Bank FD : 'या' बँकांमध्ये FD करा, पाच वर्षानंतर मालामाल व्हा
जर तुम्हाला टॅक्स वाचवण्यासोबतच भरपूर परतावा मिळवायचा असेल तर तुम्हा काही बँकांमध्ये FD करु शकता. या बँकांमध्ये तुम्हाला चांगला व्याजदर मिळेल.
Bank FD : जर तुम्हाला टॅक्स वाचवण्यासोबतच भरपूर परतावा मिळवायचा असेल, तर आता तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. टॅक्स सेव्हर एफडीमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही कर वाचवू शकता. यासाठी चांगला परतावा देखील मिळवू शकता. विशेष बाब म्हणजे टॅक्स सेव्हर एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कायद्यांतर्गत सूट मिळते. म्हणजेच तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी कर भरावा लागेल. याशिवाय व्याजाच्या स्वरुपात चांगली रक्कमही मिळेल. जाणून घेऊया त्या बँकांबद्दल की ज्यामध्ये टॅक्स सेव्हर एफडीवर चांगला व्याजदर मिळतो.
इंडसइंड बँक आणि येस बँकेत भरपूर व्याजदर
सध्या इंडसइंड बँक आणि येस बँक कर बचत एफडीवर भरपूर व्याजदर देत आहेत. तुम्ही या दोन बँकांमध्ये टॅक्स सेव्हिंग एफडी अंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.25 टक्के व्याज मिळू शकते. जर तुम्ही आता 1.5 लाख रुपयांची टॅक्स सेव्हिंग एफडी केली तर पाच वर्षांत ही रक्कम 2.15 लाख रुपये होईल.
HDFC बँकेकडून मिळतोय चांगला परतावा
एचडीएफसी बँकही टॅक्स सेव्हिंग एफडीवर प्रचंड व्याज देत आहे. विशेष म्हणजे खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये एचडीएफसी ही सर्वात मोठी बँक आहे. टॅक्स सेव्हिंग एफडीवर 7 टक्के व्याज दिले जात आहे. जर तुम्ही आता एचडीएफसी बँकेत टॅक्स सेव्हिंग एफडी केली तर तुम्ही पाच वर्षांनी श्रीमंत व्हाल. जर तुम्ही 1.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांनी 2.12 लाख रुपये मिळतील.
कर बचत FD वर 6.7 टक्क्यांपर्यंत व्याजाची ऑफर
जर आपण युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक बद्दल बोललो तर या दोन्ही बँका देखील कर बचत एफडीवर 6.7 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. मात्र, या दोन्ही सरकारी बँका आहेत. जर तुम्ही या दोन बँकांमध्ये पाच वर्षांसाठी 1.5 लाख रुपयांची एफडी केली, तर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला 2.09 लाख रुपये मिळतील. फेडरल बँक देखील टॅक्स सेव्हिंग एफडीवर चांगले व्याज देत आहे. तुम्ही टॅक्स सेव्हिंग एफडी केल्यास तुम्हाला 6.6 टक्के दराने व्याज मिळेल. जर तुम्ही आता टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षानंतर तुम्हाला 2.08 लाख रुपये मिळतील.
स्टेट बँक ऑफ इंडिया 6.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडिया देखील कर बचत एफडीवर 6.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळत आहे. याशिवाय इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक देखील 6.5 टक्के दराने व्याज देत आहेत. जर तुम्ही या बँकांमध्ये 1.5 लाख रुपयांची पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला 2.07 लाख रुपये मिळतील.