Bank Holidays : फेब्रुवारीमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! 'इतके' दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा
February Bank Holidays : फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. फेब्रुवारी महिन्यामधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासा आणि त्यानंतरच तुमच्या बँकांसंबंधित कामाचं नियोजन करा.
![Bank Holidays : फेब्रुवारीमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! 'इतके' दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा bank holiday in february 2024 check RBI holiday list of bank holiday in month of february marathi news Bank Holidays : फेब्रुवारीमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! 'इतके' दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/b2a007c9208f6439ddd39eaf80de837c1698825199353322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bank Holidays in February 2024 : फेब्रुवारी (November) महिना अवघ्या काही दिवसांवर आला आहेत. तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये बँकांसंबंधित महत्त्वाची कामे करण्याच्या विचारात असाल, तरी ही बातमी तुमच्यासाठी आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. फेब्रुवारी महिन्यामधील बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holidays) यादी तपासा आणि त्यानंतरच तुमच्या बँकांसंबंधित कामाचं नियोजन करा. फेब्रुवारी महिना सुरु होण्यापूर्वी बँक (Bank Holiday) एकूण किती दिवस बंद राहणार आहेत, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कारण बँक हा सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. खात्यातून पैसे काढण्यापासून ते पैसे जमा करणे यासारख्या अनेक कामासाठी आपल्याला बँकेत जावं लागतं.
फेब्रुवारी महिन्यामध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या
फेब्रुवारी महिन्यात एक किंवा दोन नाही तर 14 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. फेब्रुवारीमध्ये सण आणि आठवड्याच्या सुट्ट्या यामुळे नऊ दिवस बँका बंद राहणार आहे. दरम्यान, यंदा लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील. काही राज्यांमध्ये 14 दिवस बँका बंद म्हणजे फक्त 15 दिवस बँकांचं कामकाज सुरु राहील. त्यामुळे बँकांची काम करण्याआधी बँकाँच्या सुट्टीचं वेळापत्रक (Bank Holiday List) एकदा पाहून घ्या.
बँकांना 14 दिवस सुट्टी
फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक सण असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये बँकांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण पाच दिवस सुट्ट्या आहेत. त्यासोबत दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणारी सुट्टी यांचा समावेश केल्यास नोव्हेंबर महिन्यात 14 दिवस सुट्ट्या आहेत. याशिवाय रविवारच्या सुट्ट्या आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार फेब्रुवारी महिन्यात एकूण 15 दिवस बँकांची सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.
Bank Holiday List In February : फेब्रुवारी महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी
4 फेब्रुवारी : रविवार
10 फेब्रुवारी : दूसरा शनिवार
11 फेब्रुवारी : रविवार
10 ते 12 फेब्रुवारी : लोसरनिमित्त सिक्किम राज्यात बँकांना सुट्टी
14 फेब्रुवारी : वसंत पंचमी निमित्त हरयाणा, ओदिशा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.
15 फेब्रुवारी : लुई-नगाई-नी निमित्त मणिपूरमध्ये बँकांना सुट्टी असेल.
18 फेब्रुवारी : रविवार
19 फेब्रुवारी : छत्रपति शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँकांना बंद राहतील.
20 फेब्रुवारी : मिजोरम आणि अरुणाचल प्रदेश राज्य दिनानिमित्त या राज्यांमध्ये सुट्टी
24 फेब्रुवारी : चौथा शनिवार
25 फेब्रुवारी : रविवार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)