एक्स्प्लोर

Business Idea : कमी खर्चात मिळवा भरपूर नफा, घरबसल्या करा 'हे' काम

आज आम्ही तुम्हाला एक उत्तम व्यवसायाबद्दल (Business Idea) माहिती सांगणार आहोत. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करु शकता.

Business Idea: सध्याच्या या महागाईच्या युगात चांगला पैसा मिळवणे खूप गरजेचे आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही स्वतःचे काहीतरी सुरु करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक उत्तम व्यवसायाबद्दल (Business Idea) माहिती सांगणार आहोत. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करु शकता. हे काम तुमच्या घरातील कोणीही स्त्री किंवा पुरुष करु शकते. आम्ही तुम्हाला आज पॅकिंगच्या (Packing) कामाबद्दल माहिती सांगणार आहोत. 

तुम्ही तुमच्या घरातील खोलीतून पॅकिंगचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही हा व्यवसाय अतिशय कमी खर्चात सुरू करू शकता. या माध्यमातून चांगला नफा देखील मिळवू शकता. हा व्यवसाय घरबसल्या पैसे कमवण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो.

कशी कराल सुरुवात ? 

या कामात तुम्हाला कंपनीचे उत्पादन पॅक करुन कंपनीला परत पाठवावे लागते. जेव्हा कंपनी आपले उत्पादन तयार करते, तेव्हा ती त्याचे पॅकेज करते. पॅकेजिंग अशी गोष्ट आहे, ज्यामुळे ग्राहक खूप प्रभावित होतात. पॅकेजिंग जितके चांगले असेल तितके ग्राहक आकर्षित होतील. यासाठी मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी खूप पैसा खर्च करतात. अशा परिस्थितीत अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या आपले उत्पादन बनवल्यानंतर हाताने पॅकिंग करून घेतात. लोकांना पॅकेजिंगचे काम देतात. अशा परिस्थितीत तुम्ही हे काम घरात बसून चांगले पैसे कमवू शकता.

पॅकिंगचे काम दोन प्रकारे

तुम्ही पॅकिंगचे काम दोन प्रकारे सुरु करू शकता. पहिला मार्ग म्हणजे तुम्ही थेट कंपनीशी संपर्क साधून त्यांची उत्पादने पॅक करण्याचे काम करु शकता. दुसरे म्हणजे, तुम्ही तुमच्या जवळच्या घाऊक विक्रेते किंवा किरकोळ विक्रेत्यांकडून पॅकिंगचे काम घेऊ शकता आणि याद्वारे पैसे कमवू शकता.

कंपनीकडून अशा प्रकारे पॅकिंगचे काम घ्या

कंपनीकडून काम मिळवण्यासाठी तुम्ही त्याच्या मालकाकडे किंवा व्यवस्थापकाकडे जाऊन त्याबद्दल बोलू शकता. जर तुमच्या जवळ कोणतीही कंपनी नसेल, तर आजकाल इंटरनेटवर अशा अनेक कंपन्या आहेत ज्या घरी बसून लोकांना ऑनलाइन पॅकिंगचे काम देतात. अशा परिस्थितीत तुम्हाला हे काम ऑनलाइनही मिळू शकते. careerjet, indiamart, flipkart, amazon, olx, naukri.com, indeed jobs.com सारख्या अनेक वेबसाइट्स तुम्हाला ऑनलाइन पॅकिंगचे काम देऊ शकतात.

घाऊक दुकान आणि किरकोळ विक्रेत्याशी संपर्क साधा

याशिवाय तुम्ही घाऊक दुकान किंवा किरकोळ दुकानातून पॅकिंगचे कामही घेऊ शकता. यासाठी तुमच्या जवळच्या घाऊक किंवा किरकोळ दुकानाशी संपर्क साधा. अनेक घाऊक आणि किरकोळ विक्रेते आहेत जे कंपन्यांकडून किंवा मोठ्या व्यावसायिकांकडून स्वस्त दरात कच्चा माल विकत घेतात आणि ते पॅकिंग करून त्यांच्या दुकानात विकतात. अशा परिस्थितीत मसाले, सुका मेवा, पापड, मैदा, गहू, खेळणी, फॅन्सी वस्तू इत्यादी पॅकिंगचे काम तुम्हाला सहज मिळू शकते.

तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा

जर तुम्हाला स्वतःचे पॅकिंगचे काम करायचे असेल तर तुम्ही कमी खर्चात पॅकिंग व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे स्वतःचे उत्पादन पॅक करुन बाजारात विकावे लागेल. सुरुवातीला तुम्ही फक्त हाताने पॅकिंग करु शकता. मग तुमचे उत्पन्न वाढले की तुम्ही पॅकिंग मशीन देखील खरेदी करु शकता. 5 ते 6 हजार रुपये गुंतवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करु शकता. या व्यवसायातून तुम्ही महिन्याला 20 ते 25 हजार रुपये सहज कमवू शकता.

महत्त्वाच्या बातम्या:

 ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँकेची खास योजना, अधिक नफा कमावण्याची सर्वोत्तम संधी

महत्त्वाच्या बातम्या

Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget