Budget 2025: अटल पेन्शन योजनेवर मोठ्या घोषणाची शक्यता, 5000 नव्हे तर दरमहा इतकी मिळेल पेन्शन....
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन इतिहास काही दिवसात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.यामध्ये अटल पेन्शन योजनेवर मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) येत्या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प (Budget 2025) 1 फेब्रुवारी रोजी सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागलेल्या आहेत. अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजनेबाबत (Atal Pension Yojana) सरकारकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार अटल पेन्शन योजनेतून दिल्या जाणाऱ्या पेन्शनच्या वाढ करण्याची शक्यता आहे .सध्या अटल पेन्शन योजनेतून 1000 ते 5000 रुपयांची रक्कम दिली जाते. पेन्शनची रक्कम लाभार्थ्याकडून दिल्या जाणाऱ्या योगदानाच्या रकमेवर आधारित असते.
सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार या योजनेतून मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेला वाढवण्यासंदर्भातील प्रस्तावाला मंजूर देऊ शकते. किमान पेन्शनची रक्कम वाढवून 10000 रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. अटल पेन्शन योजना सरकारची एक अशी पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये गरिबांना आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना निवृत्तीच्या काळात आर्थिक मदत देण्याचा उद्देश सरकारचा आहे. सन 2015 16 मध्ये पेन्शन फंड रेगुलटरी अँड डेव्हलपमेंट कडून या योजनेची सुरुवात करण्यात आली. सध्या या योजनेत किमान पेन्शन रक्कम रुपये 1000 ते 5000 रुपये दिले जाते.
योजनेची वैशिष्ट्ये :
अटल पेन्शन योजनेचा सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर वारसदाराला पूर्ण पैसे दिले जातात. या योजनेत खाते उघडण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 दरम्यान असणे आवश्यक आहे. योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तुमच्याकडे एक बँक खातं असणं आवश्यक आहे. तुम्ही नोंदणी अर्ज घेऊ शकता किंवा बँकेच्या वेबसाईट वरुन डाऊनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर पूर्ण अर्ज भरून पेन्शन ऑप्शन निवडा यानंतर आधार कार्ड तर आवश्यक कागदपत्रांचे तो फॉर्म जमा करा.
योजनेतून वय वर्षे 60 पूर्ण होण्यापूर्वी बाहेर पडायचं असल्यास काय?
अर्जदारानं वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर संबंधित बँकेला किमान किंवा कमाल मासिक पेन्शन बँक खात्यात जमा करण्यासाठी विनंती अर्ज करावा लागेल. त्यानंतर दरमहा पेन्शनची रक्कम संबंधित खातेदाराला मिळेल. एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाल्यास संबंधित रक्कम त्याच्या वारसदारांना मिळेल. जर एखाद्या खातेदाराला पेन्शन योजनेतून वयाची 60 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी बाहेर पडायचं असेल तर त्याला त्यानं जमा केलेली रक्कम मिळेल. यासोबत सरकारनं त्या रक्कमेवर मिळवलेलं निव्वळ उत्पन्न दिलं जाईल, याशिवाय खात्याचा मेंटनन्स चार्ज वजा करुन घेतला जाईल. एखाद्या खातेदाराचा 60 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना म्हणजेच पत्नी किंवा मुलांना ते खातं सुरु ठेवण्याचा पर्याय दिला जातो.
दरम्यान, भारतीय पोस्ट किंवा कोणत्याही बँकेतून या योजनेसाठी तुम्हाला खाते उघडावे लागेल. अटल पेन्शन योजनेत दरमहा, सहामाही किंवा वार्षिक योगदान देता येते. यात योजनेत सहभागी होण्याचं वय, अपेक्षित पेन्शन रक्कम यानुसार योगदान द्यावं लागेल.
इतर बातम्या :