(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फक्त तीन दिवसांसाठी 'या' शेअरमध्ये पैसे टाका, मिळणार दमदार रिटर्न्स; जाणून घ्या टार्गेट काय असावे?
जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडांची भारतीय शेअर बाजारावरही परिणाम होत आहे. मात्र हा शेअर आगामी दोन ते तीन दिवसांत चांगला परतावा देण्याची शक्यता आहे.
Stock to Buy: सध्या जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींचा जगभरातील शेअर बाजारवर परिणाम पडत आहे. कच्च्या तेलाची किंमत वाढली आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्यात शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात काहीशी सकारात्मकता दिसली. सुरुवात चांगली झाली असली तरी नंतर सोमवारी शेअर बाजारात चढउतार पाहायला मिलाली. दरम्यान, सध्या शेअर बाजारात काहीसे चढउतार पाहायला मिळत असला तरी काही कंपन्या चांगले रिटर्न्स देऊ शकतात. मोतीलाल ओस्वाल या ब्रोकरेज फर्मने एक जबरदस्त स्टॉक सूचवला आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत हा शेअर चांगला परतावा देऊ शकतो, असे मोतीलाल ओस्वाल या ब्रोकरेज फर्मचे मत आहे.
शेअर बाजाराची काय स्थिती?
भारतीय शेअर बाजारातील मुंबई शेअर बाजाराची 400 अंकांच्या वाढीने सुरुवात झाली होती. तर निफ्टीनेदेखील 100 अंकांच्या वाढीसह आजच्या सत्राला सुरुवात केली. आज निफ्टी बँकेचा निर्देशांकदेखील 300 अंकांनी वाढला होता. सध्या निफ्टीचा निर्देशांक 225.40 अंकांच्या घसरणीसह 24789.20 अंकांपर्यंत घसरला आहे. तर दुसरीकडे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या निर्देशांकात 662.31 अंकांची घसरण झाली आहे. सध्या सेन्सेक्स 81026.14 अंकांवर आहे.
दोन-तीन दिवसांत देणार बम्पर रिटर्न्स?
मोतीलाल ओस्वाल या ब्रोकरेज फर्मने डॉ. लाल पॅथ लॅब्स या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत हा शेअर चांगला परतावा देईल, अशी शक्यता या ब्रोकरेज फर्मने व्यक्त केली आहे. मोतीलाल ओस्वालने या स्टॉकला दोन ते तीन दिवसांसाठी टेक्निकल पिक म्हटलं आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी 3655 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे, असे मोतीलाल ओस्वालने सूचवले आहे. 4 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3495 रुपयांवर बंद झाला होता. आगामी दोन ते तीन दिवसांत हा शेअर 5 ते 6 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता मोतिलाल ओस्वालने व्यक्त केली आहे.
एका आठवड्यात चार टक्क्यांनी वधारला
सोमवरी सत्र चालू झाल्यानंतर Dr Lal Path Labs चा शेअर चांगल्या स्थितीत दिसला. शेअर बाजार चालू होताच या शेअरमध्ये 1 टक्क्याची वाढ झाली. त्यानंतर काही वेळाने हा शेअर 2 टक्क्यांनी घसरला. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये फारसे चढउतार पाहायला मिळाले नाही. मात्र सहा महिन्यांत या शेअरने आल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर 3 महिन्यात हा शेअर 18 टक्क्यांनी वर गेलेला आहे. एका वर्षात या शेअरने 38 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.एका आठवड्यात हा शेअर 3 टक्के तर 2 आठवड्यांत 4 टक्क्यांनी वर गेला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 28,454 लाख कोटी रुपये आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
आरोग्य विम्याचा क्लेम कंपन्या का नाकारतात? 'ही' आहेत 6 प्रमुख कारणं?