Bank Holidays : नोव्हेंबर महिन्यात 15 दिवस बँका बंद, बँकेच्या सुट्ट्यांची यादी
November Bank Holidays : नोव्हेंबर महिन्यात एक किंवा दोन नाही तर 15 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे बँकांची काम करण्याआधी बँकाँच्या सुट्टीचं वेळापत्रक पाहून घ्या.
Bank Holidays in November 2023 : आजपासून नोव्हेंबर (November) महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्याच बँकांसंदर्भात काही कामं करण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI-Reserve Bank of India) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार (RBI Holiday Calender) नोव्हेंबरमध्ये बँका 15 दिवस (Bank Holidays) बंद राहतील. या सुट्ट्यांमध्ये दिवाळी (Diwali 2023) सह दुसरा आणि चौथा शनिवार (Saturday) आणि रविवार (Sunday) यासारख्या नियमित सुट्यांचा समावेश आहे. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार नऊ काही सुट्ट्या बँकांसाठी प्रादेशिक आहेत आणि या सुट्ट्या राज्यांसाठी वेगवेगळ्या असू शकतात.
नोव्हेंबर महिन्यात 15 दिवस बँका बंद
नोव्हेंबर महिन्यात एक किंवा दोन नाही तर 15 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे बँकांची काम करण्याआधी बँकाँच्या सुट्टीचं वेळापत्रक (Bank Holiday List) एकदा पाहून घ्या.
Bank Holiday List In November : नोव्हेंबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी
- 1 नोव्हेंबर : हा दिवस कन्नड राज्योत्सव आणि करवा चौथ आहे. या दिवशी कर्नाटक, मणिपूर आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.
- 5 नोव्हेंबर : हा दिवस रविवार आहे.
- 10 नोव्हेंबर : मेघालयमध्ये या दिवशी वंगाळा सणानिमित्त बँका बंद राहतील.
- 11 नोव्हेंबर : हा दिवस महिन्याचा दुसरा शनिवार आहे.
- 12 नोव्हेंबर : या दिवशी रविवार आहे आणि दिवाळीही आहे.
- 13 नोव्हेंबर : या दिवशी दिवाळी आणि गोवर्धन पूजा असल्याने त्यानिमित्त सुट्टी असेल. त्रिपुरा, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात बँका बंद राहतील.
- 14 नोव्हेंबर : या दिवशी बली प्रतिपदा आहे. या दिवशी गुजरात, कर्नाटक, सिक्कीम आणि महाराष्ट्रात बँक सुट्टी असते.
- 15 नोव्हेंबर : या दिवशी भाऊबीज आहे. चित्रगुप्त जयंतीमुळे सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये या दिवशी बँकांना सुट्टी असेल.
- 19 नोव्हेंबर : रविवारची सुट्टी
- 20 नोव्हेंबर : छठ पूजा असल्याने बिहारसह राजस्थानमध्ये बँकांना सुट्टी असेल.
- 23 नोव्हेंबर : सेंग कुत्स्नेम आणि इगास बागवाल यांचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये सुट्टी असेल.
- 25 नोव्हेंबर : या दिवशी चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
- 26 नोव्हेंबर : रविवारची सुट्टी
- 27 नोव्हेंबर : गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे. त्रिपुरा, मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, नवी दिल्ली, बिहार, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये या दिवशी सुट्टी असेल.
- 30 नोव्हेंबर : कनकदास जयंती. कर्नाटकात या दिवशी बँका बंद राहणार आहेत.