एक्स्प्लोर

Apple CEO Tim Cook: 'अॅपल'कडून सीईओच्या पगारात 40 टक्क्यांची कपात; किती मिळणार पगार, पाहा

Apple CEO Tim Cook: अॅपल कंपनीने आपले सीईओ टीम कूक यांच्या पगारात 40 टक्क्यांची कपात केली आहे. अॅपल कंपनीने अमोरिकन शेअर बाजाराला याबाबतची माहिती दिली आहे.

Apple CEO Tim Cook: 'अॅपल'कडून सीईओ (Apple CEO) टीम कूक (Tim Cook) यांच्या पगारात 40 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. ही वेतन कपात 2023 वर्षातील पगारात असणार आहे. कंपनीच्या शेअरहोल्डर्सकडून मागणी करण्यात आल्यानंतर ही कपात करण्यात आली आहे. गुरुवारी कंपनीने अमेरिक शेअर बाजार नियामक प्राधिकरणाकडे याबाबतची माहिती दिली आहे. टीम कूक यांना 'कामगिरी आधारीत वेतन' (Pay With Performance) लागू असणार असल्याची माहिती अॅपलने दिली. 

अॅपलचे सीईओ टीम कूक (Apple CEO Tim Cook) यांना वर्ष 2022 मध्ये 99.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका वार्षिक पगार होता. आता त्यांना वर्ष 2023 मध्ये 49 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (3,98,75,71,000 रुपये) इतके वेतन मिळणार आहे. टीम कूक यांच्या नव्या वेतनात वर्ष 2022 प्रमाणे 3 दशलक्ष डॉलर्स इतके मूळ वेतन असणार आहे. तर, सहा दशलक्ष डॉलर्स इतका बोनस मिळणार आहे. तर, 40 दशलक्ष डॉलर्सची रक्कम इक्विटी द्वारे असणार आहे.

अॅपलने नियामक प्राधिकरणाला दिलेल्या माहितीनुसार, कुक यांना  देण्यात आलेले नवीन वेतन हे समभागधारकांची शिफारस, अॅपलची कामगिरी आणि सीईओंनी केलेल्या शिफारसींवर आधारीत आहे. कूक यांना  वार्षिक लक्ष्य आधारीत (Annual Target Compensation) 80 ते 90 टक्क्यांपर्यंत रक्कम देण्यात येण्याचे नियोजन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

पिचाई, नडेला, मस्क यांना किती पगार?

वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा वार्षिक पगार सुमारे 242 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे 1880 कोटी रुपयांच्या घरात आहे. 

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना वर्ष 2022 मध्ये एकूण वार्षिक पगार 54.9 दशलक्ष डॉलर इतका होता. 
 
इलेक्ट्रीक कार कंपनी 'टेस्ला'ने वर्ष 2018 सीईओ एलन मस्क यांना आगामी 10 वर्षांसाठी 56 अब्ज डॉलर पॅकेज जाहीर केले होते. मस्क यांना एवढे वेतन देण्यास काही समभागधारकांचा विरोध होता. मात्र, 70 टक्के समभागधारकांनी मस्क यांच्या बाजूने मतदान केले. 

'बिझनेस इनसाइडर'च्या वृत्तानुसार, वर्ष 2021 मध्ये प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी Amazon चे CEO अॅण्डी जॅस्सी (Andy Jassy) यांचा वार्षिक पगार  212 दशलक्ष डॉलर इतका होता. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या जागी अँडी जॅस्सी यांची कंपनीचे सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget