एक्स्प्लोर

Share Market Opening : अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात जोरदार सुरुवात, सेन्सेक्‍ससह निफ्टी तेजीत

Share Market Opening Bell : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 60000 च्या पुढे व्यवहार करत आहे.

Share Market Opening Bell : आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर होणार असताना शेअर बाजारात (Share Market) चांगली सुरुवात आहे. आज बाजारात सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्ससह (Sensex) निफ्टीची (Nifty 50) घोडदौड पाहायला मिळत आहे. बुधवारी सेन्सेक्स 451.27 अंकांच्या वाढीसह 60,001.17 अंकांच्या पातळीवर उघडला. तसेच, निफ्टीची उसळी पाहायला मिळाली. आजच्या सत्रात निफ्टीने 17,811.60 अंकांवर व्यवहार केला. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी वाढून 81.78 वर पोहोचला आहे.

शेअर बाजाराची चांगली सुरुवात

अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. BSE चा सेन्सेक्स 411 च्या वाढीसह 59,961.81 वर व्यवहार करत आहे. NSE चा निफ्टी देखील 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 17,780 वर व्यवहार करत आहे.

गुंतवणूकदारांना दिलासा मिळण्याची शक्यता

शेअर बाजारात अर्थसंकल्पाच्या दिवशी नेमकं (Share Market On Budget Day) कसं वातावरण असणार, याची चिंता गुंतवणूकदारांना लागली आहे. मागील 12-13 वर्षांचा ट्रेंड लक्षात घेता, गुंतवणूकदारांना शेअर बाजारात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात काही सकारात्मक बाबी समोर आल्याने बाजारात तेजी दिसून आली.

सेन्सेक्ससह निफ्टीची घोडदौड सुरु

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 शेअर्स वाढीसह हिरव्या चिन्हासह व्यवहार करत आहेत. तर सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि मारुती सुझुकी हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

बँक निफ्टीमध्ये एक टक्क्यांची वाढ

बँक निफ्टीमध्ये एक टक्क्यांची वाढ झाली आहे. बँक निफ्टी 1.06 टक्क्यांच्या वाढीसह 41,085.40 वर व्यवहार करत आहे. ICICI बँकेत 2.28 टक्क्यांची जबरदस्त वाढ झालेली दिसत आहे. कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआयचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.

संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी

अर्थसंकल्पाकडून संरक्षण क्षेत्राला मोठ्या आशा आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी संरक्षण क्षेत्रातील समभाग वाढतात. बीडीएल, बीईएल गार्डन रीच, एचएएलचे शेअर्स वाढले आहेत.

'या' शेअर्समध्ये तेजी

आज सुरुवातीच्या सत्रामध्ये आयसीआयसीआय बँक, डीक्सॉन टेक्नॉलॉजी, जिंदाल स्टील, जीटीएल, पॉलिकॅब, महिंद्रा सीआयई, PNC इन्फ्राटेक हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.

'या' शेअर्समध्ये घसरण

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात अदानी, सन फार्मा, इंडस टॉवर्स, मॅकडॉनल्ड, आयबीएम, कॅटरपिलर हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आज मोदी सरकारचा निवडणूकपूर्व शेवटचा अर्थसंकल्प

देशात काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार? सर्वसामान्यांच्या करात वाढ होणार की, त्यांना दिलासा मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या आज देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) संसदेत मांडणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि विविध क्षेत्रांना काय मिळणार याची स्पष्टता आज दुपारपर्यंत होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Embed widget