मुंबईतील म्हाडाच्या घरांची सोडत काही तासांवर, देकारपत्र, स्वीकृतीपत्र आहे तरी काय? सोप्या शब्दांत समजून घ्या नियम!
म्हाडाच्या घरांची सोडत लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे घराची लॉटरी लागल्यानंतर काय करावे, हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या घरांची चांगलीच चर्चा होती. म्हाडाने मुंबई मंडळात एकूण 2030 घरांची सोडत प्रक्रिया राबवली होती. आता 8 ऑक्टोबर रोजी या सोडत प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजेच कोणाला घर मिळालं आणि कोणाची संधी हुकली हे 8 ऑक्टोबरला समजणार आहे. दरम्यान, या लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर पुढची प्रक्रिया नेमकी कशी असते? घराची रक्कम नेमकी कशी भरायची असते? असे विचारले जात आहे. सोडतीतमध्ये तुम्हाला घर मिळाल्यास घराची रक्कम कशी भरायची असते ते जाणून घेऊ.
यशस्वी उमेदवारांना म्हाडा देकारपत्र देणार
सोडतीसाठी पात्र असलेल्या अर्जदारांचे अर्ज क्रमांकांची आरक्षण निहाय प्रारुप यादी म्हाडाच्या housing.mhada.gov.in व mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर व Mobile App- Mhada Housing Lottery System वर प्रसिद्ध करण्यात येईल. MHADA IHLMS 2.0 या संगणकीय प्रणालीव्दारे सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची संगणकीय सोडत दिनांक सुरु करण्यात येईल. सोडतीत यशस्वी झालेल्या तसेच प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांचे अर्जाचे क्रमांक, नाव इत्यादी म्हाडाच्या housing.mhada.gov.in a mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर व Mobile App- Mhada Housing Lottery System वर प्रसिध्द करण्यात येतील. संगणकीय सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना तात्पुरते देकारपत्र Online Login मध्ये प्राप्त होईल.
...तर कोणत्याही क्षणी सदनिका वितरण रद्द
अर्जदाराची पात्रता सोडतीपुर्वीच संगणकीय प्रणालीद्वारे निश्चित केली जाईल. मात्र, सोडतीनंतर अर्जदाराने सादर केलेले दस्तऐवज / प्रमाणपत्र / पुरावे इतर माहीती असत्य, खोटी, बनावट आढळून आल्यास अर्जदाराचे सदनिका वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
10 दिवसांच्या आत स्वीकृतीपत्र देणे बंधनकारक
अर्जदाराने सोडतीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर त्याचे स्वीकृतीपत्र हे कार्यालयीन कामकाजांच्या 10 दिवसांच्या आत संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागेल. अन्यथा अर्ज आपोआप रद्द होईल. तसेच अनामत रक्कमेतून 1000 वजावट करुन उर्वरित रक्कम विना व्याज अर्जदाराला परत केली जाईल. अर्जदाराने दिलेल्या बँक खात्या RTGS / NEFT व्दारे अनामत परतावा करण्याची कार्यवाही केली जाईल.
दरम्यान, सोडतीमध्ये अयशस्वी झालेल्या तसेच प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांना त्यांनी अदा केलेली संपूर्ण अनामत रक्कम (विनाव्याज) अर्ज शुल्क वगळून (ऑनलाईन अर्जापोटी अदा केलेले रु.500/- + जीएसटी 18% रु.90/-)-रु.590/-) Electronic Clearing System (E.C.S) / NEFT द्वारे अर्जदाराच्या बँक खात्यात अदा करण्यात येईल.
हेही वाचा :