कुशल करण्याचे काम करत असल्याचे व्हीसी कार्तिक यांनी सांगितलं.
प्रशिक्षणानंतर पगारवाढ मिळते
ई-कॉमर्स कंपन्यांसाठी 15,000 पर्यंत पगार असलेले डिलिव्हरी पर्सन म्हणून काम करणारे लोक थोड्या प्रशिक्षणानंतर 18 ते 20 किंवा अगदी 22,000 आणि 25,000 पर्यंत कमाई करू लागतात असे व्हीसी कार्तिक म्हणाले. त्यांची कंपनी शाश्वत आर्थिक वाढीच्या मॉडेलवर काम करत आहे. प्रत्येक तरुणांना दोन ते तीन वर्षांचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून त्यांचे उत्पन्न आणि कौशल्यासोबत त्यांचे राहणीमान सुधारू शकेल. जर एखाद्या तरुणाला काम कसे करायचे हे माहित असेल परंतू, काही कारणास्तव पदवी मिळवता आली नाही, तर बझ वर्क्स इंडिया देखील त्याला पदवी मिळविण्यात मदत करते, जेणेकरून त्याला नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतील असे व्हीसी कार्तिक म्हणाले. अनेक सरकारी एजन्सी त्यांना देशातील दुर्गम भागातील कामावर घेण्यास मदत करतात. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांची जास्त गरज आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओरिसा या राज्यांमध्ये लोकांकडे काम कमी आहे. त्यानुसार, ती या राज्य सरकारांकडून तरुणांची माहिती गोळा करते.
महत्त्वाच्या बातम्या: