जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील वॉरन बफे यांच्याकडे रोख रक्कम किती? एकूण तुम्हाला बसेल धक्का, सविस्तर माहिती एका क्लिकवर
वॉरन बफेट (Warren Buffett) हे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी एक मोठे नाव आहे. त्यांच्या गुंतवणुकीचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होतो. त्यांच्याकडे रोख रक्कम किती याबाबतची माहिती पाहुयात.
Warren Buffett : जगात अनेक श्रीमंत लोक आहे. यातीलच एक नाव म्हणजे वॉरन बफेट (Warren Buffett). बफे हे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी एक मोठे गुंतवणूकदार आहेत. त्यांच्या गुंतवणुकीचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होतो. दरम्यान, बफे यांच्याकडे रोख रक्कम किती आहे? याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
वॉरन बफे हे एक व्यापारी, परोपकारी आणि जागतिक स्तरावर सर्वात यशस्वी आणि व्यापकपणे सन्मानित गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. वॉरेन बफेटच्या बर्कशायर हॅथवेचा म्युच्युअल फंडात मोठा रोख साठा आहे. यामध्ये 168 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 13.9 लाख कोटी रुपये आहेत. या सर्व रकमेची भारताच्या एकूण म्युच्युअल फंड बाजाराशी तुलना केल्यास त्यांच्याकडील रोख साठा सुमारे 10 पट जास्त आहे. बफे यांच्याकडील रोख रखमेची स्थिती आशी आहे की, त्यांच्याकडील रोख रक्कम नेमकी कोठे गुंतवावी.
भारताच्या म्युच्युअल फंड मार्केटमधील गुंतवणुकीत वाढ
दरम्यान, भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे भारताच्या म्युच्युअल फंड मार्केटमध्ये दिवसेंदिवस गुंतवणूक वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंड मार्केटमध्ये 4.82 टक्के अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांकडे 1.33 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मात्र, . मात्र, वॉरन बफे यांच्याकडील गुंतवणुकीचा विचार केला तर त्यांची गुंतवणूक ही भारताच्या कितीतरी पट जास्त आहे. वॉरन बफे यांची रोख गुंतवणूक ही 13.9 लाख कोटी रुपये आहे.
वॉरेन बफे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सातव्या स्थानावर
वॉरेन बफे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत. चालू वर्षात वॉरेन बफेच्या एकूण संपत्तीत 15.4 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंतांमध्ये जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 188.2 अब्ज डॉलर, बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर, बर्नार्ड ऑर्नोल्ट फॅमिली तिसऱ्या क्रमांकावर, मार्क जुकरबर्ग चौथ्या क्रमांकावर, स्टीव बॉल्मप पाचव्या क्रमांकावर, लॅरी एलिसन सहाव्या क्रमांकावर वॉरेन बफेट सातव्या क्रमांकावर आहेत.
महत्वाच्या बातम्या: