एक्स्प्लोर

बँकांमध्ये जमा होणारा पैसा झाला दुप्पट, एकूण रकमेनं गाठला 200 लाख कोटी आकड

रतीय अर्थव्यवस्थेसाठी तसेच बँकिंग प्रणालीसाठी 2023 हे वर्ष आश्चर्यकारक होते. बँकिंग व्यवस्थेत जमा होणारी रक्कम दुप्पट झाली आहे.

Bank Deposits: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तसेच बँकिंग प्रणालीसाठी 2023 हे वर्ष आश्चर्यकारक होते. बँकिंग व्यवस्थेत जमा होणारी रक्कम दुप्पट झाली आहे. बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेने गेल्या वर्षी 200 लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. सप्टेंबर 2016 मध्ये ही रक्कम 100 लाख कोटी रुपये होती. वार्षिक आधारावर ही वाढ 9.5 टक्के नोंदवली गेली आहे.

 गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 13.2 टक्क्यांची वाढ 

गेल्या वर्षी, बँक ठेवींनी सर्वात जलद वाढीचा आकडा 100 लाख कोटी रुपयांचा गाठला आहे. याशिवाय, म्युच्युअल फंड उद्योगाच्या एयूएममध्येही प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान, बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेने गेल्या वर्षीच्या तुलनेत 13.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतीय बँकांमध्ये जमा झालेल्या पैशांचा हा आकडा कमीत कमी वेळेत 100 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आरबीआयच्या (RBI)म्हणण्यानुसार, 29 डिसेंबर 2023 पर्यंत बँक ठेवींचा आकडा 200.8 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 13.2 टक्के वाढ झाली आहे.

 म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याचे प्रमाण वाढले 

सेंट्रल बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, या रकमेपैकी 176 लाख कोटी रुपये मुदत ठेवींमध्ये आणि उर्वरित पैसे बचत खाते आणि चालू खात्यात पडून आहेत. या कालावधीत बँक अॅडव्हान्स 159.6 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 2022 च्या तुलनेत सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत घरगुती बचतीचा कल म्युच्युअल फंडाकडे वळला आहे. लोक आता या फंडांमध्ये आपली बचत गुंतवत आहेत.

म्युच्युअल फंड उद्योगाची AUM बँक ठेवींच्या एक चतुर्थांश 

वर्ष 2023 मध्ये, म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत विक्रमी 10 लाख कोटी रुपये जोडले जातील. यामुळे उद्योगाच्या एकूण एयूएमने 50 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. 2023 पर्यंत, म्युच्युअल फंड उद्योगाची AUM बँक ठेवींच्या एक चतुर्थांश असेल. वर्ष 2003 मध्ये, बँकांमध्ये जमा केलेली एकूण रक्कम 12.6 लाख कोटी रुपये होती आणि म्युच्युअल फंड उद्योगाची एयूएम केवळ 1.2 लाख कोटी रुपये होती. हे एकूण बँक ठेवींच्या अंदाजे एक दशांश होते.

बँकांमध्ये जमा पैशांमध्ये दुप्पट वाढ 

गेल्या काही वर्षांत बँकांमध्ये जमा होणारा पैसाही झपाट्यानं वाढला आहे. 1997 मध्ये ही रक्कम 5.1 लाख कोटी रुपये होती. ते दुप्पट होऊन 10 लाख कोटी रुपये होण्यासाठी सुमारे 4 वर्षे लागली. यानंतर मार्च 2006 मध्ये ही रक्कम दुप्पट होऊन 20 लाख कोटी रुपये झाली. ही रक्कम मार्च 2006 ते जुलै 2009 दरम्यान सर्वात वेगाने दुप्पट झाली. या काळात बँकांच्या ठेवींचा आकडा 40 लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget