Union Budget 2022 Highlights: कुठे दिलासा, कुठे निराशा; लोकसभेत सादर झाला आर्थिक वर्ष 2022-23 'अर्थसंकल्प'
Union Budget 2022 India Highlights : आज देशाचा आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा अर्थसंकल्प सादर होणार. त्यासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स फक्त एबीपी माझावर...
Union Budget 2022 : वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, लोकांची क्रय शक्ती कमी होत असतांना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून काही ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती परंतू लोकमनातील ही अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेलीच दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने आज मांडलेल्या अर्थसंकल्पावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी टीका केलीय. "या सरकारने मोठ्या घोषणा केल्या. मात्र अंमलबाजावणी होत नाही. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांचा कुठलाही फायदा होणार नाही. या अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांची नाराजी असून, शेतकऱ्यांच्या कुठल्याच योजनांसाठी भरीव तरतूद सरकारने केली नाही. तेलबिया बाबत हमी नाही, तसेच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मनरेगा योजनेसाठी कुठलीही घोषणा नाही. सरकारने गरिबांसाठी काहीही केलं नाही, अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली.
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. देशातील दुर्बलांना परवडणारी घरं देण्यासाठी या वर्षीच्या बजेटमध्ये 48 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2023 पर्यंत देशामध्ये 80 लाख नवीन घरं बांधणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, देशातील दुर्बल घटकांना तसेच केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरं या उद्देशासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 48 हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे. त्यामध्ये 80 लाख नवीन घरं बांधण्यात येतील
5G Service in India : सध्या इंटरनेट हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आता आपण 4जी (4G) स्पीड इंटेरनेट सुविधा पावरत आहोत, त्याआधी 3जी (3G) सुविधा वापरात होती. इंटरनेट सुविधा अधिक कार्यक्षम आणि वेगवान करण्यासाठी आता लवकरच भारतातही 5जी (5G) सुविधेचा लाभ घेता येणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. 5जी सुविधा भारताला प्रगतीकडे एक पाऊल पुढे घेऊन जाणार आहे.
सीतारमण यांनी सांगितले की, 2022 मध्ये खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या 5G मोबाइल सेवांसाठी आवश्यक स्पेक्ट्रम लिलाव (Spectrum Auction) आयोजित केला जाईल. ग्रामीण आणि दुर्गम भागात परवडणारे ब्रॉडबँड (Broadband) आणि मोबाईल कम्युनिकेशन (Mobile Communication) सक्षम करण्यासाठी PLI योजनेचा एक भाग म्हणून 5G इकोसिस्टमसाठी डिझाईन नेतृत्वाखालील उत्पादनाची योजना सुरू केली जाईल. परवडणारी ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी, निधी अंतर्गत वार्षिक संकलनाच्या 5 टक्के वाटप केले जाईल.
बजेटमध्ये फिनटेक आणि डिजिटलायझेशनवर स्पष्ट भर देण्यात आला आहे. डिजिटलायझेशन, फिनटेक आणि व्यवहार खर्च कमी करण्यावर स्पष्ट भर आहे. एटीएम, नेटबँकिंग, पेमेंट अॅप्सद्वारे टपाल बचत इंटरऑपरेबल करून ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण लोकांची सोय केली जाईल. RuPay आणि UPI द्वारे MDR फी मध्ये सबसिडी देण्याचा निर्णय एक सकारात्मक पाऊल आहे.
आयकर भरणाऱ्या करदात्यांसाठी या अर्थसंकल्पात एक दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय निर्मला सीतारमण यांनी आयकर रिटर्न संबंधी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. करदात्यांकडून फॉर्म भरताना एखादी चूक झाली तर त्यांची चौकशी होत होती. आता यापुढे ते बंद होणार असून त्यात गेल्या दोन वर्षातील चुकांची सुधारणा करण्याची संधी देण्यात येणार आहे.
Union Budget 2022 LIVE : या अर्थसंकल्पात प्राप्तिकराच्या आघाडीवर करदात्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
GST Collection : अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सांगितले की, जानेवारीमध्ये जीएसटी संकलन विक्रमी पातळीवर आले आहे. आर्थिक घडामोडींमध्ये झपाट्याने वाढ होत असूनही जीएसटी संकलनात चांगली वाढ झाली आहे.
GST Collection : अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सांगितले की, जानेवारीमध्ये जीएसटी संकलन विक्रमी पातळीवर आले आहे. आर्थिक घडामोडींमध्ये झपाट्याने वाढ होत असूनही जीएसटी संकलनात चांगली वाढ झाली आहे.
Income Tax Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 'आत्मनिर्भर भारत 2022-23'चा अर्थसंकल्प सादर केला. कॉर्पोरेट कर 18 टक्क्यांवरून 15 टक्के करण्याची घोषणा केली आहे. आयटीआरमधील त्रुटी सुधारण्यासाठी 2 वर्षांचा अवधी दिला जाईल, असं अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटलं आहे.
Income Tax Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची टॅक्सबाबत मोठी घोषणा. त्यांनी सांगितलं की, ITR मधील विसंगती सुधारण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी दिला जाईल.
अर्थसंकल्पादरम्यान शेअर बाजारात चांगली उसळी पाहायला मिळत आहे आणि सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी वर गेला आहे.
अर्थसंकल्पादरम्यान शेअर बाजारात चांगली उसळी पाहायला मिळत आहे आणि सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी वर गेला आहे.
Digital Currency : RBI 2022 मध्ये डिजिटल चलन लाँच करणार आहे आणि याद्वारे देशात अधिकृतपणे डिजिटल चलन सुरू केले जाईल.
Union Budget 2022 LIVE : या अर्थसंकल्पात सौरऊर्जा निर्मितीसाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात येणार आहेत. देशात सौरऊर्जेसाठी सौर पॅनेल आधारित ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यावर भर दिला जाईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
Union Budget 2022 LIVE : संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी 25 टक्के बजेटची तरतूद सरकारकडून केली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. सीमांवर अतिरिक्त परिस्थिती असल्याने या अर्थसंकल्पात संरक्षणावर अधिक लक्ष दिले जात आहे.
Union Budget 2022 LIVE : 2022 मध्ये 5G सेवा सुरू केली जाईल आणि गावांमध्ये ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. दूरसंचार क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी शोधल्या जातील, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
Union Budget 2022 LIVE : यंदाच्या वर्षापासून देशात ई-पासपोर्ट उपलब्ध होतील आणि त्यात चिप्स असतील, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. पासपोर्ट सेवा केंद्रे ई-पासपोर्टसाठी अपग्रेड केली जातील आणि नवीन तंत्रज्ञानावर आधारित पासपोर्ट सेवा प्रदान करण्यासाठी वाटप केलं जाईल.
Union Budget 2022 LIVE : यंदाच्या वर्षापासून देशात ई-पासपोर्ट उपलब्ध होतील आणि त्यात चिप्स असतील, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. पासपोर्ट सेवा केंद्रे ई-पासपोर्टसाठी अपग्रेड केली जातील आणि नवीन तंत्रज्ञानावर आधारित पासपोर्ट सेवा प्रदान करण्यासाठी वाटप केलं जाईल.
9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार, त्यासाठी नवीन योजना राबविणार
मोठ्या प्रमाणावर सरकारकडून धान्याची खरेदी, पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
देशात मोठ्या प्रमाणावर तेलबिया आयात केल्या जातात, तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार
शेतकऱ्यांना पिकावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार
नैसर्गीक शेतीसाठी, झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देणार, त्याचे नियोजन करण्यासाठी योजना राबविणार.
ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करणार
कृषी आधारीत स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार, युवकांना मदत करणा्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून भांडवल पुरवणार
- वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना आणणार, छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना याचा लाभ होणार आहे
- पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार रेल्वेचं जाळं विकसित करणार
- मेट्रोच्या विकासासाठी प्रयत्न करणार मेट्रोचं जाळं प्राधान्यानं विकसित करणार
- 2022-2023 मध्ये आठ ठिकाणी रोप वे सुरु करणार रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल वापरणार
- पीएम गतीशक्ती योजनेद्वारे एक्स्प्रेस हायवे विकसित करण्याचे ध्येय या योजनेसाठी 25 हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित वाहतूक आणि दळवळण वेगवान होणार यामुळं प्रवासाचा वेळ कमी होणार इंधनाचा खर्च कमी वाचणार
Union Budget 2022 LIVE : "पोस्ट ऑफिसमध्येही ऑनलाइन हस्तांतरण शक्य होणार असून पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग सेवेअंतर्गत येणार आहे. 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग सुरू करण्यात येणार आहे. 2022 पासून पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल बँकिंगवर काम केले जाईल. पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध होणार आहे.", अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.
Infrastructure Union Budget 2022 LIVE : सन 2022-23 मध्ये 80 लाख नवीन घरे बांधण्यात येणार असून त्यासाठी 48,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. शहरी भागात नवीन घरे आणि ग्रामीण भागासाठी आधुनिक घरे बांधण्यासाठी अधिक निधीची तरतूद केली जाईल : अर्थमंत्री
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे :
- आत्मनिर्भर भारत योजनेमुळे 16 लाख रोजगाराच्या संधी
- तर मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख रोजगार उपलब्ध
- पुढील आर्थिक वर्षात 9.2% विकास दर अपेक्षित आहे
- ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाईल
- पुढील आर्थिक वर्षात 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवणार
- येत्या 3 वर्षात 400 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार
- गतीशक्ती मास्टर प्लॅनद्वारे पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार
- शहरी वाहतूक रेल्वे मार्गाशी जोडणार
Education Sector Budget 2022 LIVE : अर्थमंत्री शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना म्हणाल्या की, "शिक्षण क्षेत्राबाबत बोलायचे झाले तर डिजिटल विद्यापीठांची निर्मिती करण्यात येणार असून शाळांमधील प्रत्येक वर्गात टीव्ही लावण्यात येणार आहे. स्किल इंडिया मिशनच्या माध्यमातून आणि सरकारी योजनांतर्गत कुशल कामगार तयार करण्यासाठी युवाशक्ती बनविण्याचे काम केलं जाईल. लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन वाढवण्यासाठी सरकारी प्रकल्पांची संख्या वाढवण्यात येणार आहे"
#UnionRailwayBudget2022 : एक उत्पादन, एक रेल्वे स्टेशन ही योजना लागू केली जाईल, तसेच 400 नवीन वंदे भारत ट्रेन सादर केल्या जातील : अर्थमंत्री
Agriculture Union Budget 2022 Updates : शेतकऱ्यांना डिजिटल सेवा पुरविल्या जातील आणि भारतातील गरिबी निर्मूलनाच्या ध्येयावर जोमाने काम केले जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ड्रोनच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला चालना देणार. 100 गती शक्ती कार्गो टर्मिनस बनवण्यात येणार आहे, असंही अर्थमंत्री म्हणाल्या.
Nirmal Sitharaman LIVE : 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीने देशातील 5 मोठ्या नद्या जोडण्याचे कामही केले जाणार आहे. देशात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर काम सुरू असून गंगेच्या काठावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.
Union Budget 2022 LIVE : 2021-22 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 9.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे आणि अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचे परिणाम दिसून येत आहेत. देशात 25 हजार किमीचे महामार्ग विकसित केले जाणार आहेत. देशातील 5 मोठ्या नद्या जोडण्याची योजना आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
#BudgetonABPMajha : येथे तुम्ही थेट टीव्हीवर बजेटचे कव्हरेज पाहू शकता
Union Budget 2022 LIVE : निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत बोलताना सांगितलं की, "एलआयसी (LIC) चा आयपीओ (IPO) लवकरच येणार असून त्यासाठी आवश्यक कार्यवाहीचे काम सुरळीत सुरू आहे. देशात आयटी (IT) आणि खाजगी क्षेत्राला चालना देण्यात येणार असून आधुनिक पायाभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे."
Union Railway Budget 2022 : येत्या काही वर्षांत 25 हजार किमीचा महामार्ग तयार करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पुढील 3 वर्षांत 100 नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. देशात 60 लाख नवीन नोकऱ्यांची व्यवस्था केली जाईल. 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची सरकारची क्षमता आहे : अर्थमंत्री
UNION BUDGET 2022 : या अर्थसंकल्पातून भारताला पुढील 25 वर्षांचा पाया मिळेल, असे अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या. पुढील आर्थिक वर्षात विकास दर 9.2% राहण्याची अपेक्षा आहे.
आपण ओमायक्रॉनच्या लाटेच्या मध्यभागी आहोत, आपल्या लसीकरण मोहिमेच्या गतीने खूप मदत झाली आहे. मला विश्वास आहे की, 'सबका प्रयास', हा मंत्र आपल्याला प्रगतीच्या दिशेनं पुढे नेईल : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
Nirmala Sitharaman Live : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जगभरात सुरु असलेल्या कोरोना महामारीचा उल्लेख केला. या महामारीच्या काळातही भारत आपली विकास यात्रा कायम ठेवेल अशी अपेक्षा
Union Budget 2022 : आज संसदेत अर्थसंकल्प सादर होणार असून त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली असून त्यात 2022-23 च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. आता संसदेत अर्थसंकल्प सादर होण्यास अवघे काही मिनिटे उरली आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Union Budget 2022 : दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रेल्वे, दळणवळण आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी संसदेत पोहोचले.
Union Budget 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पोहोचले.#UnionBudget2022 आज संसदेत सादर होणार आहे.
Union Budget 2022 : अर्थसंकल्पाच्या प्रती संसद भवनात दाखल. अर्थसंकल्प 2022ला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट.
Union Budget 2022-23 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज सकाळी 11 वाजता पेपरलेस बजेट, म्हणजेच डिजिटल अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी 8.15 मिनिटांनी निर्मला सीतारमण आपल्या निवासस्थानाहून रवाना झाल्या. त्यानंतर 9 वाजता त्या बजेट ब्रीफ केससह राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील. प्रस्थापित परंपरेनुसार, भारताच्या राष्ट्रपतींना सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रपती कोणतेही बदल सुचवत नसल्यामुळे ही बैठक नेहमीचीच असते. परंतु संसदेत अधिकृतपणे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते.
सलग चौथ्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. 2020-2021 मध्ये त्यांनी 2.42 तास (162 मिनिटं) भाषण देऊन स्वतःचा विक्रम मोडला. निवडणुकीच्या वातावरणात यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे अर्थसंकल्पीय भाषणही लांबण्याची शक्यता आहे.
आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. कोट्यवधी नागरिकांचे बजेटमधून आशा-आकांशा आणि स्वप्न पूर्ण होतील का ? महागाईची झळ बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना बजेटमधून काही दिलासा मिळेल का असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच अर्थतज्ज्ञांनाही पडले आहेत.
Union Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वेचे कोणते नवे प्रकल्प जाहीर करणार याकडे राज्यातील जनतेचे डोळे लागले आहेत. विशेषतः मुंबईकरांना लोकल प्रवासात दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार कोणत्या नव्या घोषणा करणार याची उत्सुकता आहे. मुंबईत रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडे १ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आलीय. मुंबई रेल्वे विकास महामंडळाची ही मागणी पूर्ण झाल्यास राज्य सरकारचा 1 हजार कोटी रुपयांचा वाटा मिळेल आणि दोन हजार कोटी रुपयांची तरतूद होऊ शकेल. मुंबईत एसी लोकलच्या एकेरी प्रवासाचं तिकीट स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Union Budget 2022 : आजच्या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, नोकरदार, महिला या सगळ्यांना काय मिळणार याची उत्सुकता आहे. कर रचनेत बदल होणार का याकडे नोकरदारांचं लक्ष असेल. उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांत निवडणूक होत असल्यानं शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होऊ शकतील असा अंदाज आहे. निवडणुकीच्या तोंडावर महागाईला आळा घालण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण काय उपाययोजना करतात याकडे देशातील जनतेचं लक्ष लागलं आहे. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठीही काही घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
Union Budget 2022 : अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी जीएसटीबाबत चांगली बातमी आहे. या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 1 लाख 38 हजार कोटी रुपये इतका जीएसटी जमा झालाय. विशेष म्हणजे कोरोनाची तिसरी लाट असताना जीएसटी वाढल्यानं अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला आहे. सलग चौथ्या महिन्यात जीएसटी 1 लाख 30 हजार कोटींवर गेल्यानं अर्थव्यवस्थेत चांगले बदल होत असल्याचं लक्षण मानलं जातंय.
Budget 2022 : कोरोनाचं संकट, महागाईचा वाढता आलेख, इंधनाच्या वाढत्या किंमती आणि घसरता रुपया या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर सादर होणाऱ्या या बजेटमध्ये अर्थमंत्री सीतारामण लोकप्रिय घोषणा करणार का? याची उत्सुकता आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची अपेक्षा आहे. नोकरदार आणि करदात्यांसाठी आयकरात दिलासा दिला जाणार का याकडेही लक्ष लागलं आहे. रोजगारवाढीसाठी अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा आहे. अर्थसंकल्पातच सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात तिकीटाचे दर, नवे प्रकल्प आणि नव्या गाड्या याबाबत अर्थमंत्र्यांच्या घोषणांकडे लक्ष असेल. मुंबईच्या लोकल रेल्वेसाठी केंद्र सरकार कोणत्या घोषणा करणार याकडे मुंबईकरांच्या नजरा आहेत.
Union Budget 2022 : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनाचे संकट काहीसे निवळल्याने अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने शेतकऱ्यांसाठी आणि करदात्यांसाठी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Union Budget 2022 : देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 9 वाजता आपल्या टीमसोबत अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी रवाना होतील. वित्त मंत्रालयाच्या महासंचालकांनी दिलेल्या (मीडिया आणि कम्युनिकेशन्स) माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Budget 2022 : कोरोनामुळे प्रभावित झालेली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अर्थमंत्र्यांसमोर ठोस पावलं उचलण्याचं आव्हान असणारे. मागणी-पुरवठ्यातील तफावत आणि पुरवठ्यातील व्यत्यय यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या 90 डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास आहेत. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारी तेल कंपन्या, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत नसल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. भविष्यात पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यास त्याचा थेट परिणाम महागाईवर होणार? असा प्रश्न सध्या निर्माण होतोय.
Budget 2022 : डिसेंबर 2021 मध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर पाच महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर होता. तर किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार की, नाही हे या अर्थसंकल्पात आज स्पष्ट होईल. तर खते, बी-बियाणे, पीक विमा, उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात काही नवीन योजना आणणार का?हे देखील पहावं लागणार आहे.
Union Budget 2022 : कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. डिसेंबर 2021 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर हा 7.91 टक्के इतका होता. त्यामुळे या अर्थसंकल्पात रोजगार वाढीसाठी कोणत्या ठोस उपाययोजना सरकार उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Budget 2022 : आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणारे. सकाळी 10 वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जाईल. बजेट सादर झाल्यानंतर पंतप्रधान बजेटवर बोलण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
Union Budget 2022 : देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2022-23 (Budget 2022) साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmal Sitharaman) सकाळी 9 वाजता आपल्या टीमसोबत अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी रवाना होतील. वित्त मंत्रालयाच्या महासंचालकांनी दिलेल्या (मीडिया आणि कम्युनिकेशन्स) माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील.
प्रस्थापित परंपरेनुसार, भारताच्या राष्ट्रपतींना सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रपती कोणतेही बदल सुचवत नसल्यामुळे ही बैठक नेहमीचीच असते. परंतु संसदेत अधिकृतपणे अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते.
- अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 8.15 वाजता आपल्या निवास्थानाहून रवाना होतील
- निर्मला सीतारमण आणि अर्थसंकल्प (Budget 2022) तयार करणारी टीम सकाळी 9 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतील.
- राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर सकाळी 10 वाजता निर्मला सीतारमण बजट ब्रीफ केससह संसदेत दाखल होतील. संसद भवनाच्या पायऱ्यांवर फोटोसेशल होईल.
- त्यानंतर संसद भवनात केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक पार पडेल, ज्यामध्ये अर्थसंकल्पाला औपचारिकरित्या मंजुरी देण्यात येईल.
- सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर होईल आणि अर्थमंत्री भाषण करतील
- बजेट स्पीचनंतर पंतप्रधान मोदी अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर वक्तव्य देतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -