BSNL चा सर्वात स्वस्त अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन, दररोज 3GB डेटा, पैसा वसुल; लवकरच 5G तही पदार्पण
विशेष म्हणजे डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होऊन तो 40 kbps पर्यंत येतो. तसेच, दररोज 100 SMS सुद्धा तुम्हाला वापरता येऊ शकतात.
मुंबई : डिजिटल इंडियात कधी मोफत मिळणारं इंटरनेट आता अत्यंत महाग झालं आहे. मात्र, कधीकाळी बफरिंगच्या समस्येनं त्रस्त झालेल्या युजर्संना आता 5 जी सुविधाही मिळू लागल्याने इंटरनेटचा स्पीड हायस्पीड झाल्याचं पाहायला मिळतं. त्यातच देशातील मोबाईल युजर्संची संख्या झपाट्याने वाढत असल्याने इंटरनेटही गरजेचं झालं आहे. मोबाईल रिचार्ज असो किंवा युपीआय पेमेंट असो, तुम्हाला इंटरनेट असल्याशिवाय पुढेच जाता येत नाही. त्यामुळे, दरमहा इंटरनेट डेटा पॅक ही तुमची मासिक गरज बनली आहे. गेल्या काही महिन्यात एअरटेल आणि जिओने आपल्या रिचार्ज व डेटा प्लॅनमध्ये 20 टक्के वाढ केल्याने युजर्संने संतापही व्यक्त केला. त्यावेळी, अनेकांनी बीएसएनएल हा उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं. आता, स्वस्तातील डेटा व कॉलिंगच्या प्लॅनसाठी बीएसएनएलचा हा प्लॅन तुम्हाला फायदेशीर आहे. त्यामध्ये, वर्षभराच्या प्लॅनसाठी म्हणजे 365 दिवसांच्या प्लॅनसाठी 2999 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.
BSNL चा 2999 रुपयांचा वार्षिक प्लॅन (Deta) अनलिमिटेड कॉलिंग, रोमिंग कॉलिंग असून दररोज 3 जी डेटा मिळणार आहे. विशेष म्हणजे डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होऊन तो 40 kbps पर्यंत येतो. तसेच, दररोज 100 SMS सुद्धा तुम्हाला वापरता येऊ शकतात.
बीएसएनएल (BSNL) 4जी
बीएसएनएलकडून सध्या 4जी चे काम सुरू असून लवकरच युजर्संना 4जी नेटवर्क सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे टाटाकडून डेटा सेंटरही उभारण्यात आलं असून टीसीएसने काम देखील सुरू केलं आहे. लवकरच ही सेवा सुरू होऊन देशभरात बीएसएसएनलचं 4जी नेटवर्क लागू होईल. त्यामुळे, नेटीझन्सला कमी किंमतीत फास्ट इंटरनेट सुविधा मिळणार आहे. त्यामुळे, युजर्संकडून लवकरात लवकर BSNL ची 4जी व 5जी सेवा सुरु करण्याची मागणी केली जात आहे.
केंदीय मंत्र्यांचा BSNL 5G ला ग्रीन सिग्नल
बीएसएनएलकडून 5जी नेटवर्क सेवेचंही काम सुरू करण्यात आलं आहे. एअरटेल व जिओच्या दरात वाढ झाल्यामुळे रिचार्ज करण्यासाठी महिन्याला अधिक पैसे मोजावे लागत आहे. त्यातच, ग्राहकांना कमी किंमतीत अधिक चांगले प्लॅन बीएसएनएलकडून पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे, बीएसएनएलचं 5जी नेटवर्क लवकर सुरू झाल्यास युजर्संची संख्या वाढू शकते. विशेष म्हणजे केंद्रीयमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनीही बीएसएनएल 5जी नेटवर्कला हिरवा झेंडा दर्शवला आहे. स्वत: शिंदेंनी या नेटवर्कद्वारे कॉलिंग केलं होतं. त्यामुळे, नेटीझन्सचं लक्ष पुन्हा एकदा बीएसएनएलकडे केंद्रीत झालं आहे. पुढील वर्षापर्यंत बीएसएनएलची सेवा मेट्रो सिटीमध्ये सुरू होईल.
हेही वाचा
BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून