फ्लिपकार्ट, ॲमेझॉननंतर आता सॅमसंगचा मोठा 'फॅब ग्रॅब फेस्ट'ची चर्चा, स्मार्ट टीव्ही, टॅब्लेट्सवर अभूतपूर्व सूट मिळणार!
सॅमसंग, अॅमेझॉनंतर आता सॅमसंग या कंपनीने फॅब ग्रॅब फेस्टच्या माध्यमातून ग्राहकांसाठी चांगल्या ऑफर्स आणल्या आहेत. या फॅब ग्रॅब फेस्टच्या माध्यमातून ग्राहकांना वेगवेगळ्या उत्पादनांवर बम्पर सूट मिळणार आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजची तसेच अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलची चर्चा होत आहे. असे असतानाच आता सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने त्यांचा सर्वात मोठा फेस्टिव्ह सेल 'फॅब ग्रॅब फेस्ट'ची घोषणा केली आहे. 26 सप्टेंबरपासून या फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. या सेलदरम्यान गॅलॅक्सी स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स, अॅक्सेसरीज, वेअरेबल्स, स्मार्ट टेलिव्हिजन्स, डिजिटल अप्लायन्सेस आणि स्मार्ट मॉनिटर्सवर आकर्षक डिल्स व कॅशबॅक ऑफर करण्यात आली आहे. या अभूतपूर्व ऑफर्स Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्समध्ये उपलब्ध असतील.
बाय मोअर सेव्ह मोअर
या फेस्टिव्ह सेलची खासियत असणार आहे बाय मोअर सेव्ह मोअर, जेथे ग्राहक दोन किंवा अधिक उत्पादनांच्या खरेदीवर अतिरिक्त जवळपास ५ टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात. ही ऑफर Samsung.com किंवा सॅमसंग शॉप अॅपच्या माध्यमातून खरेदी करताना फक्त निवडक स्मार्टफोन्स, वेअरेबल्स, स्मार्ट टेलिव्हिजन्स आणि डिजिटल अप्लायन्सेसवर लागू आहे.
बाय मोअर सेव्ह मोअरचा भाग म्हणून, गॅलॅक्सी झेड फोल्ड६ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना इतर सर्व लागू ऑफर्ससोबत गॅलॅक्सी बड्स एफई फक्त १२४९ रूपयांमध्ये मिळू शकतो. तसेच, गॅलॅक्सी बुक४ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एफएचडी फ्लॅट मॉनिटर फक्त १९२० रूपयांमध्ये मिळू शकतो. विना अतिरिक्त खर्चामध्ये इतर अनेक उत्पादने देखील उपलब्ध आहेत, जसे ग्राहकाने बीस्पोक फॅमिली हब फ्रिज खरेदी केल्यास कन्वेक्शन मायक्रोवेव्ह आणि निओ क्यूएलईडी ८के स्मार्ट टेलिव्हिजन खरेदी केल्यास क्यू-सिम्फोनी साऊंडबार.
कॅशबॅक ऑफर्स आणि एक्स्चेंज डिल्स
सॅमसंगची अधिक मूल्य वितरित करण्याप्रती कटिबद्धता फॅब ग्रॅब फेस्टला वरचढ ठरवते. किमतीमध्ये सूट, बँक कॅशबॅक ऑफर्स आणि एक्स्चेंज डिल्स व्यतिरिक्त 'बाय मोअर, सेव्ह मोअर' खात्री देते की, Samsung.com ग्राहकांना स्मार्टफोन्स, अॅक्सेसरीज, स्मार्ट टेलिव्हिजन्स किंवा डिजिटल अप्लायन्सेस असो, प्रत्येक खरेदीसाठी अधिक फायदा मिळतो.
फॅब ग्रॅब फेस्ट सर्वोत्तम किमती देण्यासोबत सॅमसंगच्या विश्वसनीय डायरेक्ट-टू कंझ्युमर चॅनेल्सच्या माध्यमातून अद्वितीय मूल्य देखील देईल. स्पेशल डिल्ससोबत, ग्राहकांना दर्जा, अस्सलता आणि उत्पादन उपलब्धतेची देखील खात्री मिळू शकते.
'फॅब ग्रॅब फेस्ट'दरम्यान ग्राहकांना गॅलॅक्सी झेड सिरीज, गॅलॅक्सी एस सिरीज आणि गॅलॅक्सी ए सिरीज स्मार्टफोन्सच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ५३ टक्के सूट मिळू शकते. गॅलॅक्सी बुक४ सिरीज लॅपटॉप्सचे निवडक मॉडेल्स जवळपास २७ टक्के सूटसह उपलब्ध असतील, तर टॅब ए९ व टॅब एस९ सिरीज, बड्स३ सिरीज, गॅलॅक्सी वॉच सिरीजच्या विशिष्ट मॉडेल्सवर जवळपास ७४ टक्के सूट मिळेल.
या ऑफर्स स्मार्टफोन्सव्यतिरिक्त इतर डिवाईसेसवर देखील आहेत. सॅमसंग स्मार्ट टेलिव्हिजन्स - निओ क्यूएलईडी ८के, निओ क्यूएलईडी, क्यूएलईडी, द फ्रेम आणि क्रिस्टल ४के यूएचडी, द फ्रीस्टाइल प्रोजेक्टर यावर जवळपास ४३ टक्के सूट मिळेल. तसेच, निवडक ५५-इंच व त्यापेक्षा मोठ्या आकाराचे मॉडेल्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोफत सॅमसंग स्मार्ट टेलिव्हिजन किंवा साऊंडबार मिळेल. या फेस्टिव्ह सेलदरम्यान, सॅमसंग निवडक ३२ इंच व त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या स्मार्ट टेलिव्हिजन्सवर मोफत तीन वर्षांची कॉम्प्रेहेन्सिव्ह वॉरंटी देखील देईल.
सॅमसंगचे मॉनिटर्स जवळपास ६७ टक्के सूटसह उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त, निवडक स्मार्ट व गेमिंग मॉनिटर्सवर जवळपास १०,००० रूपयांची त्वरित कार्ट सूट मिळू शकते.
वॉशिंग मशिन्सवर जवळपास २८ टक्के सूट
उत्साह इथेच थांबत नाही, ग्राहकांना साइड बाय साइड आणि फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर्स यांसारख्या प्रीमियम अप्लायन्सेसच्या व्यापक श्रेणीवर जवळपास ३९ टक्के सूट मिळू शकते. ग्राहकांना डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर्सवर २० वर्षांची वॉरंटी देखील मिळेल. ८ किग्रॅ व त्यापेक्षा अधिक क्षमता असलेल्या फ्रण्ट लोड व टॉप लोड वॉशिंग मशिन्सवर जवळपास २८ टक्के सूट आणि डिजिटल इन्व्हर्टर मोटरवर २० वर्षांची वॉरंटी मिळेल. निवडक ९ किग्रॅ फुली ऑटोमॅटिक फ्रण्ट-लोडिंग वॉशिंग मशिन्सवर जवळपास २,००० रूपयांची त्वरित कार्ट सूट देखील मिळेल.
आयसीआयसीआय, एचडीएफसी व एसबीआय आणि इतर आघाडीच्या बँकांवर कॅशबॅक
ग्राहक फॅब ग्रॅब फेस्टदरम्यान आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि इतर आघाडीच्या बँकांच्या डेबिट व क्रेडिट कार्ड्सचा वापर करत निवडक स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, वीअरेबल्स व लॅपटॉप्सवर जवळपास ४० टक्के कॅशबॅक (जवळपास १५,००० रूपये)चा आनंद घेऊ शकतात.
तसेच, फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्सचा भाग म्हणून निवडक स्मार्ट टेलिव्हिजन्स व डिजिटल अप्लायन्सेसच्या खरेदीसाठी ग्राहक आयसीआयसीआय, एचडीएफसी एसबीआय आणि इतर आघाडीच्या बँकांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सचा वापर करत जवळपास २२.५ टक्के कॅशबॅक (जवळपास २५,००० रूपये)चा लाभ घेऊ शकतात.
- गॅलॅक्सी झेड सिरीज, एस सिरीज, ए सिरीज, एम सिरीज आणि एफ सिरीज स्मार्टफोन्सच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ५३ टक्के सूट
- गॅलॅक्सी टॅब्लेट्स, वॉचेस् आणि बड्सच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ७४ टक्के सूट
- निओ क्यूएलईडी, क्यूएलईडी, ओएलईडी, ४के यूएचडी स्मार्ट टेलिव्हिजन्स आणि द फ्रीस्टाइल प्रोजेक्टरच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ४३ टक्के सूट
- निवडक रेफ्रिजरेटर्ससह डिजिटल अप्लायन्सेसवर जवळपास ३९ टक्के सूट आणि निवडक वॉशिंग मशिन्सवर जवळपास २८ टक्के सूट
फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स
उत्पादने / श्रेणी |
ग्राहक ऑफर |
विशिष्ट मॉडेल्स |
स्मार्टफोन्स |
जवळपास ५३ टक्के सूट |
गॅलॅक्सी झेड फोल्ड६,गॅलॅक्सी झेड फ्लिप६, गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रा, गॅलॅक्सी एस२४+, गॅलॅक्सी एस२४, गॅलॅक्सी एस२३ अल्ट्रा, गॅलॅक्सी एस२३+, गॅलॅक्सी एस२३, गॅलॅक्सी एस२३ एफई, गॅलॅक्सी ए५५ ५जी, गॅलॅक्सी ए३५ ५जी, गॅलॅक्सी एम३५ ५जी, गॅलॅक्सी एम१५ ५जी, गॅलॅक्सी एफ५५ ५जी |
लॅपटॉप्स |
जवळपास २७ टक्के सूट |
गॅलॅक्सी बुक४ प्रो ३६०, गॅलॅक्सी बुक४ प्रो, गॅलॅक्सी बुक४ ३६०, गॅलॅक्सी बुक४ |
टॅब्लेट्स, अॅक्सेसरीज आणि वीअरेबल्स |
जवळपास ७४ टक्के सूट |
गॅलॅक्सी टॅब एस१० सिरीज, गॅलॅक्सी टॅब एस९ सिरीज, गॅलॅक्सी टॅब एस९ एफई+, गॅलॅक्सी टॅब एस९ एफई, गॅलॅक्सी टॅब ए९+, गॅलॅक्सी टॅब ए९, गॅलॅक्सी वॉच७ सिरीज, गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा, गॅलॅक्सी वॉच एफई, गॅलॅक्सी बड्स३ प्रो, गॅलॅक्सी बड्स३, गॅलॅक्सी बड्स एफई, गॅलॅक्सी फिट३ |
टेलिव्हिजन्स |
जवळपास ४३ टक्के सूट स्पेशल ऑफर: मोफत निओ क्यूएलईडी ८के, निओ क्यूएलईडी, क्रिस्टल ४के यूएचडी टेलिव्हिजन्स आणि साऊंडबार्स* ३ वर्ष कॉम्प्रेहेन्सिव्ह वॉरंटी^ |
निओ क्यूएलईडी ८के, क्यूएलईडी, द फ्रेम, क्रिस्टल ४के यूएचडी, द फ्रीस्टाइल *निवडक ५५ इंच व त्यापेक्षा मोठ्या आकाराचे टेलिव्हिजन्स ^निवडक ३२ इंच व त्यापेक्षा मोठ्या आकाराचे टेलिव्हिजन्स |
रेफ्रिजरेटर्स |
जवळपास ३९ टक्के सूट डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसेरवर २० वर्षांची वॉरंटी जवळपास ५,००० रूपयांची त्वरित कार्ट सूट मिळवा** ईएमआयची सुरूवात: फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर्स आणि साइड बाय साइड रेफ्रिजरेटर्ससाठी प्रतिमहिना ३९९० रूपये. स्पेशल ऑफर:- साइड बाय साइड किंवा फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर्स खरेदी करा आणि ४४९ रूपयांमध्ये एक वर्षाची विस्तारित वॉरंटी मिळवा~ |
सर्व साइड बाय साइड आणि फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर्स **निवडक साइड बाय साइड रेफ्रिजरेटर्स ~ निवडक साइड बाय साइड आणि फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर्स (आरएफ८७ / आरएफ९०) |
वॉशिंग मशिन्स |
जवळपास २८ टक्के सूट डिजिटल इन्व्हर्टर मोटरवर २० वर्षांची वॉरंटी फुली ऑटोमॅटिक फ्रण्ट लोडिंग: ईएमआय १९९० रूपयांपासून सुरू फुली ऑटोमॅटिक टॉप लोडिंग: ईएमआय ९९० रूपयांपासून सुरू जवळपास २,००० रूपयांची त्वरित कार्ट सूट मिळवा^^^ |
८ किग्रॅ व त्यापेक्षा अधिक क्षमतेचे सर्व फ्रण्ट लोड । ८ किग्रॅ किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचे टॉप लोड वॉशिंग मशिन्स ^^^ निवडक ९ किग्रॅ फुली ऑटोमॅटिक फ्रण्ट लोडिंग मॉडेल्स |
मायक्रोवेव्ह्ज |
जवळपास ३१ टक्के सूट सिरॅमिक एनामेल कॅव्हिटीवर १० वर्षांची वॉरंटी जवळपास ५०० रूपयंची त्वरित कार्ट सूट मिळवा~~ |
सर्व मायक्रोवेव्ह्ज ~~ निवडक २८ लिटर कन्वेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हन्स |
मॉनिटर्स |
जवळपास ६७ टक्के सूट जवळपास १०,००० रूपयांची त्वरित कार्ट सूट मिळवा*** |
सर्व मॉनिटर्स ***निवडक स्मार्ट व गेमिंग मॉनिटर्स |
बँक कॅशबॅक |
आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि इतर आघाडीचे बँक डेबिट व क्रेडिट कार्ड्ससह जवळपास ४० टक्के कॅशबॅक (जवळपास १५००० रूपये) ## आयसीआयसीआय, एचडीएफसी, एचबीआय आणि इतर आघाडीचे बँक कार्ड्ससह जवळपास २२.५ टक्के कॅशबॅक (जवळपास २५००० रूपये)^^ |
## स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, वीअरेबल्स आणि लॅपटॉप्स. ^^ निवडक टेलिव्हिजन्स आणि डिजिटल अप्लायन्सेस |