एक्स्प्लोर

85 हून अधिक देशांना मद्य पुरवणारे ललित खेतान कोण? भारतातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश 

फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या (Forbes Billionaire) यादीत आणखी एका भारतीयाचा समावेश झाला आहे. ज्यांचे नाव ललित खेतान ( Lalit Khaitan) आहे. हे तेच ललित खेतान आहेत, की ज्यांची कंपनी रॅडिको खेतान मद्य बनवते.

Forbes Billionaire News : फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या (Forbes Billionaire) यादीत आणखी एका भारतीयाचा समावेश झाला आहे. ज्याचे नाव ललित खेतान ( Lalit Khaitan) आहे. हे तेच ललित खेतान आहे, की ज्यांची कंपनी रॅडिको खेतान मद्य बनवते. यावर्षी या कंपनीच्या नेट वर्थ आणि कंपनीच्या मूल्यांकनात प्रचंड वाढ झाली आहे. ललित खेतान यांची कंपनी जगातील 85 पेक्षा जास्त देशांना दारु पुरवते. यामध्यमातून या कंपनीनं कोट्यवधी रुपये मिळवले आहेत.

ललित खेतान बनले देशाचे नवे अब्जाधीश

दिल्लीस्थित मद्य कंपनी रॅडिको खेतान आणि तिचे अध्यक्ष ललित खेतान हे  देशाचे नवे अब्जाधीश बनले आहेत. त्यांचे वय सध्या 80 वर्ष आहे. फोर्ब्सच्या यादीत त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, ललित खेतानची एकूण संपत्ती एक अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत चालू वर्षात ललित खेतानची एकूण संपत्ती किती वाढली हे देखील पाहुयात. 

कंपनीच्या शेअर्समध्ये 59 टक्क्यांची वाढ  

फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार, रॅडिको खेतानच्या शेअर्समध्ये यावर्षी 59 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रॅडिको खेतानच्या शेअर्समध्ये आज 1.82 टक्क्यांची घसरण झाली असेल, परंतु कंपनीचे शेअर्स 1,615.05 रुपयांवर आहेत. तर 31 डिसेंबर 2022 रोजी कंपनीचा हिस्सा 1,014 रुपये होता. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 21,594.45 कोटी रुपये आहे. तर गेल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कंपनीचे मार्केट कॅप 13,557.95 कोटी रुपये होते. याचा अर्थ या कालावधीत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 8,036.5 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

दीड दशकात 15 ब्रँड बाजारात आणले

अहवालानुसार, देशातील सर्वात मोठी दारु कंपनी रॅडिको खेतान आपल्या उत्पन्नाच्या 80 टक्क्यांहून अधिक कमाई या विभागातून करते. ललित खेतान यांचा मुलगा अभिषेक खेतान याने 26 वर्षांपूर्वी म्हणजेच 1997 मध्ये हा व्यवसाय हाती घेतला होता. त्यानंतर त्यांनी कंपनीची ब्रँड इमेज आणखी वाढवण्याचे काम केले. गेल्या दीड दशकात कंपनीने प्रत्येक सेगमेंटवर लक्ष केंद्रित केले आणि 15 नवीन ब्रँड बाजारात आणले. ज्याचा कंपनीला सतत फायदा होत आहे.

कंपनीची दारू 85 हून अधिक देशांमध्ये जाते

जर आपण फक्त उत्तर भारताबद्दल बोललो तर उत्तर प्रदेशातील रामपूरची डिस्टिलरी कोणाला माहित नाही. सर्वांना ही कंपनी माहित आहे. याचे संपूर्ण देशात 14  प्लांट आहेत. कंपनीचे देशाच्या विविध भागात 28 बॉटलिंग प्लांट आहेत, त्यापैकी 5 स्वतःचे आहेत आणि 23 प्लांट करारावर आहेत. सध्या कंपनीचे एमडी अभिषेक खेतान असून त्यांनी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. विशेष बाब म्हणजे सध्या रॅडिको खेतान ही भारतातील विदेशी दारू बनवणारी आघाडीची कंपनी बनली आहे. त्याचे ब्रँड जगातील 85 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केले जातात.

कंपनीचे हे मद्य प्रसिद्ध 

मिळालेल्या माहितीनुसार,यांच्या कंपनीचा महसूल 380 दशलक्ष डॉलरवर आला आहे. रॅडिको खेतानने उत्पादित केलेल्या ब्रँडमध्ये मॅजिक मोमेंट्स, 8 पीएम व्हिस्की, ओल्ड अॅडमिरल ब्रँडी आणि रामपूर सिंगल माल्ट यांचा समावेश आहे. रॅडिको खेतानच्या आधी या कंपनीचे नाव रामपूर डिस्टिलरी अँड केमिकल कंपनी लिमिटेड होते. ललित खेतान यांनी अजमेरच्या मेयो कॉलेज आणि कोलकाता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी बंगळुरुच्या बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून अभियांत्रिकी पदवी देखील मिळवली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

एक महिला चालवतेय 41 हजार कोटींची दारु कंपनी, एका IPL च्या संघाचीही मालकी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget