कोथिंबिरीच्या दरात मोठी घसरण, सध्या मिळतोय एवढा दर?
सध्या बाजारात कोथिंबिरीच (coriander) मोठी आवक होताना दिसत आहे. त्यामुळं त्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Coriander Price : सध्या बाजारात कोथिंबिरीच (coriander) मोठी आवक होताना दिसत आहे. त्यामुळं त्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भाव कमी होत असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये एकाच दिवसात 936 क्विंटल कोथिंबिरीची आवक झाल्याचे सांगण्यात आले. बाजारांत सध्या कोथिंबिर 5 ते 10 रुपये किलो दरानं विकली जात आहे.
महाराष्ट्रात शेतमालाच्या भावाबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एका उत्पादनाची किंमत वाढली की दुसऱ्याची किंमत कमी होते. अनेक वेळा बहुतांश पिकांचे भाव गडगडत राहतात. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सध्या एकीकडे कांद्याच्या निर्यात बंदीमुळे शेतकरी चिंतेत असून, त्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात हिरव्या कोथिंबिरीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. . शेतकऱ्यांना बाजारात आणण्याचा खर्चही मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अनेक बाजारांत कोथिंबिरीचा दर हा 5 ते 10 रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपला खर्चही भागवता येत नाही. त्यामुळे निराश झालेल्या अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजाराबाहेर फेकून द्यावा लागत आहे.
कोथिंबिरीची बंपर आवक
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचीच विक्रमी आवक होत आहे. तसेच कोथिंबिरीची बंपर आवक होत आहे. येथे अवघ्या एका दिवसात 9714 जुडी कोथिंबिरीची आवक झाली. त्यामुळं भावात मोठी घट झाली. शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नसल्याने ते आक्रमक झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून फोनवरून भाव विचारला आणि आपला शेतमाल रस्त्यावर फेकून दिला. बहुतांश बाजार समित्यांमध्ये पाच ते सात रुपयांपर्यंत भाव असल्याचे दिसून आले. पुण्याच्या बाजार समितीत आज 1 लाख 99 हजार 367 पोती कोथिंबिरीची आवक झाली. बाजारात कोथिंबिरीची मोठी आवक होताच त्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. किमान खर्च जरी झाला असता तरी शेतकरी समाधानी झाला असता. राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये एकाच दिवसात 936 क्विंटल कोथिंबिरीची आवक झाल्याचे सांगण्यात आले आहे. बहुतांश बाजार समित्यांमध्ये त्याचा भाव केवळ 10 रुपये प्रतिकिलो राहिला आहे.
कोणत्या बाजारात किती दर?
भुसावळ बाजारात 26 जानेवारी रोजी कोथिंबिरीचा किमान भाव केवळ 1200 रुपये प्रतिक्विंटल होता, तर कमाल भाव 2000 रुपये होता.
25 जानेवारी रोजी कोल्हापूर मंडईत कोथिंबिरीचा किमान भाव 1000 रुपये प्रति क्विंटल होता. म्हणजे त्यांना केवळ 10 रुपये किलोने विकावे लागत आहे.
चंद्रपूर गंजवड मंडईतही कोथिंबिरीचा किमान भाव 1000 रुपये आणि कमाल 2000 रुपये प्रतिक्विंटल होता.
जळगाव मंडईत कोथिंबिरीचा किमान भाव केवळ 500 रुपये प्रतिक्विंटल होता. कमाल भाव 1500 रुपये प्रतिक्विंटल होता. म्हणजे शेतकऱ्यांना किमान 5 रुपये किलो दराने कोथिंबीर विकावी लागली.
मुंबईत कोथिंबिरीची बंपर आवक झाली. त्यामुळे येथेही भाव कोसळले. येथे किमान 800 रुपये व कमाल 1000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
महत्वाच्या बातम्या:
भारतापेक्षा परदेशात 'या' टोमॅटोला अधिक मागणी, एकरात मिळतोय 5 लाखांचा निव्वळ नफा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
