एक्स्प्लोर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा फायदा, एलन मस्क यांच्या संपत्तीत तब्बल 4 लाख कोटींची वाढ, टेस्लाच्या शेअर्सही सुसाट 

एलन मस्क यांच्या संपत्तीत (Elon Musk wealth) मोठी वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे.

Elon Musk wealth: एलन मस्क यांच्या संपत्तीत (Elon Musk wealth) मोठी वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. 5 नोव्हेंबरपासून एलन मस्कच्या संपत्तीत 50 अब्ज डॉलर्स म्हणजेच 4 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. एलन मस्कच्या कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये देखील मोठी वाढ जाली आहे. शेअर्समध्ये 4 नोव्हेंबरपासून 32 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

एलन मस्कच्या एकूण संपत्तीत 84.7 अब्ज डॉलर्सची वाढ

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांना त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या मैत्रीचा फायदा झाला आहे. जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या निवडणुका जिंकत आहेत. तेव्हापासून एलन मस्कच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एलन  मस्क यांची संपत्ती 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. 5 नोव्हेंबरपासून इलॉन मस्कच्या संपत्तीत 50 अब्ज डॉलर्स म्हणजेच 4 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर एलन  मस्क यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स डेटानुसार, 5 नोव्हेंबर रोजी एलोन मस्कची एकूण संपत्ती 264 अब्ज डॉलर होती. जी सध्या 314 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. याचा अर्थ एलन मस्कच्या संपत्तीत 50 अब्ज डॉलर्स म्हणजेच 4.20 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर शुक्रवारी एलन मस्कच्या संपत्तीत 17 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जर आपण चालू वर्षाबद्दल बोललो तर एलन मस्कच्या एकूण संपत्तीत 84.7 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

3 वर्षांनंतर 300 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार 

एलन मस्कची एकूण संपत्ती आता 300 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. तब्बल 3 वर्षानंतर एलन मस्कची संपत्ती 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, नोव्हेंबर 2021 मध्ये, एलन मस्कची एकूण संपत्ती 300 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. पुढील आठवड्यात एलन मस्कची एकूण संपत्ती 350 अब्ज डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

टेस्लाचे शेअर्स वाढले

एलन मस्कच्या संपत्तीत वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे टेस्लाच्या शेअर्समध्ये झालेली वाढ. 4 नोव्हेंबरनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, Nasdaq वर कंपनीचे शेअर्स 242.84 डॉलरवर होते. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये प्रति शेअर 78.38 डॉलरची वाढ झाली आहे. सध्या कंपनीचे समभाग 321.22 डॉलरवर आले आहेत. शुक्रवारी, कंपनीच्या समभागांमध्ये 8 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आणि ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीच्या समभागांनी 52 आठवड्यात 328.71 डॉलरची विक्रमी पातळी गाठली.

महत्वाच्या बातम्या:

हम बाराह...! एलन मस्क बनले आपल्या बाराव्या बाळाचे वडील; न्यूरोलिंकच्या संचालक मस्कच्या मुलाच्या आई

महत्त्वाच्या बातम्या

Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget