Cryptocurrency Tax: क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर आता 30 टक्के कर लागणार; अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
Budget 2022 : भारतात आता यापुढे क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर 30 टक्के कर लागणार आहे. तशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
Union Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीबाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या पुढे क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर 30 टक्के कर लावण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. भारतात गेल्या काही काळापासून क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
संसदेत आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "सर्व प्रकारच्या व्हर्च्युअल करन्सीच्या कमाईवर 30 टक्के कर लावण्यात येणार आहे. क्रिप्टोकरन्सी जर कुणाला गिफ्टच्या स्वरुपात मिळाली असेल तर ती स्वीकारणाऱ्याला कर भरावा लागेल.
भारतात डिजिटल रुपयाला चालना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर लावण्यात आलेला हा कर म्हणजे भारत सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय मानला जातोय.
डिजिटल स्वरुपात रुपया सुरु होणार
भारतात सुरु करण्यात येणारी ही डिजिटल करन्सी व्हर्चुअल असेल. मात्र देशाचे मूळ चलन हे रुपयाच असेल. म्हणजे डिजिटल स्वरुपात हा रुपया असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत सीबीडीसीएसद्वारे सॉफ्ट लॉन्चची शक्यता वर्तवली होती. मात्र, याबाबत निश्चित कालमर्यादा दिलेली नाही.
या आधी सरकारने बिटकॉइनसारख्या व्हर्च्युअल करन्सीच्या वापरासंबंधी एक मंत्रीगटाची एक समिती बनवली होती. त्या गटाने आपला अहवाल सादर केला आहे. तसेच एम्पॉवर्ड टेक्नॉलॉजी गटाचीही एक बैठक झाली आहे, त्यांनीही आपला अहवाल सादर केला आहे.
संबंधित बातम्या:
- Budget Sasta Mehnga : अर्थसंकल्पानंतर 'या' गोष्टींच्या किमती वाढल्या; पाहा काय स्वस्त, काय महाग?
- Union Budget 2022 Highlights : करदात्यांची निराशा, डिजिटलायझेशनला महत्व! अर्थसंकल्पातील महत्वाच्या गोष्टी
- No Change in Tax Slabs: महत्त्वाची बातमी! कर रचना 'जैसे थे', कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा