Union Budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

Nirmala Sitharaman budget speech Live : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman budget speech Live) यांनी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर (Budget 2024 LIVE) करण्यास सुरुवात केली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Feb 2024 12:20 PM
Interim Budget 2024 LIVE Updates: अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांच्या 'या' मोठ्या घोषणा!

Interim Budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्यात... 



  • टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

  • 10 वर्ष जुन्या 10 हजार रुपयांपर्यंतचा कर माफ

  • राज्यांना 75 हजार कोटी रुपयांचं कर्ज

  • जुलैच्या अर्थसंकल्पात भारताचा रोडमॅप विकसित झाला

  • 3 कोटी महिला लखपती दीदी बनतील

  • 5 वर्षांत 2 कोटी गरिबांसाठी घरं

  • पायाभूत सुविधांवर 11 टक्के अधिक खर्च

  • वंदे भारतमध्ये 40 हजार रेल्वे बोगी बदलण्यात येणार 

  • लक्षद्वीपच्या विकासासाठी विशेष योजना

  • 3 नवे रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा

Education Budget 2024 : बजेटमध्ये शिक्षणाला काय? 

Education Budget 2024 : बजेटमध्ये शिक्षणाला काय? 



  • देशात 7 नवे IIT, 7 नवे IIM 

  • नवीन वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार

Youth Budget : बजेटमध्ये तरुणांसाठी काय? 

Youth Budget : बजेटमध्ये तरुणांसाठी काय? 



  • तीन हजार नवे आयटीआय खुले केले

  • 54 लाख तरुणांना प्रशिक्षण मिळालं. 

  • आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला मोठं यश

Union budget 2024 LIVE Updates: प्राप्तिकर दरांमध्ये कोणताही बदल नाही : अर्थमंत्री

Union budget 2024 LIVE Updates: प्राप्तिकर दरांमध्ये कोणताही बदल नाही, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 सादर केला.

Union budget 2024 LIVE Updates: टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, आणखी काय म्हणाल्या?

  • आयकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा नाही. 

  • 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही. 

  • आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आलीय, परतावा देखील त्वरीत जारी केला जातो

  • जीएसटी संकलन दुपटीनं वाढलं 

  • जीएसटीनं अप्रत्यक्ष कर प्रणाली बदललीय 

Union budget 2024 LIVE Updates: आम्ही अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा कायम ठेवलीय : अर्थमंत्री

Union budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, आम्ही अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा कायम ठेवली आहे. अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही लोकाभिमुख घोषणा केल्या जात नाहीत. यामुळेच सरकारनं कोणत्याही घोषणा करण्याचं टाळलं आहे.

Union budget 2024 LIVE Updates: तरुणांसाठी अर्थसंकल्पात काय?

Union budget 2024 LIVE Updates: तरुणांसाठी अर्थसंकल्पात काय? 



  • 'पीएम मुद्रा' योजनेनं तरुणांच्या उद्योजकीय आकांक्षांसाठी 22.5 लाख कोटी रुपयांपर्यंतची 43 कोटी कर्जे मंजूर केलीत.

  • 'फंड ऑफ फंड्स', स्टार्टअप इंडिया व स्टार्टअप क्रेडिट हमी योजना तरुणांना मदत करत आहेत 

Union budget 2024 LIVE Updates: टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, आयकर भरणाऱ्यांना दिलासा नाहीच : अर्थमंत्री

Union budget 2024 LIVE Updates: टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. सध्या आयकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही. आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. परतावा देखील त्वरीत जारी केला जातो. जीएसटी संकलन दुपटीनं वाढलं आहे. जीएसटीनं अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे.

Union budget 2024 LIVE Updates: गेल्या 5 वर्षांत करदात्यांच्या सुविधांमध्ये वाढ : अर्थमंत्री

Union budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, गेल्या 5 वर्षांत करदात्यांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. जीएसटीमुळे इंडस्ट्रीवरील कंप्लायंसचा बोजा कमी झाला आहे. जीएसटीचं सरासरी संकलन दुप्पट झालं आहे.

Tax Slab 2024 : टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

Tax Slab 2024 : टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही



  • टॅक्सस्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, 7 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त

  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, गेल्या 5 वर्षांत करदात्यांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. जीएसटीमुळे उद्योगांवरील   बोजा कमी झाला आहे. जीएसटीचे सरासरी संकलन दुप्पट झाले.

  • १० वर्षात टॅक्स कलेक्शन ३ पट वाढले 

  • १० वर्षापूर्वीचा १० हजारपर्यंतचा टॅक्स माफ  

Interim Railway Budget 2024 LIVE : टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही : अर्थमंत्री

Interim Railway Budget 2024 LIVE : टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही : अर्थमंत्री 

Union budget 2024 LIVE Updates: 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही : अर्थमंत्री

Union budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. 10 वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. मी कर दरात कपात केली आहे. 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही. 2025-2026 पर्यंत तूट आणखी कमी होईल.

PMAY BUDGET 2024 : प्रधानमंत्री आवास योजना 

PMAY BUDGET 2024 : प्रधानमंत्री आवास योजना 



  • प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागांत आणखी दोन कोटी घरं बांधणार

  • रूफटॉप सोलर प्लान अर्थात सौरऊर्जा योजनेअतंर्गत  1 कोटी घरांना 300 यूनिटप्रती महीना मोफत वीज 

Railway Budget 2024 : रेल्वे आणि पायाभूत सुविधा 

Railway Budget 2024 : रेल्वे आणि पायाभूत सुविधा 



  • FY25 मध्ये पायाभूत सुविधांवर 11.1% अधिक  खर्च केले जातील

  • ऊर्जा, सिमेंट आणि बंदरसाठी नवीन 3 कॉरिडॉर तयार करणार, जसे की dedicated freight कॉरिडॉर सध्या सुरू आहेत, 

  • नवीन सुरू झालेल्या रेल्वे लाईन वर सध्या 1.3 कोटी प्रवासी प्रवास करतात, 

  • 40 हजार साधे डबे वंदे भारत डब्यांमध्ये रूपांतरित करणार 

Union budget 2024 LIVE Updates: बजेटमध्ये महिलांसाठी काय?

Union budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्री म्हणाल्या की, देशात महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून त्यामुळे त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होत आहे. लखपती दीदी योजनेंतर्गत देशात 1 कोटी लखपती दिदी बनल्या आहेत. त्यांचं उद्दिष्ट 2 कोटींवरून 3 कोटी करण्यात आलं असून 3 कोटी लखपती दिदी तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना सर्वाईकल कॅन्सरची लस दिली जाईल, जेणेकरून हा कर्करोग टाळता येईल.

Interim Railway Budget 2024 LIVE : बजेटमध्ये रेल्वेसाठी काय?

Interim Railway Budget 2024 LIVE : बजेटमध्ये रेल्वेसाठी काय? 


तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील. 
पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाईल. 
पंतप्रधान गति शक्ती योजनेंतर्गत कामांना गती दिली जाईल. 
मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार आहे. 
40 हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील. 
विमानतळांची संख्या वाढली आहे. 
एव्हिएशन कंपन्या एक हजार विमानांची ऑर्डर देऊन पुढे जात आहेत.

Interim Budget 2024 LIVE : अर्थसंकल्पात काय तरतूदी सांगितल्या? 

Interim Budget 2024 LIVE : अर्थसंकल्पात काय तरतूदी सांगितल्या? 



  • लखपती दीदींची संख्या 20 लाखांवरून 30 लाखांपर्यंत वाढणार

  • FY25 मध्ये पायाभूत सुविधांवर 11.1 टक्क्यांहून अधिक खर्च 

  • आतापर्यंतची सर्वात मोठी कॅपेक्स घोषणा, FY25 साठी 11.11 लाख कोटी कॅपेक्स जाहीर

  • ऊर्जा, खनिज आणि सिमेंटचं 3 नवे कॉरिडॉर बांधले जातील

  • 40,000 रेल्वे डबे वंदे भारत मानक डब्यात रूपांतरित केले जातील.

  • छोट्या शहरांना जोडण्यासाठी सरकार 517 नवीन मार्गांवर UDAN योजना आणणार 

Agriculture Budget 2024 : बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय? 

Agriculture Budget 2024 : बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय? 



  • PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत

  • पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

  • 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ दिला. 

  • दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार आहे

  • शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर भर, 

  • सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला अधिक प्रोत्साहन देणार

  • मत्स्यपालन योजनेला चालना देणार

  • सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य 

  • सरकार 5 इंटीग्रेटेड एक्वा पार्क्स उघडणार 

Farmers Budget 2024 : बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?

Farmers Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून मोठ्या घोषणा 



  • शेतीसाठी आधुनिक साठवण

  • पुरवठा साखळीवर भर

  • सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला आणखी प्रोत्साहन

  • मत्स्यपालन योजनेला चालना देण्यासाठी काम केलं जाईल

  • सागरी अन्न निर्यात दुप्पट करण्याचं लक्ष्य

  • सरकार 5 एकात्मिक एक्वा पार्क उघडणार


 

ASHA Workers : अंगणवाडी सेविकांना आयुष्मान योजनेचा लाभ

ASHA Workers : अंगणवाडीचा दर्जा सुधारणार, 'आशा' (ASHA) कर्मचाऱ्यांना मिळणार आयुष्मान योजनेचा लाभ.

Interim Budget 2024 LIVE : अर्थमंत्र्यांच्या घोषणा काय?

  • देशात 15 नवी एम्स रुग्णालये तयार करणार

  • पाच एकात्मिक ॲक्वा पार्क स्थापन करणार 

  • सौर ऊर्जा योजनेद्वारे 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिट मोफत वीज देणार

  • पुढील दोन वर्षांत दोन कोटी घरे बांधणार

Interim Budget 2024 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर, काय तरतूदी सांगितल्या?

  • सरकार नेक्स्ट जेनरेशन रिफॉर्म आणणार 

  • पुढच्या 5 वर्षांत गरीबांसाठी 2 कोटी घरं बांधणार 

  • MSME साठी व्यावसाय सोपा करण्यासाठी काम सुरू 

  • गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक क्षेत्र सज्ज 

  • रूफटॉप सोलर प्लान अंतर्गत 1 कोटी घरांना 300 यूनिट/महिना फ्री वीज  

  • देशात जास्तीत जास्त वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणार 

  • डेअरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकरच योजना आणणार 

  • सर्वाइकल कॅन्सरसाठी लसीकरण वाढविलं जाईल, नॅनो डीएपीचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढविला जाईल

Woman Budget 2024 : बजेटमध्ये महिलांसाठी काय?

तिहेरी तलाक प्रथा बंद केली


महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार 


पीएम आवास योजनेतील 70 टक्के घरं महिलांना 


गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण वाढविले जाईल, सर्व क्षेत्रांमध्ये नॅनो DAP चा वापर वाढविला जाईल

Interim Budget 2024 LIVE : रिफॉर्म, परफॉर्म, ट्रांसफॉर्मवर केंद्र सरकार लक्ष केंद्रीय करणार : अर्थमंत्री

Interim Budget 2024 LIVE : रिफॉर्म, परफॉर्म, ट्रांसफॉर्मवर केंद्र सरकार लक्ष केंद्रीय करणार : अर्थमंत्री 

Interim Budget 2024 LIVE: मोदींची घोषणा

जय जवान जय किसान जय विज्ञान सोबत जय अनुसंधान असा नवा नारा पंतप्रधानांनी दिला आहे. संशोधनास महत्त्व मिळेल.



नुकतंच भारत, मिडल इस्ट आणि युरोप असा एक इकोनॉमिक कॉरिडोअर तयार झाला आहे, तो भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे - अर्थमंत्री सीतारामन

Interim Budget 2024 LIVE: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणखी दोन कोटी घरं बांधली जाणार : अर्थमंत्री

Interim Budget 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, जनधन खात्यांमध्ये पैसे जमा करून 2.7 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे आणि सरकारचे आर्थिक व्यवस्थापन इतकं उच्च पातळीचं आहे की, त्यामुळे देशाला नवी दिशा आणि नवी आशा मिळाली आहे. देशातील सर्व राज्य आणि घटकांना एकत्रितपणे देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ मिळावा यासाठी मोदी सरकारनं व्यवस्था केली आहे. आर्थिक क्षेत्र अधिक मजबूत आणि अधिक सुलभपणे कार्य करण्यास सक्षम केलं जात आहे. देशातील महागाईबाबतच्या कठीण आव्हानांवर मात करण्यात येत असून महागाईचे आकडे खाली आले आहेत.

Interim Budget 2024 LIVE: मच्छिमारांना दिलासा

पाच एकात्मिक ॲक्वा पार्क स्थापन करणार, मच्छिमारांना दिलासा


छतावरील सौर ऊर्जा योजनेद्वारे 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिट मोफत वीज देणार


पुढील दोन वर्षांत दोन कोटी घरे बांधणार

Woman Budget 2024 : बजेटमध्ये महिलांसाठी काय?

  • तिहेरी तलाक प्रथा बंद केली

  • महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार 

  • पीएम आवास योजनेतील 70 टक्के घरं महिलांना

Youth Budget : बजेटमध्ये तरुणांसाठी काय?

  • तीन हजार नवे आयटीआय खुले केले

  • 54 लाख तरुणांना प्रशिक्षण मिळालं. 

  • आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला मोठं यश

Agriculture Budget 2024 : बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय?

  • PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत

  • पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

  • 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ दिला. 

Interim Budget 2024 LIVE: देशाने कोविड-19 साथीच्या आव्हानांवर मात केली,

Interim Budget 2024 LIVE:  दुसऱ्या टर्ममध्ये, सरकारने आपला मंत्र मजबूत केला आणि विकासाच्या तत्त्वज्ञानामध्ये सामाजिक, भौगोलिक या सर्व समावेशकतेचा विचार केला. संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टीकोनातून, देशाने कोविड-19 साथीच्या आव्हानांवर मात केली, आत्मनिर्भर भारताकडे दीर्घ पावले टाकली आणि अमृत काळाचा भक्कम पाया घातला. सर्वसमावेशक विकास आणि वाढ, विकासाबाबतचा आपला मानवीय दृष्टिकोन गावपातळीपर्यंत तरतूद करण्याच्या पूर्वीच्या दृष्टिकोनापासून दूर गेला आहे. सर्वांसाठी घरे, पाणी, वीज, स्वयंपाकाचा गॅस, बँक खाती आणि आर्थिक सेवा या माध्यमातून विकास कार्यक्रमांनी प्रत्येक घर आणि व्यक्तीला लक्ष्य केले आहे. 80 कोटी लोकांच्या मोफत रेशनद्वारे अन्नाची चिंता दूर झाली. अन्नदात्याच्या उत्पादनासाठी एमएसपी वेळोवेळी वाढवली जात आहे. मुलभूत गरजांच्या तरतुदीमुळे ग्रामीण भागात खरे उत्पन्न वाढले आहे 

Interim Budget 2024 LIVE: तब्बल 20 मिनिटं केंद्र सरकारच्या योजनांची अर्थमंत्र्यांकडून गणना

Interim Budget 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेनं चालली आहे. आमच्या सरकारचं लक्ष पारदर्शक कारभारावर आहे. अर्थमंत्र्यांनी 20 मिनिटं केंद्र सरकारच्या योजनांची गणना केली आणि भारताच्या विकासाच्या गतीवर चर्चा केली. निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागांत आणखी दोन कोटी घरं बांधली जातील.

Arthasankalp 2024 LIVE: जागतिक तणावामुळे आव्हानं वाढत आहेत, परंतु संकटातही भारतानं चांगली जीडीपी वाढ साधली : अर्थमंत्री

Arthasankalp 2024 LIVE: अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, सरकारचं लक्ष सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या विकासावर आहे आणि यासाठी सरकारच्या प्रयत्नांना फळ मिळत आहे. जागतिक तणावामुळे आव्हानं वाढत आहेत, परंतु या संकटातही भारतानं चांगली जीडीपी वाढ साधली आहे. GST अंतर्गत 'वन नेशन, वन मार्केट' साध्य झालं असून भारत आणि मध्य पूर्व युरोप दरम्यान कॉरिडॉर बांधण्याची घोषणा गेम चेंजर ठरेल.

Arthasankalp 2024 LIVE: आमचं सरकार सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी विकासाच्या दिशेनं काम करतंय : अर्थमंत्री

Arthasankalp 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, विकास कार्यक्रमांनी सर्वांसाठी घरं, प्रत्येक घरासाठी पाणी, सर्वांसाठी वीज, सर्वांसाठी स्वयंपाकाचा गॅस आणि सर्वांसाठी बँक खाती विक्रमी वेळेत या माध्यमातून प्रत्येक घर आणि व्यक्तीला लक्ष्य केलं आहे. आमचं सरकार सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी विकासाच्या दिशेनं काम करत आहे. आपल्या तरुण देशाच्या आकांक्षा उच्च आहेत, वर्तमानात अभिमान आहे आणि उज्ज्वल भविष्याबद्दल आशा आणि विश्वास आहे. गेल्या 10 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत अभूतपूर्व बदल झाले आहेत. 2014 मध्ये देशासमोर मोठी आव्हानं होती. सरकारनं त्या आव्हानांवर मात केली आणि संरचनात्मक सुधारणा केल्या आहेत.

Interim Budget 2024 LIVE : तरुणांच्या सक्षमीकरणावरही काम केलंय : अर्थसंकल्प

Interim Budget 2024 LIVE : सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरुणांच्या सक्षमीकरणावरही काम केलं आहे. तीन हजार नवीन आयटीआय उघडण्यात आल्या आहेत. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. 

Arthasankalp 2024 LIVE: 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ : अर्थमंत्री

Arthasankalp 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचायचं आहे. खास जमातींसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचं काम करत आहे. सरकारनं आव्हानांचा धैर्यानं सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. पाणी योजनेतून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा केला जात आहे. 78 लाख पथारी व्यावसायिकांना मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 11.8 कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे. 

Budget 2024 LIVE: देशाला नवी दिशा आणि नवी उमेद मोदी सरकारनं दिलीय : अर्थमंत्री

Budget 2024 LIVE: अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे रोख रक्कम थेट कोट्यवधी शेतकऱ्यांना हस्तांतरित केली जात आहे. देशातील अन्नदाता या योजनेचा लाभ घेत असून 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम फसल योजनेचा लाभ दिला जात आहे. आम्ही 300 विद्यापीठं स्थापन केली आहेत आणि एक तृतीयांश महिलांना आरक्षण दिलं आहे. देशाला नवी दिशा आणि नवी उमेद मोदी सरकारनं दिलीय. 

Union Budget 2024 LIVE Updates: 25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यात मोदी सरकारला यश : अर्थमंत्री

Union Budget 2024 LIVE Updates: 25 कोटी लोकांना बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर काढण्यात मोदी सरकारला यश आल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना सांगितलं. सरकार सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित करत आहे आणि गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या सक्षमीकरणावर भर देत आहे. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला असून 78 लाख विक्रेत्यांना मदत करण्यात आली आहे. 34 लाख कोटी रुपये थेट जनधनद्वारे हस्तांतरित करण्यात आलं आहे.

Union Budget 2024 LIVE: गेली 10 वर्ष परिवर्तनाचा काळ : अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Union Budget 2024 LIVE: अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीला अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या उद्दिष्टांचा उल्लेख केला आणि 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या मोदी सरकारच्या व्हिजनबद्दल सांगितलं. त्या म्हणाले की, गेली 10 वर्ष परिवर्तनाचा काळ आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगानं प्रगती करत आहे, असंही त्या म्हणाल्या. 

Union Budget 2024 LIVE: आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवलीय : अर्थमंत्री

Union Budget 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, प्रत्येक घरात पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडण्याचं काम केलं आहे. अन्नाच्या समस्या दूर केल्या आहेत. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आलं आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्या, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचं उत्पन्न वाढलं आहे. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे.

Union Budget 2024 LIVE: 2047 पर्यंत आम्ही भारताला विकसित देश बनवणार : अर्थमंत्री

Union Budget 2024 LIVE: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत बरेच बदल झाले आहेत. 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी सत्ता हाती घेतली, तेव्हा अनेक आव्हानं होती. अर्थव्यवस्थेला बळ मिळावं आणि लोकांना रोजगार मिळावा, यासाठी अनेक कार्यक्रम आणि योजना जनतेच्या हितासाठी केल्या. सरकारचं लक्ष सर्वसमावेशक विकासावर आहे आणि सर्व वर्गासाठी आणि लोकांसाठी विकासाची चर्चा आहे. 2047 पर्यंत आपण भारताला विकसित देश बनवू.

Union Budget 2024 LIVE: सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न याच मंत्रानं आम्ही पुढे जातोय : अर्थमंत्री

Union Budget 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात केली आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, देशातील जनता भविष्याकडे पाहत आहे. ते आशावादी आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जात आहोत. 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी कामाला सुरुवात केली, तेव्हा अनेक आव्हानं आमच्यासमोर होती. जनहितार्थ कामं सुरू केली आहेत. जनतेला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशात एक नवा उद्देश आणि आशा निर्माण झाली आहे. जनतेनं आम्हाला दुसऱ्यांदा सरकारमध्ये निवडून दिलं. आम्ही सर्वसमावेशक विकासाबद्दल बोललो. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न या मंत्रानं आम्ही पुढे जात आहोत.

Union Budget 2024 LIVE: अर्थसंकमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात, देशाचा लेखा-जोगा मांडण्यास सुरुवात

Union Budget 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. या बजेटमध्ये तीन महिन्यांसाठी खर्च करायच्या रकमेचा लेखाजोखा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प येईल. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अर्थसंकल्प सर्वांसाठी चांगला असल्याचं सांगितलं. काही महिन्यांवर सार्वत्रिक निवडणुका होणार असल्यानं तज्ज्ञांचे म्हणणं आहे. कृषी क्षेत्राची स्थिती कमकुवत आहे. हे पाहता काही मोठी पावलं उचलली जाऊ शकतात. यामध्ये मनरेगा निधीचं वाटप वाढवण्याचाही समावेश आहे. PM किसान सन्मान निधी देखील 6 हजार रुपयांवरून 8 हजार रुपयांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. स्टँडर्ड डिडक्शन देखील 1 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

Union Budget 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं अर्थसंकल्पीय भाषण सुरू

Union Budget 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अंतरिम अर्थसंकल्प 2024 साठी त्यांचं अर्थसंकल्पीय भाषण सुरू केलं आहे.

Union Budget 2024 LIVE: अर्थसंकल्प सादर होण्यास अवघी काही मिनिटं बाकी

Union Budget 2024 LIVE: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या अंतिम अर्थसंकल्पाच्या सादरीकरणासाठी अवघी काही मिनिटं शिल्लक आहेत आणि सध्या सर्वांच्या नजरा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे आहेत. देशातील गरीब, शेतकरी, महिला, वृद्ध, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी यांच्या आशा-अपेक्षा सध्या अर्थमंत्र्यांवर आहेत. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण लवकरच सुरू होणार आहे.

Union budget 2024 LIVE Updates: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संसदेत दाखल

Union budget 2024 LIVE Updates: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संसदेत पोहोचले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण काही वेळात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यात तीन महिन्यांचा संपूर्ण हिशेब आहे, जो सरकारला जनतेवर खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका होतील आणि जुलै 2024 पर्यंत केंद्र सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. 

Union Budget 2024 LIVE Updates: अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींकडून अर्थमंत्र्यांना शुभेच्छा

Union Budget 2024 LIVE Updates: 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत किशनराव कराड आणि अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भेट घेतली. येथे राष्ट्रपतींनी अर्थमंत्र्यांचे तोंड गोड करून त्यांना शुभेच्छा दिल्या.





Interim Budget 2024 LIVE: राष्ट्रपतींपाठोपाठ मोदी कॅबिनेटचीही अर्थसंकल्पाला मंजुरी

Interim Budget 2024 LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर मोदी मंत्रिमंडळानंही अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे निवडणुकीचं वर्ष आहे, त्यामुळे हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांचं भाषण थोड्याच वेळात सुरू होणार आहे.

Interim Budget 2024 LIVE: राष्ट्रपतींपा

Interim Budget 2024 LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर मोदी मंत्रिमंडळानंही अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे निवडणुकीचं वर्ष आहे, त्यामुळे हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांचं भाषण थोड्याच वेळात सुरू होणार आहे.

Budget 2024 LIVE: राष्ट्रपतींच्या भेटीनंतर निर्मला सीतारमण संसद भवनाकडे रवाना

Budget 2024 LIVE: अर्थमंत्र्यांनी राष्ट्रपती भवन सोडलं आणि संसदेच्या दिशेनं रवाना झाले, जिथे त्या केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अर्थसंकल्पावर मंजुरी घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी त्या संसद भवनाकडे रवाना झालेल्या. त्यानंतर अंतरिम अर्थसंकल्पाला मंत्रिमंडळाकडून औपचारिक मंजुरी मिळाल्यानंतर तो देशासमोर अर्थसंकल्प सादर करतील. सकाळी 11 वाजता संसदेच्या पटलावर अर्थसंकल्प मांडणार.

Interim Budget 2024 LIVE : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स-निफ्टी सुसाट

Interim Budget 2024 LIVE : संसदेत अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर होण्यापूर्वी, शेअर बाजारात उत्साह दिसून येत आहे आणि सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह व्यवहार करत आहेत. सकाळी 10.22 वाजता सेन्सेक्स 215.79 किंवा 0.30 टक्क्यांनी वाढून 71,967 वर आहे. NSE निफ्टी 0.26 टक्क्यांनी वाढून 57.25 अंकांनी 21,782 वर आहे.

Budget 2024 LIVE: थोड्याच वेळात अर्थसंकल्पावर मोहोर उमटणार

Budget 2024 LIVE: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत पोहोचल्या आहेत. काही वेळात अर्थसंकल्पावर मोदी सरकारच्या मंजुरीची शिक्कामोर्तब होईल. सध्या पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. सुमारे एक तासानंतर म्हणजे सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्पीय भाषण देतील.

Interim Budget 2024 LIVE: अर्थसंकल्पाच्या प्रती संसद भवनात पोहोचल्या

Interim Budget 2024 LIVE: अंतरिम अर्थसंकल्प 2024 ची तयारी पूर्ण झाली आहे आणि त्यांच्या निर्णायक टप्प्यात आहे आणि अंदाजपत्रक सादर होण्याच्या सुमारे दीड तास आधी, नवीन संसद भवनात बजेटच्या प्रती आल्या आहेत. अधिकाऱ्यांसोबतच सुरक्षा अधिकारीही या बजेटच्या प्रती घेऊन येथे आले आहेत. सुरक्षा तपासणीनंतरच बजेटच्या प्रती संसदेत प्रवेश दिला जातो.



Union Budget 2024 LIVE: अर्थसंकल्पापूर्वी फोटो सेशन, तिथून अर्थमंत्री राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रवाना

Union Budget 2024 LIVE: यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेटसाठी विशेष तयारी केली आहे. यावेळी त्या निळ्या रंगाची साडी नेसून आल्याचं पाहायला मिळालं. निवडणुका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या शेवटच्या अर्थसंकल्पाकडून जनतेला विशेष अपेक्षा आहेत. अर्थमंत्री निर्मला सलग सहाव्यांदा हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महागाई आणि बेरोजगारीवरून गदारोळ करण्याची विरोधकांकडून तयारी सुरू आहे. परंपरेनुसार फोटो सेशननंतर अर्थमंत्री अर्थसंकल्पाची मंजुरी घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचत आहेत. त्यानंतर ती संसदेत पोहोचेल आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत बजेट मंजूर होईल.


 

Union Budget 2024 LIVE Updates: बजेट टीमसोबत अर्थमंत्र्यांचं फोटो सेशन

Union Budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्रालयात पोहोचल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संपूर्ण बजेट टीमसोबत औपचारिक फोटो सेशन केलं आणि त्यानंतर अर्थमंत्री राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाल्या. राष्ट्रपतींकडून अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर त्या संसदेत पोहोचतील आणि त्यानंतर अर्थसंकल्प सादर करतील.



Interim Budget 2024 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थ मंत्रालयात दाखल

Interim Budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थ मंत्रालयात पोहोचल्या आहेत. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आधीच येथे पोहोचले आहेत. अर्थमंत्री आधी बजेट बनवणाऱ्या टीमला भेटतील आणि त्यांच्यासोबत फोटो सेशन करतील. अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे. त्यानंतर अर्थमंत्री राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. 2024-2025 च्या अर्थसंकल्पाची मंजुरी राष्ट्रपतींकडून घेतली जाईल.

Budget 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण गुरुवारी सकाळी 9.15 वाजता संसदेत पोहोचतील

Budget 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण गुरुवारी सकाळी 9.15 वाजता संसदेत पोहोचतील.


सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यात अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाणार आहे.


अर्थमंत्री 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता संसदेत सादर करतील.  या वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.  सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन सरकार कदाचित जुलै महिन्यात संपूर्ण अर्थसंकल्प सादर करेल.

Budget 2024 LIVE : बजेटमध्ये स्वस्त घरांना चालना मिळण्याची शक्यता, रिअल इस्टेट क्षेत्राला 'या' आहेत अपेक्षा

Budget 2024 LIVE Updates : देशाचा अर्थसंकल्प (India Budget 2024) सादर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. पुढील आर्थिक वर्षासाठी देशाच्या बहुआयामी विकासाची रूपरेषा ही अर्थसंकल्पात मांडण्यात येते. मात्र यावेळी चित्र थोडे वेगळे असेल कारण येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे संपूर्ण अर्थसंकल्पाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे लोकही निवडणुकीच्या अर्थसंकल्पाची अपेक्षा करत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी विशेष महत्त्व असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला (Real Estate) या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत?


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Arthasankalp LIVE Updates: बजेटपूर्वी सरकारकडून आनंदाची बातमी! स्मार्टफोन स्वस्त होणार

Arthasankalp LIVE Updates: बजेट सादर होण्यापूर्वी आनंदाची बातमी. सर्व प्रकारचे स्मार्टफोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सरकारने सर्वसामान्यांना फायदेशीर ठरू शकेल अशी एक आनंदाची बातमी दिली आहे. मोदी सरकारने अर्थसंकल्पापूर्वी काल मोबाईल पार्ट्सवरील आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आणि आता मोबाईल पार्ट्सवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10% करण्यात आला आहे.

Union Budget 2024 LIVE Updates: निर्मला सीतारमण अर्थमंत्रालयाकडे रवाना

Union Budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांच्या निवासस्थानावरून निघाल्या आहेत. त्या आधी अर्थमंत्रालयात जाणार असून बजेट मेकिंग टीमसोबत फोटो सेशन होईल. राज्यमंत्री पंकज चौधरी अर्थमंत्रालयात पोहोचले आहेत. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला राष्ट्रपतींची मंजुरी घेण्यासाठी पोहोचतील. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे निवडणुकीचं वर्ष आहे, त्यामुळे हा अंतरिम अर्थसंकल्प आहे.


3



Interim Budget 2024 LIVE: अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड संसदेकडे रवाना

Interim Budget 2024 LIVE Updates: अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत किराड हे त्यांच्या दिल्लीतील घरातून संसदेकडे रवाना झाले आहेत. अंतरिम अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता संसदेत सादर होणार असून अर्थमंत्री हा अर्थसंकल्प देशासमोर मांडणार आहेत. 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प तयार करण्यात अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबतच अर्थ राज्यमंत्रीही महत्त्वाची भूमिका बजावतात.



Union Budget 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार

Union Budget 2024 LIVE Updates: देशाच्या आर्थिक आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी आतापर्यंत स्वतंत्र भारताच्या इतिहासात 34 अर्थमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली असून सध्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे पद सांभाळत आहेत. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल. निर्मला सीतारमण यांच्या कार्यकाळात त्यांच्या नावावर सर्वाधिक प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण वाचण्याचा विक्रम आहे, जे 2 तास 41 मिनिटांचं होतं.

Union budget 2024 LIVE Updates: यंदाच्या अर्थसंकल्पात नव्या करप्रणालीत आणखी सुधारणा पाहायला मिळतील का?

Union budget 2024 LIVE Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास तयार आहेत. नवी कर प्रणाली पुन्हा फोकसमध्ये आहे. जुन्या कर प्रणालीला पर्याय म्हणून केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 मध्ये सादर केलेली नवीन कर प्रणाली 1 एप्रिल 2023 पासून डीफॉल्ट पर्याय बनली आहे. आता नव्या करप्रणालीचा अवलंब करण्याची आणखी एक संधी मिळू शकते, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या वर्षी सीतारमण यांनी उच्च उत्पन्न मिळवणाऱ्यांसाठी नव्या कर प्रणालीमध्ये अतिरिक्त शुल्क काढून टाकलं होतं आणि 50 हजार रुपयांच्या मानक वजावटीला परवानगी दिली होती.

Interim Budget 2024 LIVE : आजच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांच्या पेटाऱ्यातून जनतेसाठी काय निघणार?

Interim Budget 2024 LIVE : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प संसदेच्या संयुक्त अधिवेशनात सकाळी 11 वाजता सादर करणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, सीतारमण यांचं भाषण मुख्यत्वे पायाभूत सुविधांवर खर्च वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी संभाव्य धोरणांवर लक्ष केंद्रीत करेल. मात्र, वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी काही करसंबंधित घोषणांची अपेक्षा मध्यमवर्गाला आहे. पण अशा अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. कारण सरकारचं लक्ष वित्तीय तूट कमी करण्यावर आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकीपूर्वीचा असल्याने, सरकार आपल्या विजयाची शक्यता वाढवण्यासाठी विद्यमान कल्याणकारी योजना पुढे नेऊ शकते.

Budget 2024 LIVE: 2019 च्या अर्थसंकल्पात कोणत्या तरतूदी होत्या?

Budget 2024 LIVE Updates: यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे यंदा सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प आहे. 2019 च्या अंतरिम अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला आकर्षित करण्यासाठी सरकारनं 5 लाख रुपयांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नाला आयकरातून सूट दिली होती. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत 12 कोटी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये रोख देण्याची घोषणाही करण्यात आली. यावेळी अंतरिम अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची प्रवृत्ती संपुष्टात येईल. याशिवाय, पंतप्रधान श्रम योगी मान-धन योजनेशी निगडित 50 कोटी कामगारांना सेवानिवृत्ती निवृत्ती वेतनात सरकारी योगदानही प्रस्तावित करण्यात आलं आहे. 

Arthasankalp LIVE Updates: यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता

Arthasankalp LIVE Updates: नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं तीन राज्यांत दणदणीत विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारमण सादर करणार असलेला अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होऊ शकते. 

Interim Budget 2024 LIVE: आज सादर होणार अंतरिम अर्थसंकल्प, जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता

Interim Budget 2024 LIVE: अंतरिम अर्थसंकल्प एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांसाठी केंद्र सरकारच्या आवश्यक खर्चाची पूर्तता करण्यासाठी आगाऊ अनुदानासाठी संसदेची मंजुरी घेतो. एप्रिल/मे मध्ये सार्वत्रिक निवडणुकांनंतर निवडून आलेलं नवं सरकार कदाचित जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. आचारसंहिता लागू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो.

Union budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं मिनिट टू मिनिट शेड्यूल कसं असेल?

Union budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 7.30 नंतर त्यांच्या घरातून बाहेर पडतील. सकाळी 8:15 वाजता अर्थ मंत्रालयाच्या गेट क्रमांक 2 वर बजेट तयार करणाऱ्या टीमचं फोटो सेशन होईल. सकाळी 8.45 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि अर्थसंकल्पाला मंजुरी देतील. अर्थमंत्री सकाळी 9.15 वाजता संसदेत पोहोचतील. सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला यांचं अर्थसंकल्पीय भाषण सकाळी 11 वाजता संसदेत सुरू होईल. अर्थसंकल्पानंतर नॅशनल मीडिया सेंटरमध्ये दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.


 

Union Budget 2024 LIVE : अर्थसंकल्पाचा आजवरचा इतिहास काय सांगतो?

Union Budget 2024 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज अंतरीम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या (Modi Government) दुसऱ्या टर्मचा हा अखेरचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होणार असल्याने केंद्राकडून सर्वसामान्यांना खूश करण्याचा प्रयत्न होताना दिसेल.  अर्थसंकल्पाचा 163 वर्षांचा इतिहास तुम्हाला माहितेय का ? अर्थसंकल्पाचे फायदे काय? बजेटचा आठ शब्दांत अर्थ माहितेय का ? अर्थसंकल्प सकाळी 11 वाजताच का सादर करतात ? आतापर्यंत कुणी कुणी अर्थसंकल्प सादर केला? 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

LPG Cylinder Price Hike LIVE: बजेट सादर होण्यापूर्वीच महागाईचा भडका, एलपीजी महागला!

LPG Cylinder Price Hike LIVE: आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प  (Interim Budget 2024) सादर करणार आहेत. यापूर्वीही देशात महागाईचा धक्का बसला आहे, प्रत्यक्षात 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर (LPG Cylinder Price Hike) तेल विपणन कंपन्यांमुळे महाग झाला आहे. IOCL च्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 14 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत, त्यानंतर राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1769.50 रुपये झाली आहे. नवे दर आज 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत. 

Budget 2024 Panchang : आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प, 1 फेब्रुवारीचे पंचांग काय सांगते? मुहूर्त, योग, नक्षत्र जाणून घ्या

Budget 2024 Panchang : हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात (Astrology) शुभ मुहूर्त आणि योग इत्यादींना महत्त्व दिले गेले आहे, त्यामुळे शुभ कार्ये पंचांगानुसार केली जातात. गुरुवार, 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा ग्रहांची स्थिती कशी असेल ते जाणून घेऊया. आज कोणते शुभ, अशुभ योग आणि शुभ मुहूर्त असतील? 


वाचा सविस्तर

Arthasankalp LIVE Updates: यंदाचं वर्ष निवडणूक वर्ष, त्यामुळे यंदा जाहीर होणार अंतरिम अर्थसंकल्प

Arthasankalp LIVE Updates: आगामी सार्वत्रिक निवडणुकामुळं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प. सकाळी 11 वाजता अंतरिम अर्थसंकल्प होणार सादर.

Union budget 2024 LIVE Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मांडणार अंतरिम बजेट, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा की कठोर निर्णय?

Union budget 2024 LIVE Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं बजेट मांडणार आहेत. यावर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असल्यामुळे हे अंतरिम बजेट असेल. त्यांच्या कारकिर्दीतलं हे सहावं बजेट असेल. मोरारजी देसाईंच्या विक्रमाशी त्या बरोबरी करतील. सकाळी 11 वाजता अर्थमंत्री लोकसभेत बजेट सादर करतील. आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्पीय वाटप आणि महसुली अपेक्षांची रूपरेषा त्या आज मांडतील. लोकसभेत बजेट मांडून झाल्यावर राज्यसभेत बजेट मांडलं जाईल. बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण आपण एबीपी माझावर पाहू शकाल. 


खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही अर्थसंकल्प पाहू शकता... 


https://www.youtube.com/watch?v=m0MD6Ukm0cQ

पार्श्वभूमी

Arthasankalp 2024 LIVE Updates : Nirmala Sitharaman budget speech Live : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman budget speech Live) यांनी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर (Budget 2024 LIVE) करण्यास सुरुवात केली. निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या (Modi govt schemes) योजनांचा देशवासियांना कसा फायदा झाला हे सांगितलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी (Election Budget) होत असलेल्या या बजेटकडे देशवासियांचं लक्ष आहे. यावर्षी सार्वत्रिक निवडणुका (Lok Sabha Elections 2024) होत असल्यामुळे हे अंतरिम बजेट (Interim Budget) असेल. त्यांच्या कारकिर्दीतलं हे सहावं बजेट असेल. मोरारजी देसाईंच्या विक्रमाशी त्या बरोबरी करतील. सकाळी 11 वाजता अर्थमंत्री लोकसभेत बजेट सादर करतील. आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्पीय वाटप आणि महसुली अपेक्षांची रूपरेषा त्या आज मांडतील. लोकसभेत बजेट मांडून झाल्यावर राज्यसभेत बजेट मांडलं जाईल. बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण आपण एबीपी माझावर पाहू शकाल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.