(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जानेवारीतील GST करातून तब्बल 1.38 लाख रुपयांची कमाई; चौथ्यांदा ओलांडला 1.30 कोटींचा टप्पा
GST Collection: जानेवारी 2021 च्या तुलनेत या वर्षीचा GST महसूल हा 15 टक्क्यांनी अधिक आहे.
नवी दिल्ली: मंगळवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आहे. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या कमाईतून जानेवारी 2022 महिन्यात केंद्र सरकारला तब्बल 1.38 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्या आधी सप्टेंबर 2021 मध्ये केंद्र सरकारला जीएसटीच्या करातून 1.30 लाख कोटी रुपये मिळाले होते. त्या तुलनेत या जानेवारीतील जीएसटी महसूल अधिक आहे.
जानेवारी 2022 मध्ये मिळालेल्या जीएसटीमध्ये राज्य सरकारचा जीएसटी 32,016 कोटी रुपये, इंटिग्रेटेड जीएसटी म्हणजे आयजीएसटीमधून 72,030 कोटी रुपये, सेसमधून 9,674 कोटी रुपये यांचा समावेश आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2022 मध्ये जीएसटी महसूल हा जानेवारी 2021 महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 15 टक्के आणि आणि जानेवारी 2020 मधील जीएसटी महसुलापेक्षा 25 टक्क्यांनी अधिक आहे.
GST collection crossed Rs 1.30 lakh crore mark for the 4th time. Rs 1,38,394 crore Gross GST Revenue collected for Jan 2022. Revenues for month of Jan 2022 15% higher than GST revenues in the same month last year & 25% higher than the GST revenues in Jan 2020: Ministry of Finance
— ANI (@ANI) January 31, 2022
गेल्या वर्षी, एप्रिल 2021 साली सरकारला सर्वाधिक म्हणजे 1.39 लाख कोटी रुपये मिळाले होते. जीएसटी महसूलाने आतापर्यंत चौथ्यांदा 1.30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- ABP Cvoter Survey On Budget: चार जणांच्या कुटुंबाचं प्रत्येक महिन्याचं उत्पन्न किती असावं? पाहा जनतेचा कौल
- Economic Survey 2021-22 : आगामी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी 2021-22 सालचा आर्थिक सर्व्हे सादर
- Share Market : बजेटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी, Sensex 800 अंकांनी वधारला, Nifty देखील 17,300 च्या वर