एक्स्प्लोर

Budget 2020 | लेदर ब्रीफकेस ते खतावणी : अर्थसंकल्पाच्या बॅगचा प्रवास

मोदी सरकार 2.0 चा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला दुसरा अर्थसंकल्प मांडतील. या अर्थसंकल्पाकडे सामन्य जनतेसह तरुण, महिला, विद्यार्थी, उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी) सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. यावेळी अर्थमंत्र्यांसोबत असणाऱ्या बॅगबद्दल अनेकदा प्रश्न पडतात. सुरुवातील असलेल्या लेदर ब्रीफकेसची जागा आता खतावणीने घेतली आहे. जाणून घेऊया बजेटच्या ब्रीफकेसचा संपूर्ण इतिहास आणि प्रवास... 1. भारतात ब्रीफकेसची परंपरा ब्रिटनमधून आलेली आहे. इंग्लंडमध्ये ग्लॅडस्टोन बॉक्स वापरण्यात येत होता. 2. 1860मध्ये ब्रिटिश अर्थसंकल्प सादर करणारे चीफ विलियम ई. ग्लॅडस्टोन यांनी पहिल्यांदा ब्रीफकेसचा वापर केला होता. यामध्ये त्यांनी सोनेरी रंगाच्या क्वीन मोनोग्रामचा वापर केला होता. 3. ब्रिटनमध्ये ब्रीफकेस एका अर्थमंत्र्यांकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होत असे. परंतु, भारतात अर्थमंत्री वेगवेगळ्या ब्रीफकेसचा वापर करतात. 4. पहिल्या ग्लॅडस्टोन बॅग आता खराब झाली आहे. ब्रिटिश सर्विसने 2010मध्ये जुन्या ग्लॅडस्टोन बॅगेचा वापर करणं बंद केलं. 5. बजेटची बॅग चर्चेत यासाठी आहे कारण ग्लॅडस्टोन यांचं भाषण मोठं आणि प्रभावी असायचं. त्यांना भाषणाशी संबंधित दस्तऐवज ठेवण्यासाठी ब्रीफकेसची गरज भासत असे. 6. अर्थसंकल्पाचे दस्तावेज फार असतात, त्यामुळे ते ठेवण्यासाठी या ब्रीफकेसचा वापर करण्यात येतो. 7. भारतात अर्थसंकल्पाआधी या ब्रीफकेससोबत फोटो काढण्यात येतो. ब्रिटनमध्ये राजकोष चान्सलर 11 डाऊनिंग स्ट्रीटवर अर्थसंकल्प सादर करण्याआधी ब्रीफकेससोबत फोटो काढतात. 8. 1947 मध्ये देशाचे पहिले अर्थमंत्री आर.के. षण्मुखम शेट्टी यांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी लेदर ब्रीफकेसचा वापर केला होता. 9. 1970 ते 2019 दरम्यान भारताच्या अर्थमंत्र्यांनी हार्डबाऊन्ड ब्रीफकेसचा वापर सुरु केला. ही बॅग ब्रिटनच्या ब्रीफकेसपेक्षा वेगळी होती. 10. मागील वर्षी म्हणजे 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही परंपरा मोडली. अर्थसंकल्पाचे दस्तऐवज ठेवण्यासाठी त्यांनी लेदर ब्रीफकेसऐवजी खतावणीचा वापर सुरु केला. संबंधित बातम्या Budget 2020 LIVE | निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर, आर्थिक वर्षात विकासदर 6 ते 6.5 राहण्याचा अंदाज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा यंदाचा अखेरचा अर्थसंकल्प? Budget 2020 | आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपतींच्या अभिभाषणाकडे सर्वांचं लक्ष Financial Budget | अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे |WEB EXCLUSIVE | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget