एक्स्प्लोर

Budget 2026 : भारतात अर्थसंकल्प सादर करण्यास कधीपासून सुरुवात झाली, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला? जाणून घ्या

Budget 2026 :केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण येत्या रविवारी  1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

Budget 2026  नवी दिल्ली : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण या येत्या रविवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारमण यावेळी नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण यांचं भाषण सुरु होईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचं धोरण, भारतावर लादलेलं 50 टक्के टॅरिफ, सोने आणि चांदीचे वाढलेले दर आणि भारतीय शेअर बाजारातील घसरण या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा असणार आहे. 

Budget 2026 : भारतात अर्थसंकल्प सादर करण्यास कधीपासून  सुरुवात? 

भारतात ब्रिटीश काळात अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली होती. जगभरात अर्थसंकल्प सादर करण्याची सुरुवात ब्रिटनमध्ये झाली. भारतात पहिल्यांदा अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 सादर करण्यात आला होता. तो अर्थसंकल्प जेम्स  विल्सन यांनी सादर केला होता. अर्थसंकल्पात सरकार वर्षभरातील उत्पन्न आणि खर्चाचा लेखा जोखा मांडतं. 

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला?  

ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प 1947 मध्ये सादर करण्यात आला होता. हा अर्थसंकल्प तत्कालीन वित्तमंत्री आर के शनमुखम चेट्टी यांनी मांडला होता. शनमुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 ला देशाचा पहिला अर्थसंकल्प मांडला. शनमुखम चेट्टी यांचा जन्म 1892 मध्ये झाला होता. ते वकील आणि अर्थतज्ज्ञ होते.

बजेट शब्द कोठून आला?

Budget या शब्दाची अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी जोरदार चर्चा असते. Budget हा शब्द फ्रेंच भाषेच्या लॅटिन शब्द बुल्गापासून  आला आहे. याचा अर्थ चामड्याची पिशवी असा होता. बुल्गापासून फ्रेंच भाषेत तो शब्द बोऊगेट झाला. इंग्रजी भाषेत त्याला बोगेट म्हटलं जाऊ लागलं. नंतर बजेट शब्द प्रचलित झाला. 

1 फेब्रुवारीला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण या नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सीतारमण पी. चिदंबरम यांच्या 9 अर्थ संकल्प सादर करण्याच्या विक्रमासोबत बरोबरी करतील. प्रणव मुखर्जी यांनी 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. मोरारजी देसाई यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प यापूर्वी 28 फेब्रुवारीला सादर केला जायचा. नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात यामध्ये बदल करण्यात आला आणि अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीपासून सादर करण्यात येऊ लागला. अरुण जेटली अर्थमंत्री असताना 28 फेब्रुवारी ऐवजी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाऊ लागला. निर्मला सीतारमण यंदा देशाचा 88 वा अर्थसंकल्प सादर करतील. निर्मला सीतारमण आणि केंद्र सरकार यावेळी अर्थसंकल्पातून देशातील नागरिकांना काय दिलासा देतात हे पाहावं लागेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget