एक्स्प्लोर

दरमहा फक्त 55 रुपये भरा, महिन्याला 3000 रुपये मिळवा; शेतकऱ्यांसाठी 'ही' आहे खास योजना

देशातील शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार (Govt)  विविध योजना आखत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत बदल घडवूण आणण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.

PM Kisan Mandhan Yojana: देशातील शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार (Govt)  विविध योजना आखत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत बदल घडवूण आणण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. दरम्यान, अशीच एक योजना म्हणजे  'किसान मानधन योजना'. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही योजना राबवली जाते. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती. 

योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये देण्याची तरतूद 

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक म्हणजे 'किसान मानधन योजना' (Kisan Mandhan Yojana). या योजनेअंतर्गत वयाची 60 वर्षे ओलांडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते. सामान्यत: उतारवयात शेतकऱ्यांना शेती करता येत नाही, तेव्हा त्यांना आर्थिक मदतीसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने 'किसान मानधन योजना' सुरु केली आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली, ज्याचा उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना (SMF) पेन्शनद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये देण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला दरमहा 1500 रुपये देण्याचीही तरतूद आहे.

दरमहा भरावे लागणार 55 रुपये 

18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:ची नोंदणी करू शकतात. शेतकरी कितीही वयात या योजनेचा भाग बनले तरी त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतील. यानंतर, वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर, शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन म्हणून दिले जाते. याद्वारे ते त्यांच्या आर्थिक गरजा भागवू शकतात.

छोट्या शेतकऱ्यांना दिलासा

देशातील अन्नदाता आर्थिक संकटामुळे मृत्यूला कवटाळत असताना ही योजना शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरत आहे. 'किसान मानधन' योजनेचा लाभ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो. अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात.

कसा कराल अर्ज? 

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शेत खसराआणि बँक खाते पासबुक असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना सर्वप्रथम 'किसान मानधन योजने'च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला होम पेजवर जाऊन लॉगिन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर त्यामध्ये मागितलेली आवश्यक माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल जो तुम्हाला टाकावा लागेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget